Skip to main content

Posts

Showing posts with the label नागराज

Post-Fandry experience

काय पिच्चर बनवलाय ल्येका...!!! मराठी चित्रपटसृष्टीतला एक क्रांतिकारी टप्पा म्हणजे "फँड्री" Conceptual :-  मला असं वाटतं की, फँड्री मधली प्रेमकथा ही त्या चित्रपटासाठी एक कथेचा आधार म्हणून वापरली. ती जाणीव तर होतेच की, त्या वयातले मुलं हे असं करतात आणि ते नैसर्गिक व स्वाभाविक आहे. मी तर म्हणेल ही प्रेमकथाच नव्हती, चित्रपटात दिग्दर्शकाने जब्याच्या मनातलं त्या मुलीबद्दल असणारं आकर्षण दाखवलं आहे. पण मुळात हा चित्रपट भारतातील जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. जब्याच्या मनात शालूसाठी जे काही आहे, त्याच्यासोबत त्याला त्याच्या जातीमुळे वाटणारी घृणा, न्यूनगंड आणि असमानता या गोष्टी त्याला आतून अस्वस्थ करत असतात.  माणसाला त्याच्या जन्मासोबत त्याची जात फ्री मिळते, आणि त्याच जातीप्रमाणे त्या माणसाला वागावं लागतं आणि काम करावं लागतं. याच ठिकाणी सुरु होतो तो उच्च आणि "नीच" भेदभाव. कैकाडी (निम्न / अस्पृश्य) जातीतला हा मुलगा एका सवर्ण मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला ह्या सर्व जातीच्या भिंती तोडून समान जगायचं असतं आणि त्याला शाळेत मित्रांसमोर आणि शालूसमोर शायनिंग मारण्य...

Pre-Fandry

१४ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहतोय... फक्त "फॅंड्री"साठी! एखादी जवळची व्यक्ती आपल्याला खूप दिवस भेटली नाही तर त्याची जशी आठवण येते, त्याच प्रकारे या चित्रपटाने मनाला घोर लावलाय. ही फिलिंग यासाठी येतेय की चित्रपटाचे प्रोमोज, थीम सॉंग, मुलाखतींचे विडीयो, इत्यादी पाहून मी त्या कथेशी कनेक्ट होत चाललोय, असं वाटू लागलंय. म्हणूनच की काय, मला माझी कथा बघायची घाई झाली आहे असं वाटतं. आम्हीच काही जणांनी दादर-माटुंगाला "चित्रपट - काल, आज, उद्या" असा परिसंवाद ठेवला होता, तेव्हा फॅंड्रीबद्दल पहिल्यांदाच प्रत्यक्ष "नागराज मंजुळे" यांचाकडून ऐकायला मिळालं. म्युझिक लाँचच्या दिवशी मी "तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला" हे गाणं २० ते २५ वेळा तरी ऐकलं असेल आणि आजपर्यंत सगळे गाणे बाजूला ठेऊन हेच गाणं ऐकतोय. काही दिवसांपासून आजूबाजूचं वातावरण "फॅंड्रीमय" झालं आहे. जो तो फर्स्ट डे फर्स्ट शो फॅंड्री बघायचं म्हणतोय, म्हणून मला तिकीट मिळेल की नाही याची चिंता वाटू लागलीये. पण काहीही होवो, अॅट एनी कॉस्ट मी फर्स्ट डे फर्स्ट शो फॅंड्री बघणारच. आणि तो चित्रपट पाहून...