Skip to main content

Posts

Showing posts with the label अभिनेता

खरे कलावंत कोण? स्टार की अभिनेते...

 बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि स्टार या शब्दांमध्ये बरीच मोठी तफावत आहे. स्टारला अभिनयाशी काही देणं-घेणं नसतं. ते मुळात श्रीमंत 'चित्रपट कलाकारांच्या' घराण्यात जन्माला येतात म्हणूनच त्यांना जन्मतःच स्टार नावाचा टॅग लागतो. तिथूनच त्यांना बॉलीवूडचा शॉर्टकट मिळतो, मग काय करायचंय अभिनयाशी... चित्रपट मिळतो ना, तोही मुख्य भूमिकेसाठी. मग बस! असाच विचार कदाचित त्यांच्याही मनात येत असेल. पण कोण कशाला बोलून दाखवतंय! आपण मराठी अभिनेते पहिले, तर जास्तीत जास्त लोक हे चांगल्या दर्जाचे कलाकार आहेत. त्यामागे त्यांची मोठी कहाणी असते. माझा मुद्दा हा नाही की, धडपड केल्यानेच माणूस कलावंत होतो. माझं असं म्हणणं आहे की, त्याच्या "कलाकार" होण्यामागे जे काही असेल ते त्याचं वैयक्तिक आयुष्य. प्रेक्षकांना दिसते ती त्यांची पडद्यावरची कामगिरी. हा विषय लक्षात घेतला तर "स्टार" ही गोष्ट वेगळीच वाटते. रणबीर कपूर, इम्रान खान यांच्यासारख्या स्टार्सचा अभिनय हा बनावटी वाटतो; तर तुषार कपूर, उपेन पटेल हे तर माझ्या मते चुकून अभिनय क्षेत्रात आले असतील, कारण इतरांचा अभिनय हा किमान बनावटी वाटतो पण हे तर ...