Skip to main content

Posts

Showing posts with the label जय भिम

आजचा दिवसभराचा अनुभव

 आज खूप आनंद होत आहे की मी अशा ठिकाणी जाऊन आलो जिथे महाराष्ट्रातला एक प्रचंड मोठा इतिहास घडला आहे; ते म्हणजे "भीमा-कोरेगाव". माटुंगा रोडवरून निघालो, दादरवरून CST ट्रेन पकडायची होती. पहाटे CST लोकल ७ मिनिटं उशिरा आली. CST वरून "इंद्रायणी एक्स्प्रेस" पकडायची होती. एका ट्रेनमुळे संपूर्ण प्लान बिघडला. जाम वैतागलो त्या लोकलच्या टाईमिंगवर. शेवटी ठरवलं की, तीच पुण्याची ट्रेन आता दादरवरूनच पकडणार, तेही विदाऊट तिकीट. सगळे मित्रमंडळी खूप अगोदर CSTला जाऊन बसल्यामुळे माझी सीट राखून ठेवली होती. मजा मस्ती करत पुण्याला पोहोचलो. दोन दिवस अगोदर पुणे स्टेशन बाहेर काहीच नसताना आदल्या दिवशी तिथे काम सुरु केल्याने बाहेर जाण्यासाठी फक्त एक गल्ली उपलब्ध ठेवली होती. प्रचंड गर्दी तिथेच खूप वेळ पॅक झाली, हळू हळू आम्ही बाहेर पडलो.  बस स्थानकावरून भीमा कोरेगावासाठी स्पेशल बसेस सोडण्यात येत होत्या. आम्ही बसमध्ये चढलो आणि पटापट जागा धरली. जिथे मी बसलो होतो, तिथेच बाजूला एक चाळीशीतला माणूस आला. कदाचित दारू पिऊन आला असावा, खूप बडबड करत होता. आधीच तिथे सुरतहून एक "मोरे" नावाचे जयभीमवाले ...

जय महाराष्ट्र की, जय भीम !

 एक विचित्र अनुभव माझ्या आयुष्यात आला. मी ज्या महान लोकांना मानतो, ज्यांचा आपण आदर केला पाहिजे, ज्यांनी ह्या समाजासाठी मोठं कार्य केलं, ज्यांनी जुन्या रुढी-परंपरा, अंधश्रद्धा, जाती-व्यवस्था, गुलामगिरी, अशा अनेक गोष्टींविरोधात लढले; अशा महान लोकांचा मी आदर ठेऊन, स्वतःला पुरोगामी विचारांचा मानतो. बुद्ध-शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो. इतिहासातील सर्व जाती-अंताच्या चळवळीच्या महापुरुषांना, विशेषतः गौतम बुद्ध व महात्मा फुले यांना गुरु मानून ज्यांनी आपल्याला स्वतंत्र भारताची राज्यघटना देऊन या भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्याचं कार्य केलं, जे आयुष्यभर समाजातून जातींमुळे होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढत राहिले, ज्यांनी खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य प्राप्त करवून दिलं, दलित-शोषित-पिडीतांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्याचा व शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला, अशा महापुरुषाला अभिवादन करून, त्यांचं कार्य डोळ्यासमोर आणून मी व भारतातील करोडो लोक "जय भिम" बोलतो.  माझ्या एका जवळच्या मित्राने त्याचे विचार माझ्यासमोर मांडले आणि मला ध...

लोकशाहीर विठ्ठल उमप : मृद्गंध पुरुस्कार

 काल रात्री "लोकशाहीर विठ्ठल उमप : मृद्गंध पुरुस्कार" सोहळ्याला गेलो होतो. "महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे" आले होते. सोबतच सुलोचना चव्हाण, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, जॉनी लीवर, भरत जाधव, इत्यादी नामवंत कलाकार आले होते. एवढे मोठमोठे कलाकार पाहून फार आनंद झाला. सोहळ्याची सुरुवात राजाराम जामसांडेकर, विजय चव्हाण व इतर उत्कृष्ट वादकांच्या जुगलबंदीने झाली. कार्यक्रमात नंदेश व उदेश उमप ने स्वतःच्या आवाजाने वेगळीच बहार आणली. शेवटी शाहीर साबळे यांनी महाराष्ट्रागीताची झलक ऐकवली, त्यांचासोबत त्यांचा नातू "केदार शिंदे" पण गायीला. वक्त्यांचे आनंदाचे शब्द ऐकून मन प्रफुल्लित झालं.  लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी "जय भिम" म्हणून आपले प्राण सोडले. त्याच शाहिराला मनाचा "जय भिम".