Skip to main content

Posts

Showing posts with the label पेशवाई

"१" इतिहास मुक्तीचा

१ जानेवारी १८१८ चा इतिहास कोणाला माहित आहे का? मला माहित आहे, विटाळ होत असेल या सत्याचा. अस्पृश्यांचा इतिहास आहे हा; जे लढले जुलमी पेशवाईच्या विरोधात. युद्ध नावाला होतं इंग्रज आणि मराठ्यांचं, खरं ते होतं हक्क, अस्मिता आणि जातिभेदाच्या उच्चाटनासाठी. अस्पृश्य आणि पेशव्यांचं युद्ध... कोणी शिकवलंच नाही शाळेत हे सर्व. शाळेत होता इतिहास हरलेल्या लोकांचा कारण की ते स्पृश्य होते. मग ते हरलेले का असेनात, पानिपतात किंवा महाराष्ट्रात... त्या दिवशी युद्ध सुरु होण्याआधी शिरूरहून भीमा कोरेगावात महार बटालियन ४३ किलोमीटर उपाशी पोटी मार्च करत आले. सकाळीच पेशव्याचे सैनिक हजर झाले; वीस हजार घोड्यावर स्वार, आठ हजार पायी तयार. असं सैन्य त्या पेशव्यांचं, जवळजवळ ३० हजार सैनिकांचं... त्यातले दोन हजार आधीच पळून गेले होते. महार बटालियन पाचशेच होते. बारा तास युद्ध चाललं, पाचशेच्या सैन्याने २८ हजारांना कापलं. जुलमी पेशवाईला तोडलं, आणि मनुवादी शक्तीला संपवलं. हा इतिहास शाळेच्या पुस्तकात एखाद्या पानावर छापला तर मुलांना लक्षात तरी येईल की पेशवाई तर संपली, पण ती कशी... हे सांगताना त्यांना "त्या" सैन्यांचं...