काल रात्री "लोकशाहीर विठ्ठल उमप : मृद्गंध पुरुस्कार" सोहळ्याला गेलो होतो. "महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे" आले होते. सोबतच सुलोचना चव्हाण, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, जॉनी लीवर, भरत जाधव, इत्यादी नामवंत कलाकार आले होते. एवढे मोठमोठे कलाकार पाहून फार आनंद झाला. सोहळ्याची सुरुवात राजाराम जामसांडेकर, विजय चव्हाण व इतर उत्कृष्ट वादकांच्या जुगलबंदीने झाली. कार्यक्रमात नंदेश व उदेश उमप ने स्वतःच्या आवाजाने वेगळीच बहार आणली. शेवटी शाहीर साबळे यांनी महाराष्ट्रागीताची झलक ऐकवली, त्यांचासोबत त्यांचा नातू "केदार शिंदे" पण गायीला. वक्त्यांचे आनंदाचे शब्द ऐकून मन प्रफुल्लित झालं. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी "जय भिम" म्हणून आपले प्राण सोडले. त्याच शाहिराला मनाचा "जय भिम".