Skip to main content

थोडंसं कॉम्प्युटर विषयी

 कॉम्प्युटर आपल्या रोजच्या जीवनातला एक महत्वाचा व अविभाज्य भाग झाला आहे. प्रत्येकाला त्याची गरज ही लागतच असते. आजच्या जगात तर अगदी प्रत्येकाला, मग त्याला त्याचं ज्ञान असो किंवा नसो. समाजात कॉम्प्युटरचं मोफत प्रशिक्षण देणे हे गरजेचं आहे. काही ठिकाणी मोफत शिकवतही असतील, पण ते लोकांपर्यंत किती पोहोचतं, हा मोठा प्रश्न आहे. शाळांमध्ये कॉम्प्युटरचं प्रशिक्षण देतात, पण तिथे अनेक मुलं एकत्रितपणे शिकत असल्यामुळे, काहींपर्यंत ते पोहचत नाही किंवा, ते ग्रुपमध्ये असल्यामुळे किंवा लहान मुलांमध्ये शिक्षकांच्या प्रती भय असल्यामुळे इतरांसमोर जे समजलं नाही ते विचारत नाहीत. ह्या सर्व बेसिक गोष्टी आपल्याला माहित आहेत.
 मुळात कॉम्प्युटरचा रोजचा वापर जो आहे, तो शिकण्यासाठी वेगळ्या क्लासेसची गरज नाही, तर थोडीशी इंग्रजीची गरज असते. कॉम्प्युटरवर आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं ते वाचूनच आपल्याला तो ऑपरेट करायचा असतो, आणि ती इंग्रजी जास्त कठीण नसते. पुढे काही ठिकाणी आपल्याला विविध बाबतीत अडचण येऊ शकते, जिथे दुसऱ्या कोणी जाणकार व्यक्तीने सांगायची गरज भासते. अशावेळी दुसऱ्याला विचारणे ठीक आहे; पण उगाच काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काही लोक स्वतः प्रयत्न करायचा टाळतात. अशा वेळी लोकांना असं वाटू लागतं की आपल्याला कॉम्प्युटर वापरायला येत नाही. अरे! प्रयत्न केल्यावरच तो वापरता येईल ना...
 अनेकदा मी असं अनुभवलं आहे की, मी माझ्या काही मित्रांना एखाद्या वेबसाईटची लिंक सांगितल्यावर त्यांनी मला असं विचारलं की, आता गूगलवर जाऊन काय करायचं? आपण एखाद्याला आपला फोन नंबर दिला तर तो टेलिफोन डिरेक्टरीमध्ये परत शोधेल का; की सरळ फोन लावेल? असंच वेबसाईटची लिंक आपल्याला माहित पडल्यावर ती सरळ अॅड्रेस बारमध्ये टाकून एन्टर केलं की ती साईट ओपन होते, तिला गुगलवर परत सर्च करायची गरज नसते. गुगल (Google.com) ही "सर्च इंजिन" आहे. लोक "गुगल" आणि "इंटरनेट" यात गल्लत करतात. काही जण तर रोज इंटरनेट वापरतात पण त्यांना "वेब ब्राऊजर" हा प्रकारच माहित नसतो. माझ्या कॉलेजची एक मैत्रिण फेसबुकवर आहे. आम्ही बऱ्याचदा चॅटींग करतो, ती काही गोष्टी शेअर करते, लाईक करते; म्हणजे तिला फेसबुक वापरायचं कसं हे माहित आहे. पण एकदा परीक्षेच्या वेळी तिने मला "वेब ब्राऊजर" काय असतं? हा प्रश्न विचारला... मी चकितच झालो. कॉलेजच्या प्रेझेंटेशनच्या वेळी मला जाणवलं की काहींना Presentation आणि ".ppt" यातला फरकच माहित नाही. प्रेझेंटेशन म्हणजे एखाधी गोष्ट सादर करणे आणि ppt चा अर्थ आपण जे स्लाईड्सच्या सहाय्याने "पॉवरपॉईंट" बनवतो त्याचं एक्स्टेन्शन .ppt हे असतं. आता एक्स्टेन्शन म्हणजे काय? ऑडीओ, विडीओ व इमेजच्या एक्स्टेन्शनचे काही उदाहरण:-
Audio:- mp3, amr, wav, wma, m4a
Video:- mp4, 3gp, wmv, mpeg, flv, avi
Image:- jpeg, bmp, png, gif
या एक्स्टेन्शन्सच्या माध्यमातून आपल्याला हे कळतं की, ती कोणत्या प्रकारची फाईल आहे. त्या फाईल्स ओपन करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरावे लागतात. सॉफ्टवेअरचा अर्थ, एखादी फाईल ओपन करण्यासाठी कॉम्प्युटरमधील विशिष्ट प्रकारचं माध्यम वापरणे, ज्याद्वारे आपण ती फाईल सविस्तर बघू शकतो.
 ह्या सर्व जनरल गोष्टी सर्वांना माहित असायला हव्या, ज्याविषयी मला बरेच धक्कादायक अनुभव आले. मी या लेखातून कोणाला हिणवण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर या गोष्टींची जाणीव करवून देत आहे; जेणेकरून आपण या गोष्टींवर विचार करून पुढे सर्वप्रथम स्वतः प्रयत्न करू...

धन्यवाद!

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…