आजच्या काळात आपल्या समाजामध्ये "जमातवादी राजकारण" खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे. अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या महामानवांचे नाव घेऊन व लोकांचा वापर करून आपला स्वार्थ साधत आहेत. अज्ञानी लोक त्यांच्या दिखाऊ भूमिकेच्या आहारी जाऊन बळी पडतात आणि आतलं "राजकारण" समजूनच घेत नाहीत. आजपर्यंत जेवढ्या पण (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष) राजकीय पक्षांमुळे दंगली झाल्या, त्यामध्ये वरच्या लोकांना काही फरक पडला नाही, तर त्यात बळी पडला तो सर्वसामान्य समाजच. आज आपण पाहू शकतो की शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर काही महापुरुषांचं नाव घेऊन किती चुकीचे काम चालतात. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदू धर्म, हिंदुत्व, हिंदुत्ववाद वाढवणे आणि मुसलमानांचा द्वेष करणे अशा गोष्टी दिसतात. बोलतात शिवाजी महाराज हे "हिंदवी स्वराज्य" संस्थापक आहेत. महाराजांनी कधीच कोणाचाच जात-धर्म पाहिला नाही. ते फक्त स्वराज्यासाठी लढले. तो काळ पाहिला तर त्यावेळी लोक फक्त आपले राज्य वाढवण्यासाठी लढायचे, शिवाजी महाराजांनी आपल्या हक्काचे, रयतेचे राज्य जिंकले, हिंदू "धर्माचे" नाही. आताच्...