आजच्या युवा पिढीला काही गैरसमज आहेत की शिव्यांशिवाय भाषा नसते, किंवा कालच्या पिढीला याची जाणीव नसल्यामुळे त्यांना याचं आश्चर्य वाटत असेल. मी कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे मला याचा फार अनुभव आला आहे की, साध्या वाक्यांमध्येसुद्धा एकातरी शिवीचा वापर होतो. जास्त आश्चर्य याचं की, त्या शिव्या स्त्रीवाचक असतानाही मुलीसुद्धा ते शब्द सर्रास उच्चारतात; आणि त्याहून अधिक आश्चर्य याचं की आपल्या समाजावर पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे इतका परिणाम झाला की एखाद्यावर राग व्यक्त करणे यासाठी शिवीच तोंडी येते. अगदी चांगल्या मनःस्थितीत असताना एखादा मित्र भेटला, तेव्हासुद्धा शिवीच! जर कोणी शिवी देत असेल तर त्यावर माझं एकच मत आहे की, तुम्ही शिवी देतात ती स्त्रीवाचक असते. जास्तीत जास्त शिव्यांमध्ये स्त्रियांच्या अवयवांचा उल्लेख असतो. तर शिवी देणाऱ्याने एकच लक्षात ठेवावे की, तो स्त्रीवाचक शिवी देत असेल तर ती शिवी संपूर्ण स्त्री जातीला (त्याच्या मानसिकतेनुसार) लागू होते, त्याच स्त्री जाती मध्ये त्याची आई, बहिण, इत्यादी जवळील स्त्रिया समाविष्ट होतात हे साहजिक आहे. मग शिवी देणारा जेव्हा शिवी देतो, तीच शिवी ...