Skip to main content

Posts

Showing posts from 2012

भारत, भारतीय आणि प्रगती...

[या लेखात मी अनेक प्रश्नचिन्हे वापरली आहेत. त्याला माझं आश्चर्य, प्रश्न किंवा विधान; काहीही समजू शकता.]  बरेच दिवस झाले काहीच लिहिलं नाही. काही सुचतच नव्हतं आणि वेळही मिळाला नाही. पण प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण मात्र केलं. अचानक आता त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या बोरीवली नॅशनल पार्कमध्ये गेलो होतो. फार मोठे आर्कीओलॉजीस्ट डॉ. सुरज पंडित आमच्या सोबत होते. सर्वात पहिल्याच गुहेमध्ये ते आम्हाला माहिती सांगत असताना एक सुशिक्षित बेशिस्त कुटुंब तिथे आलं. त्या लहान मुलांनी तर तिथे धुमाकूळ घातला होता, आणि सरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तर ते लोक ऐकतच नव्हते; म्हणजे मुलं एकपट आणि पालक दुप्पट, अशी गत होती. त्यांचं बोलणं इंग्रजीत चाललं होतं, यावरून ते सुशिक्षित आहेत असा भास झाला, पण त्याच इंग्रजीतून त्यांनी त्यांचं खरं शिक्षण दाखवलं. मग पुढे सरांनी त्यांना गप्प करून तिथून घालवलं आणि म्हणाले "People are urbanized but not civilized". हे वाक्य मला फार सुंदर व महत्वाचं वाटलं. आपण ज्या ठिकाणी, ज्या गावात, शहरात, राज्यात, प्रांतात, देशात, प्रदेशात राहतो, तिथली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता म्हणजे एक समाजशास्त्रीय विश्लेषण

 ही माहिती मी फेसबुकवरून "निर्वाण बोधी" यांचाकडून मिळवली आहे. यातला एकही शब्द माझा नाही. फक्त आंबेडकरांच्या पत्रकारितेबद्दल माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा हा माझा प्रयत्न :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता म्हणजे एक समाजशास्त्रीय विश्लेषण... अन्याय सहन न होणे, हेच मनुष्याच्या मनाचे उन्नत स्वरूप होय. (मूकनायक - अंक 14 वा 14 ऑॅगस्ट 1920) राजकारणाचे सर्वसाधारण असे दोन हेतू आहेत. एक शासन व दुसरा संस्कृती. (मूकनायक - अंक दुसरा 14 फेबुवारी 1920) डॉ. बाबासाहेबांनी मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), जनता (1930) आणि प्रबुद्ध भारत (1956) या नावांनी पाक्षिके चालविली. यापैकी जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन बाबासाहेबांनी स्वत: न करता सहकाऱ्यांकडून करून घेतले. मात्र "मूकनायक' आणि "बहिष्कृत भारत' या दोन्ही पत्रांचे संपादन मात्र त्यांना स्वत:लाच करावे लागले. बहिष्कृत भारताच्या संपादनात बाबासाहेब स्वत: ओळ न ओळीकडे लक्ष देत असत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ""बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करणारा दुय्यम

In my dreams,

 I see India as a polity of Shivaji Maharaj, where each & every thing written by Dr. B.R. Ambedkar in constitution is implemented correctly. Where education is compulsory & free for everyone as started by Mahatma Phule. People follow the Noble Eightfold Path preached by Lord Buddha. And I'll be the richest & famous person in these aspects.....

