आज खूप आनंद होत आहे की मी अशा ठिकाणी जाऊन आलो जिथे महाराष्ट्रातला एक प्रचंड मोठा इतिहास घडला आहे; ते म्हणजे "भीमा-कोरेगाव". माटुंगा रोडवरून निघालो, दादरवरून CST ट्रेन पकडायची होती. पहाटे CST लोकल ७ मिनिटं उशिरा आली. CST वरून "इंद्रायणी एक्स्प्रेस" पकडायची होती. एका ट्रेनमुळे संपूर्ण प्लान बिघडला. जाम वैतागलो त्या लोकलच्या टाईमिंगवर. शेवटी ठरवलं की, तीच पुण्याची ट्रेन आता दादरवरूनच पकडणार, तेही विदाऊट तिकीट. सगळे मित्रमंडळी खूप अगोदर CSTला जाऊन बसल्यामुळे माझी सीट राखून ठेवली होती. मजा मस्ती करत पुण्याला पोहोचलो. दोन दिवस अगोदर पुणे स्टेशन बाहेर काहीच नसताना आदल्या दिवशी तिथे काम सुरु केल्याने बाहेर जाण्यासाठी फक्त एक गल्ली उपलब्ध ठेवली होती. प्रचंड गर्दी तिथेच खूप वेळ पॅक झाली, हळू हळू आम्ही बाहेर पडलो. बस स्थानकावरून भीमा कोरेगावासाठी स्पेशल बसेस सोडण्यात येत होत्या. आम्ही बसमध्ये चढलो आणि पटापट जागा धरली. जिथे मी बसलो होतो, तिथेच बाजूला एक चाळीशीतला माणूस आला. कदाचित दारू पिऊन आला असावा, खूप बडबड करत होता. आधीच तिथे सुरतहून एक "मोरे" नावाचे जयभीमवाले ...