Skip to main content

Posts

Showing posts with the label डब्बा

रात्रीची रेल्वे आणि स्त्री

 काही दिवसांपासून रात्री उशिरा पर्यंत रेल्वे ने प्रवास करतोय. कांदिवली ते दादर भावासोबत ये जा आजकाल सुरूच आहे. काल रात्री १.३० च्या सुमारास दादरला घरी आलो. येताना प्रत्येक ट्रेनचं निरीक्षण करत असताना बरेच पुरुष स्त्रियांच्या डब्यात प्रवास करताना दिसले. रात्री काहीतरी १०-११ च्या नंतर स्त्रियांच्या डब्यात पुरुषांना प्रवास करायची परवानगी देणे ही किती मुर्खासारखी गोष्ट आपल्या सरकारने केली आहे.  एवढे सारे प्रकरण समोर येऊनसुद्धा आपल्या सरकारचे डोळे उघडत नाहीयेत. ज्या वेळी स्त्रियांना जास्त सुरक्षेची गरज असते, त्यावेळी नेमकं "पुरुषांना" डब्याच्या आत परवानगी ! अत्याचार होत असताना अनेक स्त्रिया त्याचा प्रतिकार करतील ही, पण अशा वेळी एक (एकटी) स्त्री काय करणार!  बातम्या, वृत्तपत्र, टी.व्ही., इत्यादींद्वारे आपणास तुरळक गोष्टी कळतात, पण घडलेल्या असतात त्याहूनही कित्येक पट जास्त. ती गोष्ट वेगळी की स्त्रियांनी स्वतःलाच कुमकुवत बनवून ठेवलं आहे. पण काळाची गरज आहे ती त्यांना बळावण्याची.  पोलीस असतात, इतर चांगले लोक लक्ष ठेवतील, त्याने स्त्रियांचं संरक्षण होईल; ह्या सगळ्या नंतर च्...