थोडंसं कॉम्प्युटर विषयी

 कॉम्प्युटर आपल्या रोजच्या जीवनातला एक महत्वाचा व अविभाज्य भाग झाला आहे. प्रत्येकाला त्याची गरज ही लागतच असते. आजच्या जगात तर अगदी प्रत्येकाला, मग त्याला त्याचं ज्ञान असो किंवा नसो. समाजात कॉम्प्युटरचं मोफत प्रशिक्षण देणे हे गरजेचं आहे. काही ठिकाणी मोफत शिकवतही असतील, पण ते लोकांपर्यंत किती पोहोचतं, हा मोठा प्रश्न आहे. शाळांमध्ये कॉम्प्युटरचं प्रशिक्षण देतात, पण तिथे अनेक मुलं एकत्रितपणे शिकत असल्यामुळे, काहींपर्यंत ते पोहचत नाही किंवा, ते ग्रुपमध्ये असल्यामुळे किंवा लहान मुलांमध्ये शिक्षकांच्या प्रती भय असल्यामुळे इतरांसमोर जे समजलं नाही ते विचारत नाहीत. ह्या सर्व बेसिक गोष्टी आपल्याला माहित आहेत.  मुळात कॉम्प्युटरचा रोजचा वापर जो आहे, तो शिकण्यासाठी वेगळ्या क्लासेसची गरज नाही, तर थोडीशी इंग्रजीची गरज असते. कॉम्प्युटरवर आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं ते वाचूनच आपल्याला तो ऑपरेट करायचा असतो, आणि ती इंग्रजी जास्त कठीण नसते. पुढे काही ठिकाणी आपल्याला विविध बाबतीत अडचण येऊ शकते, जिथे दुसऱ्या कोणी जाणकार व्यक्तीने सांगायची गरज भासते. अशावेळी दुसऱ्याला विचारणे ठीक आहे; पण उगाच काही प्रॉब्लेम

कसले हे बौद्ध...

 बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त

माझा धर्माविषयीचा दृष्टीकोन...

 धर्म ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जुडलेली आहे. यापासूनच आपण कोणत्या पद्धतीने जगायचं हे शिकतो. आपण लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीत अशा पद्धतीने घडलो आहोत की, आपण धर्माविषयी टीका करत नाहीत, पटत नसतील तरीही त्याच्या जुन्या रुढीपरंपरे विरुद्ध बोलत नाही. इथूनच आपली मानसिकता अशा पद्धतीने घडते की, 'जे चाललंय ते चालू द्या...' मग पुढे येणाऱ्या पिढ्यांवरही तेच संस्कार होतात आणि २१व्या शतकातही तीच परिस्थिती दिसते जी पूर्वी असायची.  आज आपण पाहतो की, लोक बदलले नाहीत. धर्माच्या नावावर तंत्र, मंत्र, यज्ञ, हवन, जादूटोणा, ई. गोष्टी आजच्या आधुनिक काळात घडत आहेत. मुळात धर्म म्हणजे काय, तो कोणासाठी व कशासाठी असतो, धर्माचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध आहे, हे जाणून घेण्याची कुवत त्यांच्यात नाही, किंवा असं म्हणता येईल की त्यांनी चुकीच्या अर्थाने धर्म हा आत्मसात केला. प्राचीन काळापासून घडत आलेल्या चुकीच्या गोष्टी आपण फेकून दिल्या पाहिजेत, कारण आपल्याला त्याची माहिती व पुरावे मिळाले आहेत की त्याचा मानवाशी काही एक संबंध नाही किंवा ते उपयोगी नाही. धर्म किती जुना वा प्राचीन असल्याने त्याची महानता ठरत
We must keep little space in our stomach to digest the food which we've eaten when we were hungry. (This theory can be applied for knowledge in human brain.) - Aashit Sable
Our cell phones may not have attractive functions, but it should contain the files which gives (at least) basic knowledge of anything in the world. (This theory can be applied in 'human' life.) - Aashit Sable

Buildings of Glass

 All industrialists and businessmen must keep in mind that visuals do affect in society but in what way we are going to show our raised economical standards? By building hundreds of floors with glass...  My message to whole world is to stop pollution which these glass buildings are causing/increasing. It multiplies the pollution by reflecting the sun-rays, UV rays, etc. This causes the problems like road accidents, ozone hole, global warming, etc. These so called rich people will not think about the world in which they exist.  The glasses on the buildings reflect the sun-rays till ground level. What actually happens is that, people driving vehicles suddenly get disturbed because of sunrays getting reflected and this leads to road accidents. Secondly, some of the glasses absorb the heat but maximum types of glasses reflects the sunlight with ultraviolet rays; again we humans are the cause of letting the UV rays get into our atmosphere by using products like refrigerator, air-conditio

