Skip to main content

Posts

Showing posts from 2013

सर्व "...एत्तरांसाठी"

चावदारच्या लढ्यात पुढारी
फक्त भीम होता,
अस्पृश्यांना पाण्याचा स्पर्श देणारा
फक्त भीम होता,
फिरलात मागे पाणी पिऊन चवदारचे...
तुमच्या जगण्याच्या मागचं कारण
माझा भीम होता...

मंदिरात बंड करणारा
फक्त भीम होता,
काळ्या रामाला हादरवणारा
फक्त भीम होता,
देवळात जाऊन दगडासमोर नवस फेडणाऱ्यांनो
तुम्हालाच देवळात प्रवेश मिळवून देणारा
माझा भीम होता...

बुद्ध कबीर फुले यांना गुरु मानणारा
फक्त भीम होता,
त्यांचं तत्त्वज्ञान लोकांना सांगणारा
फक्त भीम होता,
आरक्षणाला नाव ठेवणार्यांनो ऐका...
तुमच्या शिक्षणाच्या हक्कामागे झटणारा
माझा भीम होता...

या देशातून जातीची घाण काढणारा
फक्त भीम होता,
तुम्हाला जनावरातून माणसात आणणारा
फक्त भीम होता,
खुशाल सोडून जा तुम्ही ६ डिसेंबर ला ही मुंबई...
तुमच्याच ह्या स्वातंत्र्याला संविधानात लिहिणारा
माझा भीम होता...

- आशित साबळे

संस्कृतीचे मक्तेदार आणि आपली लोककला

संस्कृती हा विषय म्हटलं तर खूप गुंतागुंतीचा आहे. आपण याला खूप सोप्या पद्ध्तानीने समजून घेऊ शकतो, पण जर हा विषय कठीण समजून राहिलं तर मग तो कळायलाही खूप कठीण आहे. खरं तर संस्कृती ही कलेमधून अधिक लवकर व सोप्या पद्धतीने रुजली जाते. त्याही अगोदर संस्कृतीला धर्माच्या माध्यमातून लोकांमध्ये रुजवलं गेलं. आजही अनेक कला किंवा लोककला ह्या हिंदू संस्कृतीच्या मानल्या जातात आणि बऱ्याच आहेतही. पण लोक भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती ही एकच मानतात. त्यातल्या त्यात गम्मत अशी आहे, की हेच लोक जेव्हा भारतीय संस्कृती इतरांना (परदेशी लोकांना, ई) दाखवत असतात तेव्हा ते हिंदू परंपरा, मंदिर, कला यांसोबत बौद्ध लेण्या, ताज महाल, लाल किला, इत्यादी हेही दाखवतात. जर का तुमच्या म्हणण्यानुसार हिंदू संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती आहे, तर मग इतर धर्माला का मध्ये आणतात? हे मध्ये आणतात कारण, मुळातच आर्यांनी आणि ब्राह्मणांनी त्यांची संस्कृती ही भारतातील मूळ बहुजनांवर भेसळ करून लादली. म्हणून आपल्याला कळतच नाही की, आपली संस्कृती कोणती आणि परकी कोणती!
 मुळतः भारतीय संस्कृती ही चार्वाक, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर यांच्या …

Excogitative

They are in the dark, boxed.
They are in the light, un-boxed.
The symbol of the knowledge, I know.
The wisdom of that symbol , I know.

The ideology of God isn't worth.
The philosophy of humanity is must.
Though you'll get the divine knowledge
on divine worshipping,
But the thought of science can be expiscated
only by great following.

- Aashit Sable

नको गं माय मले...

नको गं माय मले भंडाऱ्याले जायाचं,
तिकडं सारे मिळून खातात
न चोथा करून फेकतात,
उसाले नाही त पोरींले...

नको गं माय मले दिल्लीले जायाचं,
तिकडं रस्ते सवेरेचे का रातचे,
लोक उजेडात पाहतात,
न रात्री चटके देतात मोम्बत्तीने...

नको गं माय मले मुंबईले जायाचं,
सारे मावटे, कुनी कोणाचं नाय,
समोर संत असल्याचे वागतात,
मागून वासना फुटते डोळ्याले...

