Skip to main content

Posts

Showing posts with the label धोका

जीवघेणी दही हंडी

"दही हंडी" या सणात काय असं वैशिष्ट्य आहे की ज्यावर आज लाखो - करोडो रुपयांच्या स्पर्धा ठेवल्या जातात. ह्या सणाची सुरुवात हिंदू धर्मात मानल्या जाणाऱ्या भगवान श्री कृष्णापासून झाली. कृष्णाला लहानपणापासूनच दही - लोणी वगैरे खायला खूप आवडत होतं. घरी सारखं तो ते खाण्यासाठी हट्ट करायचा, बऱ्याचदा न सांगता ते खायचा आणि सांडवतही होता. म्हणून आई दही, ताक, लोणी यासारख्या गोष्टी त्याचापासून दूर ठेवायची जेणेकरून त्याचा हात तिथपर्यंत पोहचू नये. मग कृष्ण ते मिळवण्यासाठी पाय उंचावून, कशाकशावर उभा राहून प्रयत्न करायचा आणि ते मिळवायचा. तुम्ही यापुढची गोष्ट समजून घेण्यास सुज्ञ आहात हे समजून मी पुढे बोलतो... अशी इथून ही सुरु झालेली दही हंडी आज कोणत्या "थराला" पोहोचली आहे ! ही सुरुवातच किती क्षुल्लक गोष्टीपासून झाली हे आपल्या लक्षात येते. आज हा सण साजरा करण्यासाठी लोकांनी मंडळ स्थापन करून तालिमी सुरु केल्या ! कशासाठी हे सगळं? जो खेळ क्षणात जीव घेऊ शकतो, हे माहित असतानासुद्धा पालक आपल्या मुलांना पाठवतात, याचं मला फार आश्चर्य वाटतं. बरं "कळतं पण वळत नाही" अशी गत असेल तर आपण वर्त...