गणेशोत्सव

काय हिंदू धर्मीय खरंच गणेशोत्सव एक "धार्मिक" सण म्हणून साजरा करतात का?  बऱ्याच वर्षांपासून मी पाहतोय की गणेशोत्सव आला की लोक खुश होतात, पण त्यांचं खुश होण्याचं कारण नक्की काय याचं उत्तर आता दिसू लागलं आहे. मी समस्त हिंदू समाजाबद्दल बोलत नाहीये; पण काल घरी येताना बरेच मंडळी गणेश विसर्जनासाठी जाताना दिसले. गणपती मागे आणि पुढे "चिकनी चमेली" आणि "हलकट जवानी" सारख्या गाण्यांवर "बाप्पाचे भक्त" नाचत होते. त्या लोकांच्या गर्दीत काही जण कोल्डड्रिंकमध्ये दारू मिसळून बारी बारीने पित होते. विसर्जन करून आल्यावर सगळीच मुले रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या अंगावर त्यांच्या नकळत गुलाल उधळत होते. दारूच्या नशेत असणाऱ्या माणसांबद्दल तर सांगायलाच नको.  सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करताना टिळकांनी सांगितलं होतं का की, गणपतीच्या स्वागतासाठी आणि विसर्जनासाठी बॅंडबाजा, फटाके हे अपरिहार्य आहेत. काही वर्षांपूर्वी एका गावामध्ये जल्लोषात गणपतीला घेऊन चालले होते. त्यावेळी एकाने अगदी रस्त्याच्या मधोमध 'रस्सी बॉम्ब' लावला आणि गाड्यांना थांबवलंसुद्धा नाही. त्यावरून एक रि

खरे कलावंत कोण? स्टार की अभिनेते...

 बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि स्टार या शब्दांमध्ये बरीच मोठी तफावत आहे. स्टारला अभिनयाशी काही देणं-घेणं नसतं. ते मुळात श्रीमंत 'चित्रपट कलाकारांच्या' घराण्यात जन्माला येतात म्हणूनच त्यांना जन्मतःच स्टार नावाचा टॅग लागतो. तिथूनच त्यांना बॉलीवूडचा शॉर्टकट मिळतो, मग काय करायचंय अभिनयाशी... चित्रपट मिळतो ना, तोही मुख्य भूमिकेसाठी. मग बस! असाच विचार कदाचित त्यांच्याही मनात येत असेल. पण कोण कशाला बोलून दाखवतंय! आपण मराठी अभिनेते पहिले, तर जास्तीत जास्त लोक हे चांगल्या दर्जाचे कलाकार आहेत. त्यामागे त्यांची मोठी कहाणी असते. माझा मुद्दा हा नाही की, धडपड केल्यानेच माणूस कलावंत होतो. माझं असं म्हणणं आहे की, त्याच्या "कलाकार" होण्यामागे जे काही असेल ते त्याचं वैयक्तिक आयुष्य. प्रेक्षकांना दिसते ती त्यांची पडद्यावरची कामगिरी. हा विषय लक्षात घेतला तर "स्टार" ही गोष्ट वेगळीच वाटते. रणबीर कपूर, इम्रान खान यांच्यासारख्या स्टार्सचा अभिनय हा बनावटी वाटतो; तर तुषार कपूर, उपेन पटेल हे तर माझ्या मते चुकून अभिनय क्षेत्रात आले असतील, कारण इतरांचा अभिनय हा किमान बनावटी वाटतो पण हे तर

Love

 In in our 21st century, Love is a word which relates only to a couple in which only a boy and a girl is involved, which is not wrong but this concept has become limited only to this. Nowadays, people only think about "a duo of different gender" when listening about the word "love". The terms attraction, like, love and romance are very different from each other; but why don't we, the people of 21st century think about our narrow-mind while assuming the love in different way instead of its own real meaning. For a couple, love should not like holding hands physically for a while, it must be a bonding of souls for whole life.  We should take love also as a compassion to society, for human beings and nature. It can be an affection not only for a single person but to whole world for us. It is true that love is different for every person in our life which includes mother, father, brother, sister, wife or any other loved one. But we will come to know about the variou

भारतीय राजकारणात धर्माला घेऊन केले जाणारे सत्ताकारण

 भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास ६५ वर्ष झाली. या देशावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केलं. त्याहीपूर्वी प्राचीन भारतच्या इतिहासात समाजावर धर्मानेच राज्य केले आहे. धर्म जे सांगेल, त्याचे नियम पाळणे अनिवार्य होते. पण जेव्हा इंग्रज भारतात आले, त्यावेळी धर्माची सत्ता कमी झाली. परंतु अप्रत्यक्षरित्या इंग्रजांच्या सत्तेसोबत त्यांचा ख्रिस्ती धर्मसुद्धा भारतात आला. या सर्व गोष्टींवरून आपल्या हे लक्षात येऊ शकते की, धर्म आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी असून ते कुठेतरी जुळलेले आहे. किंबहुना राजकारणी ते जोडत आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना समिती स्थापन करण्यात आली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांमध्ये राज्यघटना तयार झाली. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे "भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे". स्वतंत्र भारताची राज्यघटना मान्य झाल्याच्या पुढे देशाने या तत्त्वांवर चालायला हवं होतं. पण आज आपल्या देशात काय दिसून येतं ते, धर्म, जाती व जमातवादी राजकारण. "जिथे" आपण भारताला धर्मनिरपेक्ष म्हणतो "तिथेच" आपण एखादा विशिष्ट "वाद"

