Skip to main content

Posts

Showing posts from August, 2012
Laughing on others' sorrows, are the worst people in the world...
- Aashit Sable.

वंदन महाराष्ट्राला

ही मराठी अमुची, बोली अमुची, संस्कृती मराठी.
ज्ञानात अमुच्या, तुकात अमुच्या, सोयरी मराठी.
अशी संपन्न संत परंपरा या महारष्ट्रा लाभली,
विषमता भाव सहन केला,
वंदितो चोखाच्या त्या चरणी...
तूच अमुचा तारणहारा शिवबा,
तूच अमुचा धनी,
जिजाऊ सारिख्या आईने तुजसारिखी महान व्यक्ती घडविली.
जिवाजीनं कापला शत्रूचा हात,
बाजीप्रभूनं हादरली पावनखिंडी.
तलवारी हाती घेण्याआधी तू शिवा फिरविल्या सोन्याच्या नांगरी...

या भूमीवर जन्मास एकच ते महात्मा,
राष्ट्रपिता संबोधितो मी, त्यांचं नाव आहे जोतीबा.
उघडी केली शिक्षणाची दारं,
दाखविली ज्ञानाची जोती,
साथ दिली क्रांतीसुर्याला आमची माय ती सावित्री.
जातीभेद मोडून शिकविली शूद्रांची पोरं,
आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज.
अज्ञानी समाजाला दिले त्यांनी ज्ञान भरपूर,
धर्मांधांना केले सरळ, ते होते प्रबोधनकार.
दलितांची हाक ऐकून आले जन्मास आंबेडकर,
खूप शिकुनी मोठे झाले घटनेचे शिल्पकार,
राज्यघटनेत दिले त्यांनी आपणास मताधिकार,
समता, स्वतंत्रता, बंधुभाव करू आपण अंगीकार.

झाला सुरु लढा या संयुक्त महाराष्ट्राचा,
गेला बळी अमुच्या अनेक हुतात्म्यांचा,
महारक्षकांच्या महाराष्ट्राला लाभला …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

शिवी

आजच्या युवा पिढीला काही गैरसमज आहेत की शिव्यांशिवाय भाषा नसते, किंवा कालच्या पिढीला याची जाणीव नसल्यामुळे त्यांना याचं आश्चर्य वाटत असेल. मी कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे मला याचा फार अनुभव आला आहे की, साध्या वाक्यांमध्येसुद्धा एकातरी शिवीचा वापर होतो. जास्त आश्चर्य याचं की, त्या शिव्या स्त्रीवाचक असतानाही मुलीसुद्धा ते शब्द सर्रास उच्चारतात; आणि त्याहून अधिक आश्चर्य याचं की आपल्या समाजावर पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे इतका परिणाम झाला की एखाद्यावर राग व्यक्त करणे यासाठी शिवीच तोंडी येते. अगदी चांगल्या मनःस्थितीत असताना एखादा मित्र भेटला, तेव्हासुद्धा शिवीच!
 जर कोणी शिवी देत असेल तर त्यावर माझं एकच मत आहे की, तुम्ही शिवी देतात ती स्त्रीवाचक असते. जास्तीत जास्त शिव्यांमध्ये स्त्रियांच्या अवयवांचा उल्लेख असतो. तर शिवी देणाऱ्याने एकच लक्षात ठेवावे की, तो स्त्रीवाचक शिवी देत असेल तर ती शिवी संपूर्ण स्त्री जातीला (त्याच्या मानसिकतेनुसार) लागू होते, त्याच स्त्री जाती मध्ये त्याची आई, बहिण, इत्यादी जवळील स्त्रिया समाविष्ट होतात हे साहजिक आहे. मग शिवी देणारा जेव्हा शिवी देतो, तीच शिवी त्याचाच आ…

Women Property Rights - Dr. B.R. Ambedkar

Most women in India don't know that their present property rights were first proposed by Dr Ambedkar in Hindu Code Bill 1951 which was rejected by Nehru. Because of this tussle, Dr Ambedkar resigned from the Law Ministry, not in the capacity of a "Dalit icon" as propounded by false media today but as a true nationalist whose ideas belonged to 21st century. The property rights of women were ultimately recognised by the government in the form of Hindu Succession (Amendment) Act 2005, 54 years after Dr Ambedkar introduced it.

Share it so that this fact comes into the knowledge of every woman in this country.

