Skip to main content

Posts

Showing posts with the label संस्कृती

कलेचं मूळ आणि महत्त्व

(हा लेख दैनिक सकाळ साठी ५०० शब्दांत लिहिलेला, पण इथे तो माझे अनुभव सांगून अजून विस्तृत पद्धतीने लिहिला आहे.) लहानपणापासूनच चित्रपट बनवायची इच्छा होती, पण ह्या सर्व गोष्टी कश्या असतात हे मला माहित नव्हतं. मी सातवीत असतानाच नास्तिक झालो. त्यामुळे देवधर्म करण्याऐवजी मी वाचू लागलो. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. माझा देव या संकल्पनेवरचा विश्वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्न पडू लागले. याच कारणामुळे माझं वाचन कथा कादंबरी भोवती नसून वैचारिक आणि तत्वज्ञानाशी निगडीत पुस्तकात मला रस होता. मी सुरुवातीच्या काळात वाचलेल्या पुस्तकांपैकी दोन ठळकपणे आठवतात – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं “राम आणि कृष्णाचं गौडबंगाल” आणि शहीद भगत सिंह लिखित “मी नास्तिक का आहे?”. या दोन पुस्तकांमुळे माझे विचार अजून स्पष्ट झाले आणि मला खात्री झाली की माझा नास्तिक होण्याचा निर्णय योग्य होता. मी रुईया महाविद्यालयात बी.एम.एम. शिकत असताना मला काही असे मित्र मैत्रिणी भेटले ज्यांच्यामुळे माझ्या वाचनाचा वेग वाढला. महात्मा ज्योतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे, पेरियार, ...

मुक्त साहित्य

(आत्तापर्यंतच्या एकूण वाचनातून आणि अनुभवांमधून मला काय जाणवलं ते या कवितेत आहे.) तुमच्यासारखं आमच्या कवितेत नसतात यमक, पण असतात गमक समाजाचे. तुमच्या संस्कृतला आम्ही हुंगत पण नाही, आमच्या साहित्याला निर्माण करायला. ते वाटू द्या तुम्हाला प्राकृत, आम्ही आहोतच अस्पृश्य मेनस्ट्रीमपासून दलित म्हणून. निसर्गाने दिलेल्या जगण्याला, आणि जगण्यातल्या स्वातंत्र्याला आम्ही जागवतोय, आंबेडकरी म्हणून. आमचं जगणंच असतं आमचं साहित्य, आमच्या वेदनाच असतात आमचे शब्द. तुमचे गोड गुलाबी रोमँटिक काव्य माणूसपणाच्या काही कामाचे नाही. त्यातून वासच येत असतो वासनेचा, प्रेमाच्या पलीकडे न जाणाऱ्या सडक्या मेंदूचा. आमच्या जहाल विद्रोही साहित्यातून व्यक्त होत असते चीड अन्यायाची, सोबत असते बुद्धाची करुणा माणसाला मुक्त करण्यासाठी. - आशित रजनी.

संस्कृतीचे मक्तेदार आणि आपली लोककला

 संस्कृती हा विषय म्हटलं तर खूप गुंतागुंतीचा आहे. आपण याला खूप सोप्या पद्ध्तानीने समजून घेऊ शकतो, पण जर हा विषय कठीण समजून राहिलं तर मग तो कळायलाही खूप कठीण आहे. खरं तर संस्कृती ही कलेमधून अधिक लवकर व सोप्या पद्धतीने रुजली जाते. त्याही अगोदर संस्कृतीला धर्माच्या माध्यमातून लोकांमध्ये रुजवलं गेलं. आजही अनेक कला किंवा लोककला ह्या हिंदू संस्कृतीच्या मानल्या जातात आणि बऱ्याच आहेतही. पण लोक भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती ही एकच मानतात. त्यातल्या त्यात गम्मत अशी आहे, की हेच लोक जेव्हा भारतीय संस्कृती इतरांना (परदेशी लोकांना, ई) दाखवत असतात तेव्हा ते हिंदू परंपरा, मंदिर, कला यांसोबत बौद्ध लेण्या, ताज महाल, लाल किला, इत्यादी हेही दाखवतात. जर का तुमच्या म्हणण्यानुसार हिंदू संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती आहे, तर मग इतर धर्माला का मध्ये आणतात? हे मध्ये आणतात कारण, मुळातच आर्यांनी आणि ब्राह्मणांनी त्यांची संस्कृती ही भारतातील मूळ बहुजनांवर भेसळ करून लादली. म्हणून आपल्याला कळतच नाही की, आपली संस्कृती कोणती आणि परकी कोणती!  मुळतः भारतीय संस्कृती ही चार्वाक, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर...

कसले हे बौद्ध...

 बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त...

माझा धर्माविषयीचा दृष्टीकोन...

 धर्म ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जुडलेली आहे. यापासूनच आपण कोणत्या पद्धतीने जगायचं हे शिकतो. आपण लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीत अशा पद्धतीने घडलो आहोत की, आपण धर्माविषयी टीका करत नाहीत, पटत नसतील तरीही त्याच्या जुन्या रुढीपरंपरे विरुद्ध बोलत नाही. इथूनच आपली मानसिकता अशा पद्धतीने घडते की, 'जे चाललंय ते चालू द्या...' मग पुढे येणाऱ्या पिढ्यांवरही तेच संस्कार होतात आणि २१व्या शतकातही तीच परिस्थिती दिसते जी पूर्वी असायची.  आज आपण पाहतो की, लोक बदलले नाहीत. धर्माच्या नावावर तंत्र, मंत्र, यज्ञ, हवन, जादूटोणा, ई. गोष्टी आजच्या आधुनिक काळात घडत आहेत. मुळात धर्म म्हणजे काय, तो कोणासाठी व कशासाठी असतो, धर्माचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध आहे, हे जाणून घेण्याची कुवत त्यांच्यात नाही, किंवा असं म्हणता येईल की त्यांनी चुकीच्या अर्थाने धर्म हा आत्मसात केला. प्राचीन काळापासून घडत आलेल्या चुकीच्या गोष्टी आपण फेकून दिल्या पाहिजेत, कारण आपल्याला त्याची माहिती व पुरावे मिळाले आहेत की त्याचा मानवाशी काही एक संबंध नाही किंवा ते उपयोगी नाही. धर्म किती जुना वा प्राचीन असल्याने त्याची महानता ठरत...