Skip to main content

Posts

Showing posts from July, 2012

समज

काहीतरी सुचतं, पण सुचेनासं होतं, काहीतरी कळतं, पण वळेनासं होतं, "करुणेच्या" भाषेला "प्रेमाचं" ओझं, आणि खुंटलेल्या बुद्धीला बोलेनासं होतं. प्रगल्भ बुद्धीने खरं-खोटं होतं, पण संकुचित मनाला सांगणं कसलं, मी पणाचं ढोंग घेऊन समजत नाही, त्या सरळ व्यक्तीला वळण कसलं !!! - आशित साबळे.

सेन्सॉर

 आजच्या आधुनिक जगात, लोकांना असं वाटू लागलं आहे की आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारल्याने प्रगती करू. पण पाश्चात्य देशांतील कोणत्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे त्याचा विचारही हे लोक करत नाहीत. आजचे चित्रपट वा जाहिराती पाहिल्या, तर त्यामध्ये मूळ गोष्टीचा आशय कमी आणि अश्लीलता जास्त दिसते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ह्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड पास तर करतच, पण ते ही "युनिवर्सल" सर्टीफिकेट सह! जे चित्रपट "अडल्ट" कॅटेगरीमध्ये येतात त्यांना युनिवर्सल श्रेणीचं प्रमाणपत्र का व कसं दिलं जातं? माझ्या मते याचं उत्तर असं असेल, की चित्रपट बनवणाऱ्यांना त्यांचा प्रेक्षकवर्ग अधिक वाढवायचा असेल (साहजिकच पैशांसाठी), म्हणून ते सेन्सॉर बोर्डमध्ये अधिकाऱ्यांना लाच देऊन असे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करत असतील.  याचा दुष्परिणाम संपूर्ण समाजावर होतो, त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये तो अधिक लवकर रुजतो. कारण जे चित्रपट प्रौढांसाठी असतात, ते हे लहान मुलं पाहतात, आणि बऱ्याचदा याचं अनुकरण होताना दिसतं. उदाहरणार्थ; आजला शाळेतली लहान-लहान मुले-मुली (अगदी ५वी-६वीचे) "गर्लफ्रेंड-बॉ

आजोळची आठवण...

एकदा जायचं होतं अजोळला, लहानपणचे दिवस आठवले. डोळ्यासमोर ते चित्र येऊन, माझे डोळे पाणावले. आजी - आजोबाचं प्रेम मी खूप अनुभवलेले, आता गावी जाऊन आंबे खायचे होते. त्या चिमुकल्या डोक्यावरून ते सुरकुतलेले हात फिरले, अल्लड मन असून अंग माझे शहारले. काहीच समज नसताना त्यांच्या डोळ्यातले प्रेम मला जाणवले, आणि आंबे खायचे सोडून मी त्यांचेच पापे घेतले. जगण्यासाठीचे त्यांचे श्रम कळतच नव्हते, पण जे काही मागितलं ते लगेचच मिळायचे ! ते दिवस आठवून मन माझे आनंदी झाले, पण आज तेच गाव वाटते वाळवंटलेले... प्रवासात असताना मी त्याच विचारात गुंतलेलो, पण अचानक मला अजोळला जायचे कारण आठवले. कारण होतं असं, की मला एक फोन आलं, आणि तिकडून ते म्हणाले की आजोबा गेले..... - आशित साबळे.

"महामानव" : हे विशिष्ट जातीचे/धर्माचे नाही तर संपूर्ण समाजाचे असतात.

 आजच्या काळात आपल्या समाजामध्ये "जमातवादी राजकारण" खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे. अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या महामानवांचे नाव घेऊन व लोकांचा वापर करून आपला स्वार्थ साधत आहेत. अज्ञानी लोक त्यांच्या दिखाऊ भूमिकेच्या आहारी जाऊन बळी पडतात आणि आतलं "राजकारण" समजूनच घेत नाहीत. आजपर्यंत जेवढ्या पण (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष) राजकीय पक्षांमुळे दंगली झाल्या, त्यामध्ये वरच्या लोकांना काही फरक पडला नाही, तर त्यात बळी पडला तो सर्वसामान्य समाजच.    आज आपण पाहू शकतो की शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर काही महापुरुषांचं नाव घेऊन किती चुकीचे काम चालतात.   शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदू धर्म, हिंदुत्व, हिंदुत्ववाद वाढवणे आणि मुसलमानांचा द्वेष करणे अशा गोष्टी दिसतात. बोलतात शिवाजी महाराज हे "हिंदवी स्वराज्य" संस्थापक आहेत. महाराजांनी कधीच कोणाचाच जात-धर्म पाहिला नाही. ते फक्त स्वराज्यासाठी लढले. तो काळ पाहिला तर त्यावेळी लोक फक्त आपले राज्य वाढवण्यासाठी लढायचे, शिवाजी महाराजांनी आपल्या हक्काचे, रयतेचे राज्य जिंकले, हिंदू "धर्माचे" नाही. आताच्

