Skip to main content

Posts

Showing posts from February, 2015

कुठे हरवली आहे संवेदनशीलता...

 “माणूस मारतो म्हणजे नेमकं काय होतं? तर लोक म्हणतात तो चेतनाहीन होतो. पण अविरत चेतना वागवत हिंडणारे, फिरणारे, खाणारे, पिणारे सारेच लोक खरंच जिवंत असतात...? खरं सांगायचं तर असं नसतं. वरवर जिवंत दिसणारे आपण खरंतर मेलेलो असतो. फक्त आपला अंत्यसंस्कार झालेला नसतो. पहिला मारतो विचार, मग मारते विचारधारा आणि त्यानंतर मारते संवेदना आणि मग अस्तित्वात येतं एक संवेदनाहीन जग. जे खरंतर एक स्मशानभूमीच असतं. या स्माशाणात आपल्याला कोणीही, कुठेही, कसंही ढकलत नेत असतं.” लोकशाहीर संभाजी भागात यांचे हे वाक्य मला आवर्जून सांगावेसे वाटतात.  आपल्या देशात सध्या स्मशानभूमीसारखी परिस्थिती झाली आहे; म्हणजेच लोक संवेदनाहीन झाले आहेत. रोजच्या जगण्यात आणि रोजच्या वर्तमानपत्रात आपण अशा अनेक गोष्टी बघतो. असे अनेक उदाहरण सतत आपल्या समोर येत असतात. म्हणजे कुठे अतिरेकी किंवा बॉम्ब हल्ला झाला की जखमी लोकांना पाहून आपण म्हणतो की “बरं झालं हे आपल्या इथे नाही झालं ते...”; किंवा कोणी रस्त्यात एखाद्या मुलीची छेड काढत असेल तर आपण दुर्लक्ष करून बाजूने निघून जातो; किंवा कुठे अपघात झाला तर लोक मदत करण्याऐवजी अपघातग्रस्तांचे फोट