Skip to main content

Posts

Showing posts from January, 2014

तळपते सूर्यपुत्र

आपल्या अंतरिक्षात
एका सूर्याने अनेक ग्रहांना जन्म दिला.
अनेक वर्ष
त्या सर्व ग्रहांचा संघर्ष सुरूच होता,
आजही सुरूच आहे...
आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी,
पुढे जगण्यासाठी.
त्या सुर्यानेच त्यांना जिवंत ठेवलं होतं.
त्याच्याच भोवती सगळे ग्रह फिरत होते,
आणि तोच सूर्य सगळ्या ग्रहांना
प्रकाशमान करत होता;
त्याच्या उजेडाने आणि तळपत्या तेजाने...

त्याच तप्त ग्रहांमध्ये
त्यांचं स्वतःचं जग निर्माण झालं.
त्याच निसर्गाने
त्यांना "निळं आभाळ" दाखवलं.
ज्यावेळी अतितप्त सूर्यकिरणे
त्या निळ्या आभाळातून - ग्रहांवर पडतात,
आणि काही वेळाने सूर्य मावळतो;
तेव्हा सर्वत्र "भगवं वातावरण" पसरतं...
जे पुढे जगाला अंधाराकडे घेऊन जातं...
आणि त्याच अंधारात
... पँथर जन्म घेतो
त्या अंधाकाराला दूर करायला
आणि पुन्हा या जगाला
निळ्या आभाळाखाली प्रकाशमान करायला...

- आशित साबळे.

आजचा दिवसभराचा अनुभव

आज खूप आनंद होत आहे की मी अशा ठिकाणी जाऊन आलो जिथे महाराष्ट्रातला एक प्रचंड मोठा इतिहास घडला आहे; ते म्हणजे "भीमा-कोरेगाव".
माटुंगा रोडवरून निघालो, दादरवरून CST ट्रेन पकडायची होती. पहाटे CST लोकल ७ मिनिटं उशिरा आली. CST वरून "इंद्रायणी एक्स्प्रेस" पकडायची होती. एका ट्रेनमुळे संपूर्ण प्लान बिघडला. जाम वैतागलो त्या लोकलच्या टाईमिंगवर. शेवटी ठरवलं की, तीच पुण्याची ट्रेन आता दादरवरूनच पकडणार, तेही विदाऊट तिकीट. सगळे मित्रमंडळी खूप अगोदर CSTला जाऊन बसल्यामुळे माझी सीट राखून ठेवली होती. मजा मस्ती करत पुण्याला पोहोचलो. दोन दिवस अगोदर पुणे स्टेशन बाहेर काहीच नसताना आदल्या दिवशी तिथे काम सुरु केल्याने बाहेर जाण्यासाठी फक्त एक गल्ली उपलब्ध ठेवली होती. प्रचंड गर्दी तिथेच खूप वेळ पॅक झाली, हळू हळू आम्ही बाहेर पडलो.

 बस स्थानकावरून भीमा कोरेगावासाठी स्पेशल बसेस सोडण्यात येत होत्या. आम्ही बसमध्ये चढलो आणि पटापट जागा धरली. जिथे मी बसलो होतो, तिथेच बाजूला एक चाळीशीतला माणूस आला. कदाचित दारू पिऊन आला असावा, खूप बडबड करत होता. आधीच तिथे सुरतहून एक "मोरे" नावाचे जयभीमवाले …

"१" इतिहास मुक्तीचा

१ जानेवारी १८१८ चा इतिहास
कोणाला माहित आहे का?
मला माहित आहे,
विटाळ होत असेल या सत्याचा.
अस्पृश्यांचा इतिहास आहे हा;
जे लढले जुलमी पेशवाईच्या विरोधात.
युद्ध नावाला होतं इंग्रज आणि मराठ्यांचं,
खरं ते होतं हक्क, अस्मिता आणि
जातिभेदाच्या उच्चाटनासाठी.
अस्पृश्य आणि पेशव्यांचं युद्ध...
कोणी शिकवलंच नाही शाळेत हे सर्व.
शाळेत होता इतिहास हरलेल्या लोकांचा
कारण की ते स्पृश्य होते.
मग ते हरलेले का असेनात,
पानिपतात किंवा महाराष्ट्रात...

त्या दिवशी युद्ध सुरु होण्याआधी
शिरूरहून भीमा कोरेगावात
महार बटालियन ४३ किलोमीटर
उपाशी पोटी मार्च करत आले.
सकाळीच पेशव्याचे सैनिक हजर झाले;
वीस हजार घोड्यावर स्वार,
आठ हजार पायी तयार.
असं सैन्य त्या पेशव्यांचं,
जवळजवळ ३० हजार सैनिकांचं...
त्यातले दोन हजार आधीच पळून गेले होते.
महार बटालियन पाचशेच होते.
बारा तास युद्ध चाललं,
पाचशेच्या सैन्याने २८ हजारांना कापलं.
जुलमी पेशवाईला तोडलं,
आणि मनुवादी शक्तीला संपवलं.

हा इतिहास शाळेच्या पुस्तकात
एखाद्या पानावर छापला तर
मुलांना लक्षात तरी येईल
की पेशवाई तर संपली, पण ती कशी...
हे सांगताना त्यांना "त्या" सैन्यांचं नाव घ्यावं लागणार,
म्हणून हा …