31st नाईट : ती रात्र

 कालची संध्याकाळ काही वेगळीच होती. खूप काही नवीन अनुभवलं. आमच्या एका मिडियाच्या सरांनी (सांध्य यांनी) एक नाटक लिहिलं. त्या एकांकिकेमध्ये त्यांनी एक मुलगा व एक मुलगी अशा दोघांचं संभाषण व्यक्त केलेलं आहे. पण व्यक्ती जाणवतात मात्र अनेक. विषय थेट मनाला भिडतो, हृदयाला स्पर्श करतो, अंगावर शहारे आणतो. या जगातील लोकांची मानसिकता काय आहे? याची जाणीव करून देतो.  पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असतो याचे चित्रण "सांध्य" यांनी केलंय. ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्ष सुरु होताना ती "फॉरवर्ड युवा पिढी" काय करते... बारमध्ये दारू पिणं, रेव पार्टी, ड्रग्स घेणं, नशा करणं, सेक्स करणं या गोष्टी त्या दिवशी सर्रास होत असतात. माणसाचं मन संकुचित असतं, मानसिकता तयार झालेली नसते (किंवा "त्या" प्रकारची मानसिकता तयार झालेली असते), पाश्चिमात्य संस्कृती चुकीच्या प्रकारे आपल्या जीवनात आणणे, याच गोष्टी त्याच्या डोक्यात कायम फिरत असतात. आजच्या बऱ्याच मुलांचा/पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन म्हणजे "डोळ्याने बलात्कार करणे" असाच आहे. दृष्टीकोन न बोलता मी क

लोकशाहीर विठ्ठल उमप : मृद्गंध पुरुस्कार

 काल रात्री "लोकशाहीर विठ्ठल उमप : मृद्गंध पुरुस्कार" सोहळ्याला गेलो होतो. "महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे" आले होते. सोबतच सुलोचना चव्हाण, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, जॉनी लीवर, भरत जाधव, इत्यादी नामवंत कलाकार आले होते. एवढे मोठमोठे कलाकार पाहून फार आनंद झाला. सोहळ्याची सुरुवात राजाराम जामसांडेकर, विजय चव्हाण व इतर उत्कृष्ट वादकांच्या जुगलबंदीने झाली. कार्यक्रमात नंदेश व उदेश उमप ने स्वतःच्या आवाजाने वेगळीच बहार आणली. शेवटी शाहीर साबळे यांनी महाराष्ट्रागीताची झलक ऐकवली, त्यांचासोबत त्यांचा नातू "केदार शिंदे" पण गायीला. वक्त्यांचे आनंदाचे शब्द ऐकून मन प्रफुल्लित झालं.  लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी "जय भिम" म्हणून आपले प्राण सोडले. त्याच शाहिराला मनाचा "जय भिम".

रात्रीची रेल्वे आणि स्त्री

 काही दिवसांपासून रात्री उशिरा पर्यंत रेल्वे ने प्रवास करतोय. कांदिवली ते दादर भावासोबत ये जा आजकाल सुरूच आहे. काल रात्री १.३० च्या सुमारास दादरला घरी आलो. येताना प्रत्येक ट्रेनचं निरीक्षण करत असताना बरेच पुरुष स्त्रियांच्या डब्यात प्रवास करताना दिसले. रात्री काहीतरी १०-११ च्या नंतर स्त्रियांच्या डब्यात पुरुषांना प्रवास करायची परवानगी देणे ही किती मुर्खासारखी गोष्ट आपल्या सरकारने केली आहे.  एवढे सारे प्रकरण समोर येऊनसुद्धा आपल्या सरकारचे डोळे उघडत नाहीयेत. ज्या वेळी स्त्रियांना जास्त सुरक्षेची गरज असते, त्यावेळी नेमकं "पुरुषांना" डब्याच्या आत परवानगी ! अत्याचार होत असताना अनेक स्त्रिया त्याचा प्रतिकार करतील ही, पण अशा वेळी एक (एकटी) स्त्री काय करणार!  बातम्या, वृत्तपत्र, टी.व्ही., इत्यादींद्वारे आपणास तुरळक गोष्टी कळतात, पण घडलेल्या असतात त्याहूनही कित्येक पट जास्त. ती गोष्ट वेगळी की स्त्रियांनी स्वतःलाच कुमकुवत बनवून ठेवलं आहे. पण काळाची गरज आहे ती त्यांना बळावण्याची.  पोलीस असतात, इतर चांगले लोक लक्ष ठेवतील, त्याने स्त्रियांचं संरक्षण होईल; ह्या सगळ्या नंतर च्या गोष्टी

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.
सहन करू नका, विद्रोह करा. डरपोक राहू नका, बंडखोर बना.  - आशित साबळे
आयुष्यात काहीही होण्यासाठी स्वतःला घडवावं लागतं, आणि स्वतःला घडवण्यासाठी सामाजिक जाणीव असणं महत्वाचं असतं...  - आशित साबळे.