अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead)   अरे रान रान रान, चला   उठवू सारे रान रे...     (Chorus ⬇️)   जाण जाण जाण    जहरी दुष्मनाला जाण रे   हे हे हे हे हे हे हे.     कठीण आला काळ,   मातीशी तुटे नाळ,   युगाचा अंध खेळ,   डोळेच केले गहाळ.   सावात दिसे चोर,   घुबडात दिसे मोर,   लहानात दिसे थोर,   थोरात दिसे पोर.     अरारारारा.     अरे भले भले भुलले,   भलतेच गाती गान रे... (Chorus)   दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे),   दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे...     जाण जाण जाण    जहरी दुष्मनाला जाण रे   हे हे हे हे हे हे हे.     सैतान काळा गोरा,   चिमटीत जीव कोरा,   रंगाचा करी मारा,   मरणाचा चढे पारा,   रंगाचा खेळ खेळी,   कोरतो भेद भाळी,   मानव हे उभे जाळी,   जाळ्यात माय होळी.     अरारारारा हा!     हे रंग रंग रे,   आहा! (Chorus)   भंग भंग रे,   आहा! (Chorus)   भंग भंग रे...     (Chorus ⬇️)   रंगून भंगले,   भंगुन दंगले,   दंगुन गुंगले,   गुंगून दंगले.     ही निबीड जंगले,   आहा! (Chorus)   जंग जंगले,   आहा! (Chorus)   जंग जंगले...     (Chorus ⬇️)   धर्माची जंगले,   जातीची जंगले, ...
 
 
Comments
Post a Comment