Skip to main content

Posts

Showing posts from November, 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता म्हणजे एक समाजशास्त्रीय विश्लेषण

 ही माहिती मी फेसबुकवरून "निर्वाण बोधी" यांचाकडून मिळवली आहे. यातला एकही शब्द माझा नाही. फक्त आंबेडकरांच्या पत्रकारितेबद्दल माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा हा माझा प्रयत्न :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता म्हणजे एक समाजशास्त्रीय विश्लेषण... अन्याय सहन न होणे, हेच मनुष्याच्या मनाचे उन्नत स्वरूप होय. (मूकनायक - अंक 14 वा 14 ऑॅगस्ट 1920) राजकारणाचे सर्वसाधारण असे दोन हेतू आहेत. एक शासन व दुसरा संस्कृती. (मूकनायक - अंक दुसरा 14 फेबुवारी 1920) डॉ. बाबासाहेबांनी मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), जनता (1930) आणि प्रबुद्ध भारत (1956) या नावांनी पाक्षिके चालविली. यापैकी जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन बाबासाहेबांनी स्वत: न करता सहकाऱ्यांकडून करून घेतले. मात्र "मूकनायक' आणि "बहिष्कृत भारत' या दोन्ही पत्रांचे संपादन मात्र त्यांना स्वत:लाच करावे लागले. बहिष्कृत भारताच्या संपादनात बाबासाहेब स्वत: ओळ न ओळीकडे लक्ष देत असत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ""बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करणारा दुय्यम