काय हिंदू धर्मीय खरंच गणेशोत्सव एक "धार्मिक" सण म्हणून साजरा करतात का? बऱ्याच वर्षांपासून मी पाहतोय की गणेशोत्सव आला की लोक खुश होतात, पण त्यांचं खुश होण्याचं कारण नक्की काय याचं उत्तर आता दिसू लागलं आहे. मी समस्त हिंदू समाजाबद्दल बोलत नाहीये; पण काल घरी येताना बरेच मंडळी गणेश विसर्जनासाठी जाताना दिसले. गणपती मागे आणि पुढे "चिकनी चमेली" आणि "हलकट जवानी" सारख्या गाण्यांवर "बाप्पाचे भक्त" नाचत होते. त्या लोकांच्या गर्दीत काही जण कोल्डड्रिंकमध्ये दारू मिसळून बारी बारीने पित होते. विसर्जन करून आल्यावर सगळीच मुले रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या अंगावर त्यांच्या नकळत गुलाल उधळत होते. दारूच्या नशेत असणाऱ्या माणसांबद्दल तर सांगायलाच नको. सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करताना टिळकांनी सांगितलं होतं का की, गणपतीच्या स्वागतासाठी आणि विसर्जनासाठी बॅंडबाजा, फटाके हे अपरिहार्य आहेत. काही वर्षांपूर्वी एका गावामध्ये जल्लोषात गणपतीला घेऊन चालले होते. त्यावेळी एकाने अगदी रस्त्याच्या मधोमध 'रस्सी बॉम्ब' लावला आणि गाड्यांना थांबवलंसुद्धा नाही. त्यावरून एक रि...