पती कसा असावा? या विषयावर तर मी नक्कीच बोलणार नाहीये. कारण हा मुद्दा फार नंतर उदयास आला. हे का निर्माण झालं असावं? यावर मी "माझे विचार" मांडणार आहे...
इतिहासापेक्षा आपण आजचेच संदर्भ पाहू, तुमच्या लगेच लक्षात येईल, की पती ही संकल्पना निर्माण होताना नक्की काय झालं असावं.
पती म्हणजे एखाद्या सजीव किंवा निर्जीव गोष्टीचा मालक. आज आपण लखपती म्हणतो तो असतो लाखो रुपयांचा मालक, करोडपती म्हणतो तो असतो करोडो रुपयांचा मालक, तसंच आपण फक्त "पती" म्हणतो तो असतो एखाद्या स्त्रीचा मालक. आता आपण जातो ते इतिहासातील स्त्रीदास्य, गुलामगिरी, अतिशूद्र ह्या गोष्टींकडे. बुद्ध काळापूर्वी स्त्रीसत्ता / मातृसत्ता होती, त्याच दरम्यान गणकाळ आला. त्याच्या काही काळानंतर आर्य भारतात आले. त्या आर्यांनी भारतातील लोकांवर सत्ता मिळवण्यासाठी एक विशिष्ट वर्ग निर्माण केला, तो होता ब्राह्मण वर्ग. (इथे आजची ब्राह्मण जात समजू नये, तर ब्राह्मण या 'शब्दाचा अर्थ' मला अभिप्रेत आहे.) त्या ब्राह्मण वर्गाने इथल्या मूळच्या लोकांना मुर्ख बनवून त्यांच्यावर शासन करण्यासाठी वेद, पुरण, वेदांत, आरण्यके, उपनिषद, स्मृती, श्रुती इत्यादी प्रकारचे ग्रंथ निर्माण केले आणि त्याला धार्मिक अधिष्ठान दिलं. इतिहासापासून आजपर्यंत एक सत्य आहे, की एखाद्या समाजाला आपला गुलाम करायचा असेल तर त्यांच्या स्त्रियांना टार्गेट करा. कदाचित हेच तत्व वापरून मनुस्मृती लिहिली गेली, पण ती फक्त स्त्रियांपुरतीच नाही तर त्यामध्ये संपूर्ण समाजासाठी बंधनाचे कायदे लिहून ठेवले होते. त्याच विचारांवर आधारित अडीच-तीन हजार वर्ष ही गुलामगिरी चालली. मानुस्मृतीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्ण सांगितले. ती उतरंड होती, त्यात भेदभाव होता, प्रत्येक वर्ण एका खाली एक असा होता; पण त्याहीपेक्षा खाली होत्या स्त्रिया. कारण कोणताही वर्ण, कोणतीही जात असो, त्या त्या वर्णातील अथवा जातीतील स्त्रियांना दुय्यमच स्थान होतं. ही गोष्ट हजारो वर्ष लोकांना समजलीच नव्हती. बऱ्याच वर्षांनी एका महापुरुषाने ही संकल्पना मांडली, ते म्हणजे महात्मा जोतीबा फुले. त्यांना या गोष्टीची जाणीव झाली आणि चारही वर्णांच्या शेवटी अतिशूद्र ही नवीन संकल्पना मांडून लोकांना त्याची जाणीव करून दिली आणि त्याविरुद्ध लढले.
आता स्त्रिया का दुय्यम ठरल्या? शिकण्याचे, शिकवण्याचे व धर्माविषयी बोलायचे अधिकार ब्राह्मणांकडे असल्यामुळे, तेव्हाच्या काही कपटी ब्राह्मणांनी इतरांच्या नकळत ऋग्वेदात पुरुषसुक्त मिसळलं. त्यामुळे लोकांना असं वाटू लागलं की हे देवानेच सांगितलेलं आहे आणि याला आपण अमान्य करूच शकत नाही; कारण आर्यांच्या टोळीने लोकांना भुरळ पडली होती की वेद - पुरण हे देवाने लिहिले. मग "धर्माने"(?) सांगितल्याप्रमाणे लोक वागू लागले. स्त्रियांनी सुद्धा स्वतःची हीच दुय्यम होऊन राहण्याची मानसिकता करून घेतली, ती आपण आज पर्यंत पाहतो.
