Skip to main content

Posts

Showing posts with the label समुद्र

31st नाईट : ती रात्र

 कालची संध्याकाळ काही वेगळीच होती. खूप काही नवीन अनुभवलं. आमच्या एका मिडियाच्या सरांनी (सांध्य यांनी) एक नाटक लिहिलं. त्या एकांकिकेमध्ये त्यांनी एक मुलगा व एक मुलगी अशा दोघांचं संभाषण व्यक्त केलेलं आहे. पण व्यक्ती जाणवतात मात्र अनेक. विषय थेट मनाला भिडतो, हृदयाला स्पर्श करतो, अंगावर शहारे आणतो. या जगातील लोकांची मानसिकता काय आहे? याची जाणीव करून देतो.  पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असतो याचे चित्रण "सांध्य" यांनी केलंय. ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्ष सुरु होताना ती "फॉरवर्ड युवा पिढी" काय करते... बारमध्ये दारू पिणं, रेव पार्टी, ड्रग्स घेणं, नशा करणं, सेक्स करणं या गोष्टी त्या दिवशी सर्रास होत असतात. माणसाचं मन संकुचित असतं, मानसिकता तयार झालेली नसते (किंवा "त्या" प्रकारची मानसिकता तयार झालेली असते), पाश्चिमात्य संस्कृती चुकीच्या प्रकारे आपल्या जीवनात आणणे, याच गोष्टी त्याच्या डोक्यात कायम फिरत असतात. आजच्या बऱ्याच मुलांचा/पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन म्हणजे "डोळ्याने बलात्कार करणे" असाच आहे. दृष्टीकोन न बोलता मी क...