नको गं माय मले पटनाले जायाचं,
जात विचारतात बोलाय्ले
न देह बघतात चोळायले,
ह्य कायले विचारलं,
तर वास सुटतो जंगलायले...

- आशित साबळे

Understanding Ambedkar & Ambedkarism

Dr. Bhimrao Ambedkar was born on 14th April 1891 in a military cantonment in Mahu town of Madhya Pradesh. He was a political leader, philosopher, anthropologist, historian, orator, economist, teacher, editor (journalist), writer, revolutionary and a revivalist for Buddhism in India. He was the first Law Minister of India and also the Minister of Labor, Energy, Public Constructions & Water Resources. He was the chairman of Constitution Drafting Committee and became the chief architect of the Indian Constitution. In British India, only kings, dignitaries, degree holders & tax payer rich people was having the right to vote for any election; in this era, the first person who said, “Every person should get equal rights of voting for elections”, not only in India but in the whole Asia was Dr. B.R. Ambedkar.

  In his early life, he faced many difficulties in education because of his caste. He was born to Bhimabai & Ramji Sakpal in a poor Mahar caste, which was treated as untou…

भेगातून आलोय मी...

म्या बा शेतमजूर मालक,
काहीतरी करून खाईन...
येका तरी येळची भाकर,
पोटासाठी लई व्हईन...
दुस्काळानं हिंडतो गावागावा,
कुनीतरी तरी घोटभर पानी द्यावा,
कोरड पडली जल्माला,
घसा तरी वला करून परत जाईन...

रडू न्हगं रं लेकरा,
जे डोळ्यात हाय, ते बी सुकून जाईन...
बगा बगा व लेकरू माझं,
चिरकुन घसा कोरडा पडलाय,
डोळ्यातून पानी येईना झालं,
म्हनत आसन तितकं तरी चाटायला व्हईन...

तिकडं म्हनं हजारो लिट्राच्या पिचकाऱ्या उडीवतेत,
कुनीतरी घेऊन चला ना तिकडं,
धर्माच्या नावावर का व्हईना, खोटारडे जमतेत तिकडं,
म्या बी निसर्गानं दिलेलं पानी पिईन...
लाजा वाटान्हात त्यान्ला, हिकडं काय झालंय ते म्हाईत न्हवं का,
वाटलं न्हवतं आमचंच खाऊन आमच्यावरच उलटे व्हतीन...

लय भ्याव वाटतंय गुरांचे सांगाडे बघून,
गावाकडं शिरप्या माझा काय म्हनीन...
जित्ता जातोय का घरला ते बी ठावं न्हाय,
कुनाला म्हाईत आता आमचं काय व्हईन...- आशित साबळे.

जय महाराष्ट्र की, जय भीम !

एक विचित्र अनुभव माझ्या आयुष्यात आला. मी ज्या महान लोकांना मानतो, ज्यांचा आपण आदर केला पाहिजे, ज्यांनी ह्या समाजासाठी मोठं कार्य केलं, ज्यांनी जुन्या रुढी-परंपरा, अंधश्रद्धा, जाती-व्यवस्था, गुलामगिरी, अशा अनेक गोष्टींविरोधात लढले; अशा महान लोकांचा मी आदर ठेऊन, स्वतःला पुरोगामी विचारांचा मानतो. बुद्ध-शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो. इतिहासातील सर्व जाती-अंताच्या चळवळीच्या महापुरुषांना, विशेषतः गौतम बुद्ध व महात्मा फुले यांना गुरु मानून ज्यांनी आपल्याला स्वतंत्र भारताची राज्यघटना देऊन या भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्याचं कार्य केलं, जे आयुष्यभर समाजातून जातींमुळे होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढत राहिले, ज्यांनी खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य प्राप्त करवून दिलं, दलित-शोषित-पिडीतांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्याचा व शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला, अशा महापुरुषाला अभिवादन करून, त्यांचं कार्य डोळ्यासमोर आणून मी व भारतातील करोडो लोक "जय भिम" बोलतो.
 माझ्या एका जवळच्या मित्राने त्याचे विचार माझ्यासमोर मांडले आणि मला ध…