Skip to main content

Posts

Showing posts with the label कला

कलेचं मूळ आणि महत्त्व

(हा लेख दैनिक सकाळ साठी ५०० शब्दांत लिहिलेला, पण इथे तो माझे अनुभव सांगून अजून विस्तृत पद्धतीने लिहिला आहे.) लहानपणापासूनच चित्रपट बनवायची इच्छा होती, पण ह्या सर्व गोष्टी कश्या असतात हे मला माहित नव्हतं. मी सातवीत असतानाच नास्तिक झालो. त्यामुळे देवधर्म करण्याऐवजी मी वाचू लागलो. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. माझा देव या संकल्पनेवरचा विश्वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्न पडू लागले. याच कारणामुळे माझं वाचन कथा कादंबरी भोवती नसून वैचारिक आणि तत्वज्ञानाशी निगडीत पुस्तकात मला रस होता. मी सुरुवातीच्या काळात वाचलेल्या पुस्तकांपैकी दोन ठळकपणे आठवतात – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं “राम आणि कृष्णाचं गौडबंगाल” आणि शहीद भगत सिंह लिखित “मी नास्तिक का आहे?”. या दोन पुस्तकांमुळे माझे विचार अजून स्पष्ट झाले आणि मला खात्री झाली की माझा नास्तिक होण्याचा निर्णय योग्य होता. मी रुईया महाविद्यालयात बी.एम.एम. शिकत असताना मला काही असे मित्र मैत्रिणी भेटले ज्यांच्यामुळे माझ्या वाचनाचा वेग वाढला. महात्मा ज्योतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे, पेरियार, ...

संस्कृतीचे मक्तेदार आणि आपली लोककला

 संस्कृती हा विषय म्हटलं तर खूप गुंतागुंतीचा आहे. आपण याला खूप सोप्या पद्ध्तानीने समजून घेऊ शकतो, पण जर हा विषय कठीण समजून राहिलं तर मग तो कळायलाही खूप कठीण आहे. खरं तर संस्कृती ही कलेमधून अधिक लवकर व सोप्या पद्धतीने रुजली जाते. त्याही अगोदर संस्कृतीला धर्माच्या माध्यमातून लोकांमध्ये रुजवलं गेलं. आजही अनेक कला किंवा लोककला ह्या हिंदू संस्कृतीच्या मानल्या जातात आणि बऱ्याच आहेतही. पण लोक भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती ही एकच मानतात. त्यातल्या त्यात गम्मत अशी आहे, की हेच लोक जेव्हा भारतीय संस्कृती इतरांना (परदेशी लोकांना, ई) दाखवत असतात तेव्हा ते हिंदू परंपरा, मंदिर, कला यांसोबत बौद्ध लेण्या, ताज महाल, लाल किला, इत्यादी हेही दाखवतात. जर का तुमच्या म्हणण्यानुसार हिंदू संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती आहे, तर मग इतर धर्माला का मध्ये आणतात? हे मध्ये आणतात कारण, मुळातच आर्यांनी आणि ब्राह्मणांनी त्यांची संस्कृती ही भारतातील मूळ बहुजनांवर भेसळ करून लादली. म्हणून आपल्याला कळतच नाही की, आपली संस्कृती कोणती आणि परकी कोणती!  मुळतः भारतीय संस्कृती ही चार्वाक, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर...