Skip to main content

Posts

Showing posts from June, 2014

पेच

जगण्यासाठी
गुदमरून
पेचात अडकलेल्या
जिवाभोवती
आकांततांडव होतोय;
विलासासाठी, स्वार्थासाठी.

हृदयातल्या, छातीतल्या
मानसिक कळा,
थरथरते हात,
आवळत जाणाऱ्या मुठ्या
आणि लाल डोळे,
घेऊन जात आहेत मला भविष्यात
पुढच्या क्षणातल्या.

वर्तमानात येताच
वर्तमान दाखवतोय
माझं वर्तमान काळ,
आणि
तांडव थांबवण्यासाठी
उभा राहतोय मी एकटाच.

न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावरची पट्टी
काढून
अन्यायाच्या गळ्याभोवती
गुंडाळावीशी वाटतेय
फासासारखी,
न्यायासाठी, संघर्षासाठी, विद्रोहासाठी...

- आशित रजनी.