Skip to main content

Posts

Showing posts with the label धर्म

कसले हे बौद्ध...

 बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त...

माझा धर्माविषयीचा दृष्टीकोन...

 धर्म ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जुडलेली आहे. यापासूनच आपण कोणत्या पद्धतीने जगायचं हे शिकतो. आपण लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीत अशा पद्धतीने घडलो आहोत की, आपण धर्माविषयी टीका करत नाहीत, पटत नसतील तरीही त्याच्या जुन्या रुढीपरंपरे विरुद्ध बोलत नाही. इथूनच आपली मानसिकता अशा पद्धतीने घडते की, 'जे चाललंय ते चालू द्या...' मग पुढे येणाऱ्या पिढ्यांवरही तेच संस्कार होतात आणि २१व्या शतकातही तीच परिस्थिती दिसते जी पूर्वी असायची.  आज आपण पाहतो की, लोक बदलले नाहीत. धर्माच्या नावावर तंत्र, मंत्र, यज्ञ, हवन, जादूटोणा, ई. गोष्टी आजच्या आधुनिक काळात घडत आहेत. मुळात धर्म म्हणजे काय, तो कोणासाठी व कशासाठी असतो, धर्माचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध आहे, हे जाणून घेण्याची कुवत त्यांच्यात नाही, किंवा असं म्हणता येईल की त्यांनी चुकीच्या अर्थाने धर्म हा आत्मसात केला. प्राचीन काळापासून घडत आलेल्या चुकीच्या गोष्टी आपण फेकून दिल्या पाहिजेत, कारण आपल्याला त्याची माहिती व पुरावे मिळाले आहेत की त्याचा मानवाशी काही एक संबंध नाही किंवा ते उपयोगी नाही. धर्म किती जुना वा प्राचीन असल्याने त्याची महानता ठरत...

गणेशोत्सव

काय हिंदू धर्मीय खरंच गणेशोत्सव एक "धार्मिक" सण म्हणून साजरा करतात का?  बऱ्याच वर्षांपासून मी पाहतोय की गणेशोत्सव आला की लोक खुश होतात, पण त्यांचं खुश होण्याचं कारण नक्की काय याचं उत्तर आता दिसू लागलं आहे. मी समस्त हिंदू समाजाबद्दल बोलत नाहीये; पण काल घरी येताना बरेच मंडळी गणेश विसर्जनासाठी जाताना दिसले. गणपती मागे आणि पुढे "चिकनी चमेली" आणि "हलकट जवानी" सारख्या गाण्यांवर "बाप्पाचे भक्त" नाचत होते. त्या लोकांच्या गर्दीत काही जण कोल्डड्रिंकमध्ये दारू मिसळून बारी बारीने पित होते. विसर्जन करून आल्यावर सगळीच मुले रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या अंगावर त्यांच्या नकळत गुलाल उधळत होते. दारूच्या नशेत असणाऱ्या माणसांबद्दल तर सांगायलाच नको.  सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करताना टिळकांनी सांगितलं होतं का की, गणपतीच्या स्वागतासाठी आणि विसर्जनासाठी बॅंडबाजा, फटाके हे अपरिहार्य आहेत. काही वर्षांपूर्वी एका गावामध्ये जल्लोषात गणपतीला घेऊन चालले होते. त्यावेळी एकाने अगदी रस्त्याच्या मधोमध 'रस्सी बॉम्ब' लावला आणि गाड्यांना थांबवलंसुद्धा नाही. त्यावरून एक रि...

भारतीय राजकारणात धर्माला घेऊन केले जाणारे सत्ताकारण

 भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास ६५ वर्ष झाली. या देशावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केलं. त्याहीपूर्वी प्राचीन भारतच्या इतिहासात समाजावर धर्मानेच राज्य केले आहे. धर्म जे सांगेल, त्याचे नियम पाळणे अनिवार्य होते. पण जेव्हा इंग्रज भारतात आले, त्यावेळी धर्माची सत्ता कमी झाली. परंतु अप्रत्यक्षरित्या इंग्रजांच्या सत्तेसोबत त्यांचा ख्रिस्ती धर्मसुद्धा भारतात आला. या सर्व गोष्टींवरून आपल्या हे लक्षात येऊ शकते की, धर्म आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी असून ते कुठेतरी जुळलेले आहे. किंबहुना राजकारणी ते जोडत आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना समिती स्थापन करण्यात आली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांमध्ये राज्यघटना तयार झाली. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे "भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे". स्वतंत्र भारताची राज्यघटना मान्य झाल्याच्या पुढे देशाने या तत्त्वांवर चालायला हवं होतं. पण आज आपल्या देशात काय दिसून येतं ते, धर्म, जाती व जमातवादी राजकारण. "जिथे" आपण भारताला धर्मनिरपेक्ष म्हणतो "तिथेच" आपण एखादा विशिष्ट "वाद"...

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरस...