अंधश्रद्धा

 "साधू बाबा" या नावाचा व्यवसाय "२१व्या शतकात" जोरात चालला आहे. त्याचे दोन प्रकार दिसून येतात. ते म्हणजे मंत्र - जादूटोणा करणारे, आणि दुसरे उपदेश करणारे. आपल्या सर्वांना माहित आहे की जादूटोणा, करणी, वशीकरण, मुठ मारणे, ई. हे प्रकार किती वाईट आहेत. फक्त शब्दांच्या व मंत्रांच्या जोरावर इथे बसलेला माणूस दुरवर असलेल्या माणसाला कशी काय हानी पोहचवू शकतो! ही सर्वसाधारण गोष्ट आपल्याला कळते पण तरीही काही लोक त्या ढोंगी साधू बाबांकडे आपल्या समस्या घेऊन जातात, याच गोष्टीचा फायदा घेऊन ते लोक त्यांच्याकडे जाणार्यांकडून बक्कळ पैसे उकळतात. उगाचच आपण आपल्या वैयक्तिक गोष्टी त्यांना जाऊन सांगतो, त्या नाविलाजाचा फायदा ते पुरेपूर उचलतात. अशा वेळी आपल्याला त्या गोष्टीची भुरळ पडलेली असते. आपलं काम कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे, या भावनेने आपण समोरचा मागेल ते देऊन रिकामे होऊन जातो आणि ते ही मागचा पुढचा विचार न करता.  यातला अगदी भयानक व भीषण प्रकार म्हणजे "अघोरी विद्या". यामध्ये पशुबळी, नरबळी यासारख्या विकृत गोष्टी चालतात. या विद्येला अभ्यासणारे मांत्रिक फारच विद्रूप, विक्षिप

वंदन महाराष्ट्राला

ही मराठी अमुची, बोली अमुची, संस्कृती मराठी. ज्ञानात अमुच्या, तुकात अमुच्या, सोयरी मराठी. अशी संपन्न संत परंपरा या महारष्ट्रा लाभली, विषमता भाव सहन केला, वंदितो चोखाच्या त्या चरणी... तूच अमुचा तारणहारा शिवबा, तूच अमुचा धनी, जिजाऊ सारिख्या आईने तुजसारिखी महान व्यक्ती घडविली. जिवाजीनं कापला शत्रूचा हात, बाजीप्रभूनं हादरली पावनखिंडी. तलवारी हाती घेण्याआधी तू शिवा फिरविल्या सोन्याच्या नांगरी... या भूमीवर जन्मास एकच ते महात्मा, राष्ट्रपिता संबोधितो मी, त्यांचं नाव आहे जोतीबा. उघडी केली शिक्षणाची दारं, दाखविली ज्ञानाची जोती, साथ दिली क्रांतीसुर्याला आमची माय ती सावित्री. जातीभेद मोडून शिकविली शूद्रांची पोरं, आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज. अज्ञानी समाजाला दिले त्यांनी ज्ञान भरपूर, धर्मांधांना केले सरळ, ते होते प्रबोधनकार. दलितांची हाक ऐकून आले जन्मास आंबेडकर, खूप शिकुनी मोठे झाले घटनेचे शिल्पकार, राज्यघटनेत दिले त्यांनी आपणास मताधिकार, समता, स्वतंत्रता, बंधुभाव करू आपण अंगीकार. झाला सुरु लढा या संयुक्त महाराष्ट्राचा, गेला बळी अमुच्या अनेक हुतात्म्यांचा, महारक्षकां

