Skip to main content

वंदन महाराष्ट्राला

ही मराठी अमुची, बोली अमुची, संस्कृती मराठी.
ज्ञानात अमुच्या, तुकात अमुच्या, सोयरी मराठी.
अशी संपन्न संत परंपरा या महारष्ट्रा लाभली,
विषमता भाव सहन केला,
वंदितो चोखाच्या त्या चरणी...
तूच अमुचा तारणहारा शिवबा,
तूच अमुचा धनी,
जिजाऊ सारिख्या आईने तुजसारिखी महान व्यक्ती घडविली.
जिवाजीनं कापला शत्रूचा हात,
बाजीप्रभूनं हादरली पावनखिंडी.
तलवारी हाती घेण्याआधी तू शिवा फिरविल्या सोन्याच्या नांगरी...

या भूमीवर जन्मास एकच ते महात्मा,
राष्ट्रपिता संबोधितो मी, त्यांचं नाव आहे जोतीबा.
उघडी केली शिक्षणाची दारं,
दाखविली ज्ञानाची जोती,
साथ दिली क्रांतीसुर्याला आमची माय ती सावित्री.
जातीभेद मोडून शिकविली शूद्रांची पोरं,
आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज.
अज्ञानी समाजाला दिले त्यांनी ज्ञान भरपूर,
धर्मांधांना केले सरळ, ते होते प्रबोधनकार.
दलितांची हाक ऐकून आले जन्मास आंबेडकर,
खूप शिकुनी मोठे झाले घटनेचे शिल्पकार,
राज्यघटनेत दिले त्यांनी आपणास मताधिकार,
समता, स्वतंत्रता, बंधुभाव करू आपण अंगीकार.

झाला सुरु लढा या संयुक्त महाराष्ट्राचा,
गेला बळी अमुच्या अनेक हुतात्म्यांचा,
महारक्षकांच्या महाराष्ट्राला लाभला वारसा शाहिरांचा,
रचले पोवाडे, रचली छक्कड आणि भारुड एकनाथांचा.
"माझी मैना" अण्णाभाऊ गायिले,
अत्मारामंचं आव्हान महाराष्ट्राने पहिले,
"खुशाल कोंबडं झाकून धरा" म्हणाले,
मराठी माणसाला जागविले.
"जय जय महाराष्ट्र माझा" साबळेनी गाजविले.
त्या अमर शेख आणि विलास घोगरेंना नमन माझे.

कलागुणांचा होतो महाराष्ट्रात उगम,
लोककलेचा कोहिनूर माझा विठ्ठल उमप.
शाहिरांचा वारसा बळावताहेत कृष्णकांत जाधव,
रसिकांच्या भक्तीने थकले नाही राजूबाबा शेख.

समृद्ध - संपन्न आहे महाराष्ट्र ही खाण,
या मातीत राहणे मजला, नाही कुठे जाणं...

- आशित साबळे.

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …
सहन करू नका, विद्रोह करा.
डरपोक राहू नका, बंडखोर बना.
 - आशित साबळे

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …