Skip to main content

भारत, भारतीय आणि प्रगती...

[या लेखात मी अनेक प्रश्नचिन्हे वापरली आहेत. त्याला माझं आश्चर्य, प्रश्न किंवा विधान; काहीही समजू शकता.]

 बरेच दिवस झाले काहीच लिहिलं नाही. काही सुचतच नव्हतं आणि वेळही मिळाला नाही. पण प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण मात्र केलं. अचानक आता त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या बोरीवली नॅशनल पार्कमध्ये गेलो होतो. फार मोठे आर्कीओलॉजीस्ट डॉ. सुरज पंडित आमच्या सोबत होते. सर्वात पहिल्याच गुहेमध्ये ते आम्हाला माहिती सांगत असताना एक सुशिक्षित बेशिस्त कुटुंब तिथे आलं. त्या लहान मुलांनी तर तिथे धुमाकूळ घातला होता, आणि सरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तर ते लोक ऐकतच नव्हते; म्हणजे मुलं एकपट आणि पालक दुप्पट, अशी गत होती. त्यांचं बोलणं इंग्रजीत चाललं होतं, यावरून ते सुशिक्षित आहेत असा भास झाला, पण त्याच इंग्रजीतून त्यांनी त्यांचं खरं शिक्षण दाखवलं. मग पुढे सरांनी त्यांना गप्प करून तिथून घालवलं आणि म्हणाले "People are urbanized but not civilized". हे वाक्य मला फार सुंदर व महत्वाचं वाटलं. आपण ज्या ठिकाणी, ज्या गावात, शहरात, राज्यात, प्रांतात, देशात, प्रदेशात राहतो, तिथली संस्कृती, सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्मारक आणि इतर अशा गोष्टी जेव्हा पाहायला जातो, तेव्हा त्याचा आदर केला पाहिजे, त्याची जपवणूक केली पाहिजे. पण परत तेच वाक्य इथे लक्षात येतं ("People are urbanized but not civilized"). माणसांनी एकमेकांशी कसं वागावं, कसं राहावं, बोलावं ह्याच गोष्टी लोक अर्बनाईज्ड झाल्यावर विसरून गेलेत. गावांमध्ये तरी लोक एकमेकांच्या घरी जातात, सोबत उठणं-बसणं असतं, एकत्र काम करतात, तेव्हा त्यांच्यातलं नातं फार सुंदर दिसतं. अनोळखी असतानासुद्धा मनात परकं असण्याची भावना नसते. शहरात या गोष्टीचं प्रमाण फार कमी आहे. इथे कोणाला कोणाचीच काहीच पडली नाहीये. सगळे आपापले काम करत स्वार्थी झाले आहेत. स्वतःचं काम चोख करणं ही काही चुकीची गोष्ट नाही, पण तेच करत असताना आपण स्वार्थी होऊन दुसऱ्याला आपला त्रास होईल का; याचा विचार आपण करायला हवा.

 सर्वेच बोलतात की काही काम करताना किंवा कोणाला उपदेश देताना ती क्रिया सर्वप्रथम आपण केली पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण सुरु केली की त्याचं अनुकरण करत का होईना लोक ते काम करू लागतात. पण आज अशी परिस्थिती आहे की लोक कोणाचा आदर्शच घेताना दिसत नाहीत. जर आपण रस्त्यावर थुंकणं किंवा कचरा टाकणं बंद केलं तर किती लोक ती गोष्ट स्वतःच्या स्वभावासाठी स्वीकारतील? अशिक्षित म्हणतील "त्याचं आणि आपलं काय घेणं देणं आहे..?" आणि, सुशिक्षित म्हणतील "ती त्याची पर्सनल लाईफ आहे..." अशाप्रकारे आपला भारतीय समाज कसा प्रगती करेल? ह्या समाजाला देशभक्ती येते ती फक्त २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला. मला तर वाटतं, बरं झालं इंग्रज भारतात आले आणि आपल्या क्रांतिकारी लोकांनी भारताला स्वतंत्र केलं, पुढे संविधान मान्य झालं व अजून काही इतर महत्वाच्या घडामोडी झाल्या, जेणेकरून आपल्या देशाने स्वतःसाठी किमान दोन दिवस राखून ठेवले, ज्या दिवशी लोक त्याची आठवण करतील की आपलं भारत नावाचं एक देश आहे ज्यात आपण राहतो.