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज झ

शिवी

 आजच्या युवा पिढीला काही गैरसमज आहेत की शिव्यांशिवाय भाषा नसते, किंवा कालच्या पिढीला याची जाणीव नसल्यामुळे त्यांना याचं आश्चर्य वाटत असेल. मी कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे मला याचा फार अनुभव आला आहे की, साध्या वाक्यांमध्येसुद्धा एकातरी शिवीचा वापर होतो. जास्त आश्चर्य याचं की, त्या शिव्या स्त्रीवाचक असतानाही मुलीसुद्धा ते शब्द सर्रास उच्चारतात; आणि त्याहून अधिक आश्चर्य याचं की आपल्या समाजावर पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे इतका परिणाम झाला की एखाद्यावर राग व्यक्त करणे यासाठी शिवीच तोंडी येते. अगदी चांगल्या मनःस्थितीत असताना एखादा मित्र भेटला, तेव्हासुद्धा शिवीच!  जर कोणी शिवी देत असेल तर त्यावर माझं एकच मत आहे की, तुम्ही शिवी देतात ती स्त्रीवाचक असते. जास्तीत जास्त शिव्यांमध्ये स्त्रियांच्या अवयवांचा उल्लेख असतो. तर शिवी देणाऱ्याने एकच लक्षात ठेवावे की, तो स्त्रीवाचक शिवी देत असेल तर ती शिवी संपूर्ण स्त्री जातीला (त्याच्या मानसिकतेनुसार) लागू होते, त्याच स्त्री जाती मध्ये त्याची आई, बहिण, इत्यादी जवळील स्त्रिया समाविष्ट होतात हे साहजिक आहे. मग शिवी देणारा जेव्हा शिवी देतो, तीच शिवी त्याचाच आ

Women Property Rights - Dr. B.R. Ambedkar

Most women in India don't know that their present property rights were first proposed by Dr Ambedkar in Hindu Code Bill 1951 which was rejected by Nehru. Because of this tussle, Dr Ambedkar resigned from the Law Ministry, not in the capacity of a "Dalit icon" as propounded by false media today but as a true nationalist whose ideas belonged to 21st century. The property rights of women were ultimately recognised by the government in the form of Hindu Succession (Amendment) Act 2005, 54 years after Dr Ambedkar introduced it. Share it so that this fact comes into the knowledge of every woman in this country.

स्त्री आणि पती

 पती कसा असावा? या विषयावर तर मी नक्कीच बोलणार नाहीये. कारण हा मुद्दा फार नंतर उदयास आला. हे का निर्माण झालं असावं? यावर मी "माझे विचार" मांडणार आहे... इतिहासापेक्षा आपण आजचेच संदर्भ पाहू, तुमच्या लगेच लक्षात येईल, की पती ही संकल्पना निर्माण होताना नक्की काय झालं असावं.  पती म्हणजे एखाद्या सजीव किंवा निर्जीव गोष्टीचा मालक. आज आपण लखपती म्हणतो तो असतो लाखो रुपयांचा मालक, करोडपती म्हणतो तो असतो करोडो रुपयांचा मालक, तसंच आपण फक्त "पती" म्हणतो तो असतो एखाद्या स्त्रीचा मालक. आता आपण जातो ते इतिहासातील स्त्रीदास्य, गुलामगिरी, अतिशूद्र ह्या गोष्टींकडे. बुद्ध काळापूर्वी स्त्रीसत्ता / मातृसत्ता होती, त्याच दरम्यान गणकाळ आला. त्याच्या काही काळानंतर आर्य भारतात आले. त्या आर्यांनी भारतातील लोकांवर सत्ता मिळवण्यासाठी एक विशिष्ट वर्ग निर्माण केला, तो होता ब्राह्मण वर्ग. (इथे आजची ब्राह्मण जात समजू नये, तर ब्राह्मण या 'शब्दाचा अर्थ' मला अभिप्रेत आहे.) त्या ब्राह्मण वर्गाने इथल्या मूळच्या लोकांना मुर्ख बनवून त्यांच्यावर शासन करण्यासाठी वेद, पुरण, वेदांत, आरण्यके, उपनिषद,

