Skip to main content

Posts

Showing posts from September, 2012
Our cell phones may not have attractive functions, but it should contain the files which gives (at least) basic knowledge of anything in the world. (This theory can be applied in 'human' life.) - Aashit Sable

Buildings of Glass

 All industrialists and businessmen must keep in mind that visuals do affect in society but in what way we are going to show our raised economical standards? By building hundreds of floors with glass...  My message to whole world is to stop pollution which these glass buildings are causing/increasing. It multiplies the pollution by reflecting the sun-rays, UV rays, etc. This causes the problems like road accidents, ozone hole, global warming, etc. These so called rich people will not think about the world in which they exist.  The glasses on the buildings reflect the sun-rays till ground level. What actually happens is that, people driving vehicles suddenly get disturbed because of sunrays getting reflected and this leads to road accidents. Secondly, some of the glasses absorb the heat but maximum types of glasses reflects the sunlight with ultraviolet rays; again we humans are the cause of letting the UV rays get into our atmosphere by using products like refrigerator, air-conditio

गणेशोत्सव

काय हिंदू धर्मीय खरंच गणेशोत्सव एक "धार्मिक" सण म्हणून साजरा करतात का?  बऱ्याच वर्षांपासून मी पाहतोय की गणेशोत्सव आला की लोक खुश होतात, पण त्यांचं खुश होण्याचं कारण नक्की काय याचं उत्तर आता दिसू लागलं आहे. मी समस्त हिंदू समाजाबद्दल बोलत नाहीये; पण काल घरी येताना बरेच मंडळी गणेश विसर्जनासाठी जाताना दिसले. गणपती मागे आणि पुढे "चिकनी चमेली" आणि "हलकट जवानी" सारख्या गाण्यांवर "बाप्पाचे भक्त" नाचत होते. त्या लोकांच्या गर्दीत काही जण कोल्डड्रिंकमध्ये दारू मिसळून बारी बारीने पित होते. विसर्जन करून आल्यावर सगळीच मुले रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या अंगावर त्यांच्या नकळत गुलाल उधळत होते. दारूच्या नशेत असणाऱ्या माणसांबद्दल तर सांगायलाच नको.  सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करताना टिळकांनी सांगितलं होतं का की, गणपतीच्या स्वागतासाठी आणि विसर्जनासाठी बॅंडबाजा, फटाके हे अपरिहार्य आहेत. काही वर्षांपूर्वी एका गावामध्ये जल्लोषात गणपतीला घेऊन चालले होते. त्यावेळी एकाने अगदी रस्त्याच्या मधोमध 'रस्सी बॉम्ब' लावला आणि गाड्यांना थांबवलंसुद्धा नाही. त्यावरून एक रि

खरे कलावंत कोण? स्टार की अभिनेते...

 बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि स्टार या शब्दांमध्ये बरीच मोठी तफावत आहे. स्टारला अभिनयाशी काही देणं-घेणं नसतं. ते मुळात श्रीमंत 'चित्रपट कलाकारांच्या' घराण्यात जन्माला येतात म्हणूनच त्यांना जन्मतःच स्टार नावाचा टॅग लागतो. तिथूनच त्यांना बॉलीवूडचा शॉर्टकट मिळतो, मग काय करायचंय अभिनयाशी... चित्रपट मिळतो ना, तोही मुख्य भूमिकेसाठी. मग बस! असाच विचार कदाचित त्यांच्याही मनात येत असेल. पण कोण कशाला बोलून दाखवतंय! आपण मराठी अभिनेते पहिले, तर जास्तीत जास्त लोक हे चांगल्या दर्जाचे कलाकार आहेत. त्यामागे त्यांची मोठी कहाणी असते. माझा मुद्दा हा नाही की, धडपड केल्यानेच माणूस कलावंत होतो. माझं असं म्हणणं आहे की, त्याच्या "कलाकार" होण्यामागे जे काही असेल ते त्याचं वैयक्तिक आयुष्य. प्रेक्षकांना दिसते ती त्यांची पडद्यावरची कामगिरी. हा विषय लक्षात घेतला तर "स्टार" ही गोष्ट वेगळीच वाटते. रणबीर कपूर, इम्रान खान यांच्यासारख्या स्टार्सचा अभिनय हा बनावटी वाटतो; तर तुषार कपूर, उपेन पटेल हे तर माझ्या मते चुकून अभिनय क्षेत्रात आले असतील, कारण इतरांचा अभिनय हा किमान बनावटी वाटतो पण हे तर