 भारतात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. उद्योगपती जागतिक पातळीवर देशाचं नाव उंचावत आहेत. पण सर्वसामान्य भारतीयांकडे कोणी लक्ष दिलंय का? आजसुद्धा या देशात धर्म व जातीभेदामुळे दंगली आणि हत्याकांड होतात. नेते मंडळी फक्त आश्वासनं देऊन गप्प होतात. शेवटी युरोपियन संसदेने भारतातल्या जातीभेदामुळे होणाऱ्या अत्याचाराची नोंद घेतली. आपण एवढे निकामी झालो आहोत का, की परदेशी लोकांनी यावर काम करण्याची वेळ आली आहे? (बातमी इथे वाचा:- http://freepressjournal.in/eu-parliament-alarmed-by-caste-bias-in-india/ )
खैरलांजी आणि गुजरात हत्याकांड यांसारख्या क्रूर घटना या काळात घडतात. नुकतीच दिल्लीत घडलेली घटना बघा; ज्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला, तिच्या शरीरावर जीवघेणे हल्ले झाले, जी ५-७ वेळा कोमामध्ये जाऊन आली, जिचं आयुष्य धोक्यात आहे, ज्या मुलीची मनसिक अवस्था त्या घटनेतून सावरली नाही, जी यापुढे कधीच नवीन जीवाला जन्म देऊ शकणार नाही, तिला आपले नेते संपूर्ण वैद्यकीय खर्च आणि सरकारी नोकरीची हमी देतात. यापुढे काय म्हणावं... ( http://www.dailypioneer.com/nation/116776-akhilesh-assures-govt-jobs-to-delhi-rape-victims-.html )

 माणूस माणसाला ओळखत नाही, स्वार्थासाठी एकमेकांचा जीव घेण्यातही कमी करत नाही. अशा परिस्थितीमध्ये किमान कायद्याची अंमलबजावणी व्हायला नको का... आजच्या नेत्यांनी तर भ्रष्टाचाराची सिरिअलच सुरु केली आहे. वर्तमानपत्रात रोज एक घोटाळा, रोज शेकडो बलात्कार, रोज हजारो दरोडे आहेच. एवढ्या केसेस न्यायलयात रोज येतात, अनेक वर्षे चालतात. त्यामध्ये गुन्हेगाराला शिक्षा मिळते, पण त्याआधीच पिडीत विनाकारण एखाद्या घटनेमुळे न्यायलयातच आजीवन शिक्षा भोगलेला असतो. राष्ट्रीय पातळीवर देशाची किती जरी आर्थिक प्रगती झाली असली, तरी त्याचं आम्हाला काय? आमचे सगळे दिवस सारखेच. राज्यघटनेने ज्यांना कोणाला सक्तीचं शिक्षण दिलेलं आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं का? सरकाने जरी ग्रामीण भागात एखदी शैक्षणिक योजना सुरु केली, तर ती मुलांपर्यंत पोहोचायला त्या गावात शाळा ही अस्तित्वात असायला हवी...

 अशा अनेक गोष्टी आहेत, सांगायला शब्द कमी पडतील. शेवटी एकच बोलू इच्छितो की, भारताच्या प्रगतीने आम्ही सर्व खूप खुश आहोत, पण आता भारतीयांनी स्वतःच्या प्रगतीसाठी हालचाल करायला हवी.

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, वंशाची

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज झ

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.