Skip to main content

Posts

Showing posts from October, 2012

In my dreams,

I see India as a polity of Shivaji Maharaj, where each & every thing written by Dr. B.R. Ambedkar in constitution is implemented correctly. Where education is compulsory &free for everyone as started by Mahatma Phule. People follow the Noble Eightfold Path preached by Lord Buddha. And I'll be the richest & famous person in these aspects.....

थोडंसं कॉम्प्युटर विषयी

कॉम्प्युटर आपल्या रोजच्या जीवनातला एक महत्वाचा व अविभाज्य भाग झाला आहे. प्रत्येकाला त्याची गरज ही लागतच असते. आजच्या जगात तर अगदी प्रत्येकाला, मग त्याला त्याचं ज्ञान असो किंवा नसो. समाजात कॉम्प्युटरचं मोफत प्रशिक्षण देणे हे गरजेचं आहे. काही ठिकाणी मोफत शिकवतही असतील, पण ते लोकांपर्यंत किती पोहोचतं, हा मोठा प्रश्न आहे. शाळांमध्ये कॉम्प्युटरचं प्रशिक्षण देतात, पण तिथे अनेक मुलं एकत्रितपणे शिकत असल्यामुळे, काहींपर्यंत ते पोहचत नाही किंवा, ते ग्रुपमध्ये असल्यामुळे किंवा लहान मुलांमध्ये शिक्षकांच्या प्रती भय असल्यामुळे इतरांसमोर जे समजलं नाही ते विचारत नाहीत. ह्या सर्व बेसिक गोष्टी आपल्याला माहित आहेत.
 मुळात कॉम्प्युटरचा रोजचा वापर जो आहे, तो शिकण्यासाठी वेगळ्या क्लासेसची गरज नाही, तर थोडीशी इंग्रजीची गरज असते. कॉम्प्युटरवर आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं ते वाचूनच आपल्याला तो ऑपरेट करायचा असतो, आणि ती इंग्रजी जास्त कठीण नसते. पुढे काही ठिकाणी आपल्याला विविध बाबतीत अडचण येऊ शकते, जिथे दुसऱ्या कोणी जाणकार व्यक्तीने सांगायची गरज भासते. अशावेळी दुसऱ्याला विचारणे ठीक आहे; पण उगाच काही प्रॉब्लेम …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…

माझा धर्माविषयीचा दृष्टीकोन...

धर्म ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जुडलेली आहे. यापासूनच आपण कोणत्या पद्धतीने जगायचं हे शिकतो. आपण लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीत अशा पद्धतीने घडलो आहोत की, आपण धर्माविषयी टीका करत नाहीत, पटत नसतील तरीही त्याच्या जुन्या रुढीपरंपरे विरुद्ध बोलत नाही. इथूनच आपली मानसिकता अशा पद्धतीने घडते की, 'जे चाललंय ते चालू द्या...' मग पुढे येणाऱ्या पिढ्यांवरही तेच संस्कार होतात आणि २१व्या शतकातही तीच परिस्थिती दिसते जी पूर्वी असायची.
 आज आपण पाहतो की, लोक बदलले नाहीत. धर्माच्या नावावर तंत्र, मंत्र, यज्ञ, हवन, जादूटोणा, ई. गोष्टी आजच्या आधुनिक काळात घडत आहेत. मुळात धर्म म्हणजे काय, तो कोणासाठी व कशासाठी असतो, धर्माचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध आहे, हे जाणून घेण्याची कुवत त्यांच्यात नाही, किंवा असं म्हणता येईल की त्यांनी चुकीच्या अर्थाने धर्म हा आत्मसात केला. प्राचीन काळापासून घडत आलेल्या चुकीच्या गोष्टी आपण फेकून दिल्या पाहिजेत, कारण आपल्याला त्याची माहिती व पुरावे मिळाले आहेत की त्याचा मानवाशी काही एक संबंध नाही किंवा ते उपयोगी नाही. धर्म किती जुना वा प्राचीन असल्याने त्याची महानता ठरत …
We must keep little space in our stomach to digest the food which we've eaten when we were hungry.

(This theory can be applied for knowledge in human brain.)
- Aashit Sable