धर्मासाठी

धर्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. आपण 'एखाद्या' धर्माबद्दल बोलत असू तर तो 'विशिष्ट' प्रकारे जीवन जगण्याचा मार्ग असतो. धर्म ही संकल्पना फार पूर्वी उदयास आली पण त्या संकल्पनेला नाव मिळालं नव्हतं. आपल्या पूर्वजांपासून जे काही कार्य, व्यापार, संस्कृती, कला किंवा कसलाही व्यवहार चालत आलेला असतो, तो पुढची पिढी चालवत असते, त्यालाच ते आपला धर्म मानतात. आणि त्यानुसारच ते आपलं आयुष्य चालवतात. इतिहास पाहिला, तर पूर्वी लोक भटके होते. ते खाण्यापिण्यासाठी ठिकठिकाणी फिरत होते. समाज फार विचलित होता. ही परिस्थिती पाहून काही विद्वान लोकांना असं वाटलं की समाजाला काहीतरी चांगली शिकवण द्यावी जेणेकरून सर्वांना सुख-शांती लाभेल. असे अनेक संत, विचारवंत, तत्वज्ञानी जन्मास आले. काही महत्वाच्या महान लोकांचा इथे उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे चक्रधर स्वामी, बसवेश्वर महाराज, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर जैन, मोहम्मद पैगंबर; या सर्व लोकांनी समाजाला सुखी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी लोकांना फक्त चांगले उपदेश दिले, ते काही "आज एक नवीन धर्म सुरु करुया" या उद्देशाने घरातून नाही निघाले. त्

जीवघेणी दही हंडी

"दही हंडी" या सणात काय असं वैशिष्ट्य आहे की ज्यावर आज लाखो - करोडो रुपयांच्या स्पर्धा ठेवल्या जातात. ह्या सणाची सुरुवात हिंदू धर्मात मानल्या जाणाऱ्या भगवान श्री कृष्णापासून झाली. कृष्णाला लहानपणापासूनच दही - लोणी वगैरे खायला खूप आवडत होतं. घरी सारखं तो ते खाण्यासाठी हट्ट करायचा, बऱ्याचदा न सांगता ते खायचा आणि सांडवतही होता. म्हणून आई दही, ताक, लोणी यासारख्या गोष्टी त्याचापासून दूर ठेवायची जेणेकरून त्याचा हात तिथपर्यंत पोहचू नये. मग कृष्ण ते मिळवण्यासाठी पाय उंचावून, कशाकशावर उभा राहून प्रयत्न करायचा आणि ते मिळवायचा. तुम्ही यापुढची गोष्ट समजून घेण्यास सुज्ञ आहात हे समजून मी पुढे बोलतो... अशी इथून ही सुरु झालेली दही हंडी आज कोणत्या "थराला" पोहोचली आहे ! ही सुरुवातच किती क्षुल्लक गोष्टीपासून झाली हे आपल्या लक्षात येते. आज हा सण साजरा करण्यासाठी लोकांनी मंडळ स्थापन करून तालिमी सुरु केल्या ! कशासाठी हे सगळं? जो खेळ क्षणात जीव घेऊ शकतो, हे माहित असतानासुद्धा पालक आपल्या मुलांना पाठवतात, याचं मला फार आश्चर्य वाटतं. बरं "कळतं पण वळत नाही" अशी गत असेल तर आपण वर्त

Fact:- Life. Importance. Feelings.

It's human nature, to earn importance in someone's life, and it's human feeling to feel the importance. Communication is very important to protect a healthy relation; due to lack of it, a time comes in our life where a friend becomes stranger. We should adjust ourselves in such a way, that no one will try to decrease our importance in their life. And we must live in such a way, that everyone will try to be important in your life... - Aashit Sable.

समज

काहीतरी सुचतं, पण सुचेनासं होतं, काहीतरी कळतं, पण वळेनासं होतं, "करुणेच्या" भाषेला "प्रेमाचं" ओझं, आणि खुंटलेल्या बुद्धीला बोलेनासं होतं. प्रगल्भ बुद्धीने खरं-खोटं होतं, पण संकुचित मनाला सांगणं कसलं, मी पणाचं ढोंग घेऊन समजत नाही, त्या सरळ व्यक्तीला वळण कसलं !!! - आशित साबळे.

