Skip to main content

Posts

Showing posts with the label पटना

नको गं माय मले...

नको गं माय मले भंडाऱ्याले जायाचं, तिकडं सारे मिळून खातात न चोथा करून फेकतात, उसाले नाही त पोरींले... नको गं माय मले दिल्लीले जायाचं, तिकडं रस्ते सवेरेचे का रातचे, लोक उजेडात पाहतात, न रात्री चटके देतात मोम्बत्तीने... नको गं माय मले मुंबईले जायाचं, सारे मावटे, कुनी कोणाचं नाय, समोर संत असल्याचे वागतात, मागून वासना फुटते डोळ्याले... नको गं माय मले पटनाले जायाचं, जात विचारतात बोलाय्ले न देह बघतात चोळायले, ह्य कायले विचारलं, तर वास सुटतो जंगलायले... - आशित साबळे