Skip to main content

Posts

Showing posts with the label जादूटोणा

अंधश्रद्धा

 "साधू बाबा" या नावाचा व्यवसाय "२१व्या शतकात" जोरात चालला आहे. त्याचे दोन प्रकार दिसून येतात. ते म्हणजे मंत्र - जादूटोणा करणारे, आणि दुसरे उपदेश करणारे. आपल्या सर्वांना माहित आहे की जादूटोणा, करणी, वशीकरण, मुठ मारणे, ई. हे प्रकार किती वाईट आहेत. फक्त शब्दांच्या व मंत्रांच्या जोरावर इथे बसलेला माणूस दुरवर असलेल्या माणसाला कशी काय हानी पोहचवू शकतो! ही सर्वसाधारण गोष्ट आपल्याला कळते पण तरीही काही लोक त्या ढोंगी साधू बाबांकडे आपल्या समस्या घेऊन जातात, याच गोष्टीचा फायदा घेऊन ते लोक त्यांच्याकडे जाणार्यांकडून बक्कळ पैसे उकळतात. उगाचच आपण आपल्या वैयक्तिक गोष्टी त्यांना जाऊन सांगतो, त्या नाविलाजाचा फायदा ते पुरेपूर उचलतात. अशा वेळी आपल्याला त्या गोष्टीची भुरळ पडलेली असते. आपलं काम कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे, या भावनेने आपण समोरचा मागेल ते देऊन रिकामे होऊन जातो आणि ते ही मागचा पुढचा विचार न करता.  यातला अगदी भयानक व भीषण प्रकार म्हणजे "अघोरी विद्या". यामध्ये पशुबळी, नरबळी यासारख्या विकृत गोष्टी चालतात. या विद्येला अभ्यासणारे मांत्रिक फारच विद्रूप, विक्षिप...