Skip to main content

Posts

Showing posts with the label प्रमाणपत्र

सेन्सॉर

 आजच्या आधुनिक जगात, लोकांना असं वाटू लागलं आहे की आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारल्याने प्रगती करू. पण पाश्चात्य देशांतील कोणत्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे त्याचा विचारही हे लोक करत नाहीत. आजचे चित्रपट वा जाहिराती पाहिल्या, तर त्यामध्ये मूळ गोष्टीचा आशय कमी आणि अश्लीलता जास्त दिसते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ह्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड पास तर करतच, पण ते ही "युनिवर्सल" सर्टीफिकेट सह! जे चित्रपट "अडल्ट" कॅटेगरीमध्ये येतात त्यांना युनिवर्सल श्रेणीचं प्रमाणपत्र का व कसं दिलं जातं? माझ्या मते याचं उत्तर असं असेल, की चित्रपट बनवणाऱ्यांना त्यांचा प्रेक्षकवर्ग अधिक वाढवायचा असेल (साहजिकच पैशांसाठी), म्हणून ते सेन्सॉर बोर्डमध्ये अधिकाऱ्यांना लाच देऊन असे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करत असतील.  याचा दुष्परिणाम संपूर्ण समाजावर होतो, त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये तो अधिक लवकर रुजतो. कारण जे चित्रपट प्रौढांसाठी असतात, ते हे लहान मुलं पाहतात, आणि बऱ्याचदा याचं अनुकरण होताना दिसतं. उदाहरणार्थ; आजला शाळेतली लहान-लहान मुले-मुली (अगदी ५वी-६वीचे) "गर्लफ्रेंड-बॉ...