सेन्सॉर

 आजच्या आधुनिक जगात, लोकांना असं वाटू लागलं आहे की आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारल्याने प्रगती करू. पण पाश्चात्य देशांतील कोणत्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे त्याचा विचारही हे लोक करत नाहीत. आजचे चित्रपट वा जाहिराती पाहिल्या, तर त्यामध्ये मूळ गोष्टीचा आशय कमी आणि अश्लीलता जास्त दिसते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ह्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड पास तर करतच, पण ते ही "युनिवर्सल" सर्टीफिकेट सह! जे चित्रपट "अडल्ट" कॅटेगरीमध्ये येतात त्यांना युनिवर्सल श्रेणीचं प्रमाणपत्र का व कसं दिलं जातं? माझ्या मते याचं उत्तर असं असेल, की चित्रपट बनवणाऱ्यांना त्यांचा प्रेक्षकवर्ग अधिक वाढवायचा असेल (साहजिकच पैशांसाठी), म्हणून ते सेन्सॉर बोर्डमध्ये अधिकाऱ्यांना लाच देऊन असे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करत असतील.  याचा दुष्परिणाम संपूर्ण समाजावर होतो, त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये तो अधिक लवकर रुजतो. कारण जे चित्रपट प्रौढांसाठी असतात, ते हे लहान मुलं पाहतात, आणि बऱ्याचदा याचं अनुकरण होताना दिसतं. उदाहरणार्थ; आजला शाळेतली लहान-लहान मुले-मुली (अगदी ५वी-६वीचे) "गर्लफ्रेंड-बॉ

आजोळची आठवण...

एकदा जायचं होतं अजोळला, लहानपणचे दिवस आठवले. डोळ्यासमोर ते चित्र येऊन, माझे डोळे पाणावले. आजी - आजोबाचं प्रेम मी खूप अनुभवलेले, आता गावी जाऊन आंबे खायचे होते. त्या चिमुकल्या डोक्यावरून ते सुरकुतलेले हात फिरले, अल्लड मन असून अंग माझे शहारले. काहीच समज नसताना त्यांच्या डोळ्यातले प्रेम मला जाणवले, आणि आंबे खायचे सोडून मी त्यांचेच पापे घेतले. जगण्यासाठीचे त्यांचे श्रम कळतच नव्हते, पण जे काही मागितलं ते लगेचच मिळायचे ! ते दिवस आठवून मन माझे आनंदी झाले, पण आज तेच गाव वाटते वाळवंटलेले... प्रवासात असताना मी त्याच विचारात गुंतलेलो, पण अचानक मला अजोळला जायचे कारण आठवले. कारण होतं असं, की मला एक फोन आलं, आणि तिकडून ते म्हणाले की आजोबा गेले..... - आशित साबळे.

"महामानव" : हे विशिष्ट जातीचे/धर्माचे नाही तर संपूर्ण समाजाचे असतात.

 आजच्या काळात आपल्या समाजामध्ये "जमातवादी राजकारण" खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे. अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या महामानवांचे नाव घेऊन व लोकांचा वापर करून आपला स्वार्थ साधत आहेत. अज्ञानी लोक त्यांच्या दिखाऊ भूमिकेच्या आहारी जाऊन बळी पडतात आणि आतलं "राजकारण" समजूनच घेत नाहीत. आजपर्यंत जेवढ्या पण (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष) राजकीय पक्षांमुळे दंगली झाल्या, त्यामध्ये वरच्या लोकांना काही फरक पडला नाही, तर त्यात बळी पडला तो सर्वसामान्य समाजच.    आज आपण पाहू शकतो की शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर काही महापुरुषांचं नाव घेऊन किती चुकीचे काम चालतात.   शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदू धर्म, हिंदुत्व, हिंदुत्ववाद वाढवणे आणि मुसलमानांचा द्वेष करणे अशा गोष्टी दिसतात. बोलतात शिवाजी महाराज हे "हिंदवी स्वराज्य" संस्थापक आहेत. महाराजांनी कधीच कोणाचाच जात-धर्म पाहिला नाही. ते फक्त स्वराज्यासाठी लढले. तो काळ पाहिला तर त्यावेळी लोक फक्त आपले राज्य वाढवण्यासाठी लढायचे, शिवाजी महाराजांनी आपल्या हक्काचे, रयतेचे राज्य जिंकले, हिंदू "धर्माचे" नाही. आताच्