ती आज कशी पाहतो? स्त्रिया मंगळसूत्र, बांगड्या, कुंकू, जोडवे, पैंजण, इत्यादी स्वतःच्या शरीरावर चढवतात. त्या आज जरी स्त्रियांना सुशोभित, अलंकारित, सुंदर दिसण्यासाठी वापरल्या जात असल्या, तरी त्यामागे त्यांच्या गुलामीचा इतिहास आहे. पण ती मानसिकता आजच्या समाजातसुद्धा एवढी घट्ट रुजून आहे की, समजा आज मी एखाद्या वस्तीत जाऊन तेथील बायकांना म्हणालो, की मंगळसुत्र आणि हे सर्व तुमच्या गुलामीचं प्रतिक आहे, तर त्या मला जोड्याने मारायलाही कमी करणार नाहीत. नवऱ्याने बायकोवर चिडावे - रागवावे, तिला एखाद्या वेळी मारावे, या अशा गोष्टी स्वतः स्त्रीच अपेक्षा करून असतात. मग इतर कोणी जाऊन तिथे सुधारणा करूच शकत नाही.
लग्न ही संकल्पना जन्म घेताच स्त्री ही एकाच पुरुषाशी बांधील झाली. त्याअगोदर स्त्रियांचे अनेक पुरुषांशी नैसर्गिक संभोग होत होते. कारण लाज, इज्जत, भेदभाव या मानसिक गोष्टी तेव्हा अस्तित्वातच नव्हत्या म्हणूनच आदिमानवाला शरीरासाठी कपड्याची गरज भासली नाही. पण जेव्हा या गोष्टी अस्तित्वात येत गेल्या, तेव्हापासून मनुष्य प्रण्यातील दोन जाती लोक ओळखू लागले, ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. मग त्यांच्यातले फरक त्यांना जाणवू लागले आणि लोक या गोष्टींबाबत विचार करू लागले. पुढे लग्न ही संकल्पना भौगोलिकदृष्ट्या भिन्न असायची. कुठे स्त्री पुरुषांना समान वागणूक तर कुठे त्यापैके कोणा एकालाच महत्व. त्याचदरम्यान पुरुषांनी स्वतःला उच्च ठरवलं आणि गुलामगिरीचे पुढील प्रतिक निर्माण झाले.
काही ज्ञानी लोकांशी चर्चा करत असताना अशा गोष्टी माहित पडल्या की, गुलामीचे प्रतिक म्हणजे मंगळसुत्रातले दोन गोलाकार मणी ते पुरुष लिंगाचे प्रतिक आहे. बांगड्यांचा आवाज सतत जाणीव करून देतो की तू एका पुरुषाची स्त्री आहेस. जोड्व्यांची बनावट अशी असते ते गोल असून त्याला दोन्ही बाजूस टोक असतं जेणेकरून घरात वावरताना ते टोचले पाहिजे. नाकात व कानात दिसणारे दागिने पूर्वी पुरुष स्त्रियांना शिक्षा देण्यासाठी वापरत, जे सुरुवातीला टोचताना पण त्रास होतो आणि नंतर स्त्रीच्या शरीराला वेदना होण्यासाठी शिक्षा म्हणून ते ओढत होते. केस वाढविणे हाही त्याचाच प्रकार. या गोष्टी अनेक हजारो वर्ष चालत राहिल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या संस्कृतीला पुरुषसत्ताक संस्कृती म्हणून लोक ओळखू लागले.
स्त्रियांबाबत अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याची मला फार चिंता वाटते...

Comments
Post a Comment