स्त्री आणि पती

पती कसा असावा? या विषयावर तर मी नक्कीच बोलणार नाहीये. कारण हा मुद्दा फार नंतर उदयास आला. हे का निर्माण झालं असावं? यावर मी "माझे विचार" मांडणार आहे...
इतिहासापेक्षा आपण आजचेच संदर्भ पाहू, तुमच्या लगेच लक्षात येईल, की पती ही संकल्पना निर्माण होताना नक्की काय झालं असावं.
 पती म्हणजे एखाद्या सजीव किंवा निर्जीव गोष्टीचा मालक. आज आपण लखपती म्हणतो तो असतो लाखो रुपयांचा मालक, करोडपती म्हणतो तो असतो करोडो रुपयांचा मालक, तसंच आपण फक्त "पती" म्हणतो तो असतो एखाद्या स्त्रीचा मालक. आता आपण जातो ते इतिहासातील स्त्रीदास्य, गुलामगिरी, अतिशूद्र ह्या गोष्टींकडे. बुद्ध काळापूर्वी स्त्रीसत्ता / मातृसत्ता होती, त्याच दरम्यान गणकाळ आला. त्याच्या काही काळानंतर आर्य भारतात आले. त्या आर्यांनी भारतातील लोकांवर सत्ता मिळवण्यासाठी एक विशिष्ट वर्ग निर्माण केला, तो होता ब्राह्मण वर्ग. (इथे आजची ब्राह्मण जात समजू नये, तर ब्राह्मण या 'शब्दाचा अर्थ' मला अभिप्रेत आहे.) त्या ब्राह्मण वर्गाने इथल्या मूळच्या लोकांना मुर्ख बनवून त्यांच्यावर शासन करण्यासाठी वेद, पुरण, वेदांत, आरण्यके, उपनिषद, …

धर्मासाठी

धर्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. आपण 'एखाद्या' धर्माबद्दल बोलत असू तर तो 'विशिष्ट' प्रकारे जीवन जगण्याचा मार्ग असतो. धर्म ही संकल्पना फार पूर्वी उदयास आली पण त्या संकल्पनेला नाव मिळालं नव्हतं. आपल्या पूर्वजांपासून जे काही कार्य, व्यापार, संस्कृती, कला किंवा कसलाही व्यवहार चालत आलेला असतो, तो पुढची पिढी चालवत असते, त्यालाच ते आपला धर्म मानतात. आणि त्यानुसारच ते आपलं आयुष्य चालवतात.
इतिहास पाहिला, तर पूर्वी लोक भटके होते. ते खाण्यापिण्यासाठी ठिकठिकाणी फिरत होते. समाज फार विचलित होता. ही परिस्थिती पाहून काही विद्वान लोकांना असं वाटलं की समाजाला काहीतरी चांगली शिकवण द्यावी जेणेकरून सर्वांना सुख-शांती लाभेल. असे अनेक संत, विचारवंत, तत्वज्ञानी जन्मास आले. काही महत्वाच्या महान लोकांचा इथे उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे चक्रधर स्वामी, बसवेश्वर महाराज, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर जैन, मोहम्मद पैगंबर; या सर्व लोकांनी समाजाला सुखी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी लोकांना फक्त चांगले उपदेश दिले, ते काही "आज एक नवीन धर्म सुरु करुया" या उद्देशाने घरातून नाही निघाले. त्…

जीवघेणी दही हंडी

"दही हंडी" या सणात काय असं वैशिष्ट्य आहे की ज्यावर आज लाखो - करोडो रुपयांच्या स्पर्धा ठेवल्या जातात. ह्या सणाची सुरुवात हिंदू धर्मात मानल्या जाणाऱ्या भगवान श्री कृष्णापासून झाली. कृष्णाला लहानपणापासूनच दही - लोणी वगैरे खायला खूप आवडत होतं. घरी सारखं तो ते खाण्यासाठी हट्ट करायचा, बऱ्याचदा न सांगता ते खायचा आणि सांडवतही होता. म्हणून आई दही, ताक, लोणी यासारख्या गोष्टी त्याचापासून दूर ठेवायची जेणेकरून त्याचा हात तिथपर्यंत पोहचू नये. मग कृष्ण ते मिळवण्यासाठी पाय उंचावून, कशाकशावर उभा राहून प्रयत्न करायचा आणि ते मिळवायचा. तुम्ही यापुढची गोष्ट समजून घेण्यास सुज्ञ आहात हे समजून मी पुढे बोलतो...
अशी इथून ही सुरु झालेली दही हंडी आज कोणत्या "थराला" पोहोचली आहे ! ही सुरुवातच किती क्षुल्लक गोष्टीपासून झाली हे आपल्या लक्षात येते. आज हा सण साजरा करण्यासाठी लोकांनी मंडळ स्थापन करून तालिमी सुरु केल्या ! कशासाठी हे सगळं? जो खेळ क्षणात जीव घेऊ शकतो, हे माहित असतानासुद्धा पालक आपल्या मुलांना पाठवतात, याचं मला फार आश्चर्य वाटतं. बरं "कळतं पण वळत नाही" अशी गत असेल तर आपण वर्…

Fact:- Life. Importance. Feelings.

It's human nature, to earn importance in someone's life, and it's human feeling to feel the importance. Communication is very important to protect a healthy relation; due to lack of it, a time comes in our life where a friend becomes stranger. We should adjust ourselves in such a way, that no one will try to decrease our importance in their life. And we must live in such a way, that everyone will try to be important in your life...- Aashit Sable.