स्त्री आणि पती

 पती कसा असावा? या विषयावर तर मी नक्कीच बोलणार नाहीये. कारण हा मुद्दा फार नंतर उदयास आला. हे का निर्माण झालं असावं? यावर मी "माझे विचार" मांडणार आहे... इतिहासापेक्षा आपण आजचेच संदर्भ पाहू, तुमच्या लगेच लक्षात येईल, की पती ही संकल्पना निर्माण होताना नक्की काय झालं असावं.  पती म्हणजे एखाद्या सजीव किंवा निर्जीव गोष्टीचा मालक. आज आपण लखपती म्हणतो तो असतो लाखो रुपयांचा मालक, करोडपती म्हणतो तो असतो करोडो रुपयांचा मालक, तसंच आपण फक्त "पती" म्हणतो तो असतो एखाद्या स्त्रीचा मालक. आता आपण जातो ते इतिहासातील स्त्रीदास्य, गुलामगिरी, अतिशूद्र ह्या गोष्टींकडे. बुद्ध काळापूर्वी स्त्रीसत्ता / मातृसत्ता होती, त्याच दरम्यान गणकाळ आला. त्याच्या काही काळानंतर आर्य भारतात आले. त्या आर्यांनी भारतातील लोकांवर सत्ता मिळवण्यासाठी एक विशिष्ट वर्ग निर्माण केला, तो होता ब्राह्मण वर्ग. (इथे आजची ब्राह्मण जात समजू नये, तर ब्राह्मण या 'शब्दाचा अर्थ' मला अभिप्रेत आहे.) त्या ब्राह्मण वर्गाने इथल्या मूळच्या लोकांना मुर्ख बनवून त्यांच्यावर शासन करण्यासाठी वेद, पुरण, वेदांत, आरण्यके, उपनिषद,...

धर्मासाठी

धर्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. आपण 'एखाद्या' धर्माबद्दल बोलत असू तर तो 'विशिष्ट' प्रकारे जीवन जगण्याचा मार्ग असतो. धर्म ही संकल्पना फार पूर्वी उदयास आली पण त्या संकल्पनेला नाव मिळालं नव्हतं. आपल्या पूर्वजांपासून जे काही कार्य, व्यापार, संस्कृती, कला किंवा कसलाही व्यवहार चालत आलेला असतो, तो पुढची पिढी चालवत असते, त्यालाच ते आपला धर्म मानतात. आणि त्यानुसारच ते आपलं आयुष्य चालवतात. इतिहास पाहिला, तर पूर्वी लोक भटके होते. ते खाण्यापिण्यासाठी ठिकठिकाणी फिरत होते. समाज फार विचलित होता. ही परिस्थिती पाहून काही विद्वान लोकांना असं वाटलं की समाजाला काहीतरी चांगली शिकवण द्यावी जेणेकरून सर्वांना सुख-शांती लाभेल. असे अनेक संत, विचारवंत, तत्वज्ञानी जन्मास आले. काही महत्वाच्या महान लोकांचा इथे उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे चक्रधर स्वामी, बसवेश्वर महाराज, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर जैन, मोहम्मद पैगंबर; या सर्व लोकांनी समाजाला सुखी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी लोकांना फक्त चांगले उपदेश दिले, ते काही "आज एक नवीन धर्म सुरु करुया" या उद्देशाने घरातून नाही निघाले. त्...

"महामानव" : हे विशिष्ट जातीचे/धर्माचे नाही तर संपूर्ण समाजाचे असतात.

 आजच्या काळात आपल्या समाजामध्ये "जमातवादी राजकारण" खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे. अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या महामानवांचे नाव घेऊन व लोकांचा वापर करून आपला स्वार्थ साधत आहेत. अज्ञानी लोक त्यांच्या दिखाऊ भूमिकेच्या आहारी जाऊन बळी पडतात आणि आतलं "राजकारण" समजूनच घेत नाहीत. आजपर्यंत जेवढ्या पण (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष) राजकीय पक्षांमुळे दंगली झाल्या, त्यामध्ये वरच्या लोकांना काही फरक पडला नाही, तर त्यात बळी पडला तो सर्वसामान्य समाजच.    आज आपण पाहू शकतो की शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर काही महापुरुषांचं नाव घेऊन किती चुकीचे काम चालतात.   शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदू धर्म, हिंदुत्व, हिंदुत्ववाद वाढवणे आणि मुसलमानांचा द्वेष करणे अशा गोष्टी दिसतात. बोलतात शिवाजी महाराज हे "हिंदवी स्वराज्य" संस्थापक आहेत. महाराजांनी कधीच कोणाचाच जात-धर्म पाहिला नाही. ते फक्त स्वराज्यासाठी लढले. तो काळ पाहिला तर त्यावेळी लोक फक्त आपले राज्य वाढवण्यासाठी लढायचे, शिवाजी महाराजांनी आपल्या हक्काचे, रयतेचे राज्य जिंकले, हिंदू "धर्माचे" नाही. आताच्...