Skip to main content

अंधश्रद्धा

 "साधू बाबा" या नावाचा व्यवसाय "२१व्या शतकात" जोरात चालला आहे. त्याचे दोन प्रकार दिसून येतात. ते म्हणजे मंत्र - जादूटोणा करणारे, आणि दुसरे उपदेश करणारे. आपल्या सर्वांना माहित आहे की जादूटोणा, करणी, वशीकरण, मुठ मारणे, ई. हे प्रकार किती वाईट आहेत. फक्त शब्दांच्या व मंत्रांच्या जोरावर इथे बसलेला माणूस दुरवर असलेल्या माणसाला कशी काय हानी पोहचवू शकतो! ही सर्वसाधारण गोष्ट आपल्याला कळते पण तरीही काही लोक त्या ढोंगी साधू बाबांकडे आपल्या समस्या घेऊन जातात, याच गोष्टीचा फायदा घेऊन ते लोक त्यांच्याकडे जाणार्यांकडून बक्कळ पैसे उकळतात. उगाचच आपण आपल्या वैयक्तिक गोष्टी त्यांना जाऊन सांगतो, त्या नाविलाजाचा फायदा ते पुरेपूर उचलतात. अशा वेळी आपल्याला त्या गोष्टीची भुरळ पडलेली असते. आपलं काम कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे, या भावनेने आपण समोरचा मागेल ते देऊन रिकामे होऊन जातो आणि ते ही मागचा पुढचा विचार न करता.
 यातला अगदी भयानक व भीषण प्रकार म्हणजे "अघोरी विद्या". यामध्ये पशुबळी, नरबळी यासारख्या विकृत गोष्टी चालतात. या विद्येला अभ्यासणारे मांत्रिक फारच विद्रूप, विक्षिप्त, विचित्र असतात. त्यांना मानवाशी, समाजाशी, त्यांच्या भावनेशी काहीही देणं-घेणं नसतं. असं म्हणतात की या विद्येमध्ये वापरले जाणारे मंत्र इतके प्रभावी पण गुंतागुंतीचे असतात की ते उच्चारताना जर का चूक झाली किंवा थोडे वेगळे उच्चारले गेले, तर ते क्रिया करणाऱ्या व्यक्तीलाच धोकादायक ठरू शकतात, त्यांचा जीवही जाऊ शकतो. या प्रकारात मांत्रिक "काहीपण" (मानवी मल, माती, राख, मृत माणसाचे मास, ई.) खातात आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम झाला की म्हणतात मंत्र उलटले. या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणारे तेच लोक हा चुकीचा मार्ग स्वीकारून स्वतःचं जीवन धोक्यात घालतात.
 घरची वाईट परिस्थिती, मुलीचं लग्न अशा गोष्टींवर तोडगा मिळवण्यासाठी स्वतःला व स्वतःच्या मुलीला ढोंगी बाबांकडे अर्पण करण्याऱ्या घटना उघडकीस आल्या आहेत. एवढं होऊनसुद्धा लोक आपल्या सद्सतविवेक बुद्धीचा वापर का करत नाही याचं आश्चर्य आहे.
दुसरीकडे, संत बनू पाहणाऱ्या उपदेश देत फिरणाऱ्या लोकांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. काही जण उच्च शिक्षण घेऊन हे उद्योग करतात, तर नोकरी करून साईड-बिझनेस म्हणून. आपला भोळा-भाबडा समाज यांच्या मागे जातो आणि आपल्याला सर्वसाधारण गोष्टींचं उपजतच ज्ञान असतानाही इतरांकडून तेच ज्ञान पैसे खर्च करून ऐकण्यास भलं मानतो. अशा मानसिकतेचा ते लोक फायदा घेतात आणि आपलं दुकान चालवतात. आज त्या लोकांची अफाट संपत्ती आहे, तीही आपल्यामुळेच. शेवटी आपल्याला त्याचा निकाल काय मिळतो, ते अनुभव घेतलेल्या लोकांना विचारा, ज्यांनी ह्या गोष्टी करून सोडून दिल्या आहेत....
 माझं सर्वांना हेच सांगणं आहे की अशा नकली लोकांवर विश्वास ठेऊ नका, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, आणि या गोष्टी इतरांनाही सांगा.

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, ...

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. ...

कसले हे बौद्ध...

 बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त...