31st नाईट : ती रात्र

 कालची संध्याकाळ काही वेगळीच होती. खूप काही नवीन अनुभवलं. आमच्या एका मिडियाच्या सरांनी (सांध्य यांनी) एक नाटक लिहिलं. त्या एकांकिकेमध्ये त्यांनी एक मुलगा व एक मुलगी अशा दोघांचं संभाषण व्यक्त केलेलं आहे. पण व्यक्ती जाणवतात मात्र अनेक. विषय थेट मनाला भिडतो, हृदयाला स्पर्श करतो, अंगावर शहारे आणतो. या जगातील लोकांची मानसिकता काय आहे? याची जाणीव करून देतो.  पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असतो याचे चित्रण "सांध्य" यांनी केलंय. ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्ष सुरु होताना ती "फॉरवर्ड युवा पिढी" काय करते... बारमध्ये दारू पिणं, रेव पार्टी, ड्रग्स घेणं, नशा करणं, सेक्स करणं या गोष्टी त्या दिवशी सर्रास होत असतात. माणसाचं मन संकुचित असतं, मानसिकता तयार झालेली नसते (किंवा "त्या" प्रकारची मानसिकता तयार झालेली असते), पाश्चिमात्य संस्कृती चुकीच्या प्रकारे आपल्या जीवनात आणणे, याच गोष्टी त्याच्या डोक्यात कायम फिरत असतात. आजच्या बऱ्याच मुलांचा/पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन म्हणजे "डोळ्याने बलात्कार करणे" असाच आहे. दृष्टीकोन न बोलता मी क

लोकशाहीर विठ्ठल उमप : मृद्गंध पुरुस्कार

 काल रात्री "लोकशाहीर विठ्ठल उमप : मृद्गंध पुरुस्कार" सोहळ्याला गेलो होतो. "महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे" आले होते. सोबतच सुलोचना चव्हाण, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, जॉनी लीवर, भरत जाधव, इत्यादी नामवंत कलाकार आले होते. एवढे मोठमोठे कलाकार पाहून फार आनंद झाला. सोहळ्याची सुरुवात राजाराम जामसांडेकर, विजय चव्हाण व इतर उत्कृष्ट वादकांच्या जुगलबंदीने झाली. कार्यक्रमात नंदेश व उदेश उमप ने स्वतःच्या आवाजाने वेगळीच बहार आणली. शेवटी शाहीर साबळे यांनी महाराष्ट्रागीताची झलक ऐकवली, त्यांचासोबत त्यांचा नातू "केदार शिंदे" पण गायीला. वक्त्यांचे आनंदाचे शब्द ऐकून मन प्रफुल्लित झालं.  लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी "जय भिम" म्हणून आपले प्राण सोडले. त्याच शाहिराला मनाचा "जय भिम".

रात्रीची रेल्वे आणि स्त्री

 काही दिवसांपासून रात्री उशिरा पर्यंत रेल्वे ने प्रवास करतोय. कांदिवली ते दादर भावासोबत ये जा आजकाल सुरूच आहे. काल रात्री १.३० च्या सुमारास दादरला घरी आलो. येताना प्रत्येक ट्रेनचं निरीक्षण करत असताना बरेच पुरुष स्त्रियांच्या डब्यात प्रवास करताना दिसले. रात्री काहीतरी १०-११ च्या नंतर स्त्रियांच्या डब्यात पुरुषांना प्रवास करायची परवानगी देणे ही किती मुर्खासारखी गोष्ट आपल्या सरकारने केली आहे.  एवढे सारे प्रकरण समोर येऊनसुद्धा आपल्या सरकारचे डोळे उघडत नाहीयेत. ज्या वेळी स्त्रियांना जास्त सुरक्षेची गरज असते, त्यावेळी नेमकं "पुरुषांना" डब्याच्या आत परवानगी ! अत्याचार होत असताना अनेक स्त्रिया त्याचा प्रतिकार करतील ही, पण अशा वेळी एक (एकटी) स्त्री काय करणार!  बातम्या, वृत्तपत्र, टी.व्ही., इत्यादींद्वारे आपणास तुरळक गोष्टी कळतात, पण घडलेल्या असतात त्याहूनही कित्येक पट जास्त. ती गोष्ट वेगळी की स्त्रियांनी स्वतःलाच कुमकुवत बनवून ठेवलं आहे. पण काळाची गरज आहे ती त्यांना बळावण्याची.  पोलीस असतात, इतर चांगले लोक लक्ष ठेवतील, त्याने स्त्रियांचं संरक्षण होईल; ह्या सगळ्या नंतर च्या गोष्टी

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.
सहन करू नका, विद्रोह करा. डरपोक राहू नका, बंडखोर बना.  - आशित साबळे
आयुष्यात काहीही होण्यासाठी स्वतःला घडवावं लागतं, आणि स्वतःला घडवण्यासाठी सामाजिक जाणीव असणं महत्वाचं असतं...  - आशित साबळे.