Skip to main content

Posts

Showing posts with the label महाराष्ट्र

लोकशाहीचा राँग टर्न

(टीप: हा लेख निवडणुका संपल्यावर जवळपास एक आठवड्याने लिहिला होता. याला काही वर्तमानपत्रांत प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न केले, पण  त्यांच्याकडून योग्य ती  प्रतिक्रिया न मिळाल्याने मी तो संपूर्ण लेख इथेच, माझ्या ब्लॉगवर पब्लिश करत आहे.) समजा, आपण एखाद्या वाहनात बसून चाललो आहोत आणि आपल्या चालकाला आपण सरळ जाण्यास सांगितलं पण अचानक चालकाने भलतीकडेच गाडी वळवली तर आपण त्याला विचारणार, प्रश्न करणार. त्याने जरी उत्तर दिलं की आपण योग्य रस्त्यावर आहोत, किंवा हा रस्ता चांगला आहे, किंवा इथून आपण लवकर पोहोचू, तरी आपल्या मनात संकोच असतोच. पुढे बराच वेळ प्रवास करून आपण आपल्या योग्य ठिकाणी पोहोचलोच नाही आणि तरी चालक गाडी बेधुंदपणे चालवत आहे आणि आपल्याला रस्ता ओळखीचा वाटत नाही, तेव्हा आपण त्याला रागवणार, ओरडणार, भांडणार आणि गाडीतून उतरणार किंवा स्वत:ची गाडी असेल तर त्याला गाडीबाहेर काढून स्वत: योग्य ठिकाणी पोहोचणार. पण आपण असं करत नाही आहोत. आपण चालकाला प्रश्नच विचारत नाहीत. आपल्या वतीने प्रश्न विचारायलासुद्धा कोणी नाही. हेच आज आपल्या देशात आणि राजकारणात होतंय! नुकत्याच पार पडलेल्या लोक...

जय महाराष्ट्र की, जय भीम !

 एक विचित्र अनुभव माझ्या आयुष्यात आला. मी ज्या महान लोकांना मानतो, ज्यांचा आपण आदर केला पाहिजे, ज्यांनी ह्या समाजासाठी मोठं कार्य केलं, ज्यांनी जुन्या रुढी-परंपरा, अंधश्रद्धा, जाती-व्यवस्था, गुलामगिरी, अशा अनेक गोष्टींविरोधात लढले; अशा महान लोकांचा मी आदर ठेऊन, स्वतःला पुरोगामी विचारांचा मानतो. बुद्ध-शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो. इतिहासातील सर्व जाती-अंताच्या चळवळीच्या महापुरुषांना, विशेषतः गौतम बुद्ध व महात्मा फुले यांना गुरु मानून ज्यांनी आपल्याला स्वतंत्र भारताची राज्यघटना देऊन या भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्याचं कार्य केलं, जे आयुष्यभर समाजातून जातींमुळे होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढत राहिले, ज्यांनी खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य प्राप्त करवून दिलं, दलित-शोषित-पिडीतांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्याचा व शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला, अशा महापुरुषाला अभिवादन करून, त्यांचं कार्य डोळ्यासमोर आणून मी व भारतातील करोडो लोक "जय भिम" बोलतो.  माझ्या एका जवळच्या मित्राने त्याचे विचार माझ्यासमोर मांडले आणि मला ध...

वंदन महाराष्ट्राला

ही मराठी अमुची, बोली अमुची, संस्कृती मराठी. ज्ञानात अमुच्या, तुकात अमुच्या, सोयरी मराठी. अशी संपन्न संत परंपरा या महारष्ट्रा लाभली, विषमता भाव सहन केला, वंदितो चोखाच्या त्या चरणी... तूच अमुचा तारणहारा शिवबा, तूच अमुचा धनी, जिजाऊ सारिख्या आईने तुजसारिखी महान व्यक्ती घडविली. जिवाजीनं कापला शत्रूचा हात, बाजीप्रभूनं हादरली पावनखिंडी. तलवारी हाती घेण्याआधी तू शिवा फिरविल्या सोन्याच्या नांगरी... या भूमीवर जन्मास एकच ते महात्मा, राष्ट्रपिता संबोधितो मी, त्यांचं नाव आहे जोतीबा. उघडी केली शिक्षणाची दारं, दाखविली ज्ञानाची जोती, साथ दिली क्रांतीसुर्याला आमची माय ती सावित्री. जातीभेद मोडून शिकविली शूद्रांची पोरं, आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज. अज्ञानी समाजाला दिले त्यांनी ज्ञान भरपूर, धर्मांधांना केले सरळ, ते होते प्रबोधनकार. दलितांची हाक ऐकून आले जन्मास आंबेडकर, खूप शिकुनी मोठे झाले घटनेचे शिल्पकार, राज्यघटनेत दिले त्यांनी आपणास मताधिकार, समता, स्वतंत्रता, बंधुभाव करू आपण अंगीकार. झाला सुरु लढा या संयुक्त महाराष्ट्राचा, गेला बळी अमुच्या अनेक हुतात्म्यांचा, महारक्षकां...

लोकशाहीर विठ्ठल उमप : मृद्गंध पुरुस्कार

 काल रात्री "लोकशाहीर विठ्ठल उमप : मृद्गंध पुरुस्कार" सोहळ्याला गेलो होतो. "महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे" आले होते. सोबतच सुलोचना चव्हाण, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, जॉनी लीवर, भरत जाधव, इत्यादी नामवंत कलाकार आले होते. एवढे मोठमोठे कलाकार पाहून फार आनंद झाला. सोहळ्याची सुरुवात राजाराम जामसांडेकर, विजय चव्हाण व इतर उत्कृष्ट वादकांच्या जुगलबंदीने झाली. कार्यक्रमात नंदेश व उदेश उमप ने स्वतःच्या आवाजाने वेगळीच बहार आणली. शेवटी शाहीर साबळे यांनी महाराष्ट्रागीताची झलक ऐकवली, त्यांचासोबत त्यांचा नातू "केदार शिंदे" पण गायीला. वक्त्यांचे आनंदाचे शब्द ऐकून मन प्रफुल्लित झालं.  लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी "जय भिम" म्हणून आपले प्राण सोडले. त्याच शाहिराला मनाचा "जय भिम".