Love

 In in our 21st century, Love is a word which relates only to a couple in which only a boy and a girl is involved, which is not wrong but this concept has become limited only to this. Nowadays, people only think about "a duo of different gender" when listening about the word "love". The terms attraction, like, love and romance are very different from each other; but why don't we, the people of 21st century think about our narrow-mind while assuming the love in different way instead of its own real meaning. For a couple, love should not like holding hands physically for a while, it must be a bonding of souls for whole life.  We should take love also as a compassion to society, for human beings and nature. It can be an affection not only for a single person but to whole world for us. It is true that love is different for every person in our life which includes mother, father, brother, sister, wife or any other loved one. But we will come to know about the variou

भारतीय राजकारणात धर्माला घेऊन केले जाणारे सत्ताकारण

 भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास ६५ वर्ष झाली. या देशावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केलं. त्याहीपूर्वी प्राचीन भारतच्या इतिहासात समाजावर धर्मानेच राज्य केले आहे. धर्म जे सांगेल, त्याचे नियम पाळणे अनिवार्य होते. पण जेव्हा इंग्रज भारतात आले, त्यावेळी धर्माची सत्ता कमी झाली. परंतु अप्रत्यक्षरित्या इंग्रजांच्या सत्तेसोबत त्यांचा ख्रिस्ती धर्मसुद्धा भारतात आला. या सर्व गोष्टींवरून आपल्या हे लक्षात येऊ शकते की, धर्म आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी असून ते कुठेतरी जुळलेले आहे. किंबहुना राजकारणी ते जोडत आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना समिती स्थापन करण्यात आली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांमध्ये राज्यघटना तयार झाली. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे "भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे". स्वतंत्र भारताची राज्यघटना मान्य झाल्याच्या पुढे देशाने या तत्त्वांवर चालायला हवं होतं. पण आज आपल्या देशात काय दिसून येतं ते, धर्म, जाती व जमातवादी राजकारण. "जिथे" आपण भारताला धर्मनिरपेक्ष म्हणतो "तिथेच" आपण एखादा विशिष्ट "वाद"

अंधश्रद्धा

 "साधू बाबा" या नावाचा व्यवसाय "२१व्या शतकात" जोरात चालला आहे. त्याचे दोन प्रकार दिसून येतात. ते म्हणजे मंत्र - जादूटोणा करणारे, आणि दुसरे उपदेश करणारे. आपल्या सर्वांना माहित आहे की जादूटोणा, करणी, वशीकरण, मुठ मारणे, ई. हे प्रकार किती वाईट आहेत. फक्त शब्दांच्या व मंत्रांच्या जोरावर इथे बसलेला माणूस दुरवर असलेल्या माणसाला कशी काय हानी पोहचवू शकतो! ही सर्वसाधारण गोष्ट आपल्याला कळते पण तरीही काही लोक त्या ढोंगी साधू बाबांकडे आपल्या समस्या घेऊन जातात, याच गोष्टीचा फायदा घेऊन ते लोक त्यांच्याकडे जाणार्यांकडून बक्कळ पैसे उकळतात. उगाचच आपण आपल्या वैयक्तिक गोष्टी त्यांना जाऊन सांगतो, त्या नाविलाजाचा फायदा ते पुरेपूर उचलतात. अशा वेळी आपल्याला त्या गोष्टीची भुरळ पडलेली असते. आपलं काम कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे, या भावनेने आपण समोरचा मागेल ते देऊन रिकामे होऊन जातो आणि ते ही मागचा पुढचा विचार न करता.  यातला अगदी भयानक व भीषण प्रकार म्हणजे "अघोरी विद्या". यामध्ये पशुबळी, नरबळी यासारख्या विकृत गोष्टी चालतात. या विद्येला अभ्यासणारे मांत्रिक फारच विद्रूप, विक्षिप