Skip to main content

Posts

Showing posts with the label कॉम्प्युटर

थोडंसं कॉम्प्युटर विषयी

 कॉम्प्युटर आपल्या रोजच्या जीवनातला एक महत्वाचा व अविभाज्य भाग झाला आहे. प्रत्येकाला त्याची गरज ही लागतच असते. आजच्या जगात तर अगदी प्रत्येकाला, मग त्याला त्याचं ज्ञान असो किंवा नसो. समाजात कॉम्प्युटरचं मोफत प्रशिक्षण देणे हे गरजेचं आहे. काही ठिकाणी मोफत शिकवतही असतील, पण ते लोकांपर्यंत किती पोहोचतं, हा मोठा प्रश्न आहे. शाळांमध्ये कॉम्प्युटरचं प्रशिक्षण देतात, पण तिथे अनेक मुलं एकत्रितपणे शिकत असल्यामुळे, काहींपर्यंत ते पोहचत नाही किंवा, ते ग्रुपमध्ये असल्यामुळे किंवा लहान मुलांमध्ये शिक्षकांच्या प्रती भय असल्यामुळे इतरांसमोर जे समजलं नाही ते विचारत नाहीत. ह्या सर्व बेसिक गोष्टी आपल्याला माहित आहेत.  मुळात कॉम्प्युटरचा रोजचा वापर जो आहे, तो शिकण्यासाठी वेगळ्या क्लासेसची गरज नाही, तर थोडीशी इंग्रजीची गरज असते. कॉम्प्युटरवर आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं ते वाचूनच आपल्याला तो ऑपरेट करायचा असतो, आणि ती इंग्रजी जास्त कठीण नसते. पुढे काही ठिकाणी आपल्याला विविध बाबतीत अडचण येऊ शकते, जिथे दुसऱ्या कोणी जाणकार व्यक्तीने सांगायची गरज भासते. अशावेळी दुसऱ्याला विचारणे ठीक आहे; पण उगाच काही प...