Skip to main content

सेन्सॉर

 आजच्या आधुनिक जगात, लोकांना असं वाटू लागलं आहे की आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारल्याने प्रगती करू. पण पाश्चात्य देशांतील कोणत्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे त्याचा विचारही हे लोक करत नाहीत. आजचे चित्रपट वा जाहिराती पाहिल्या, तर त्यामध्ये मूळ गोष्टीचा आशय कमी आणि अश्लीलता जास्त दिसते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ह्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड पास तर करतच, पण ते ही "युनिवर्सल" सर्टीफिकेट सह! जे चित्रपट "अडल्ट" कॅटेगरीमध्ये येतात त्यांना युनिवर्सल श्रेणीचं प्रमाणपत्र का व कसं दिलं जातं? माझ्या मते याचं उत्तर असं असेल, की चित्रपट बनवणाऱ्यांना त्यांचा प्रेक्षकवर्ग अधिक वाढवायचा असेल (साहजिकच पैशांसाठी), म्हणून ते सेन्सॉर बोर्डमध्ये अधिकाऱ्यांना लाच देऊन असे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करत असतील.
 याचा दुष्परिणाम संपूर्ण समाजावर होतो, त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये तो अधिक लवकर रुजतो. कारण जे चित्रपट प्रौढांसाठी असतात, ते हे लहान मुलं पाहतात, आणि बऱ्याचदा याचं अनुकरण होताना दिसतं. उदाहरणार्थ; आजला शाळेतली लहान-लहान मुले-मुली (अगदी ५वी-६वीचे) "गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड" होताना आढळतात. हे वाचून तुम्हाला हसू आलं असेल, पण ही सत्यस्थिती आहे. आणि याचं तुम्हाला हसू न येता, हा एक गंभीर विषय म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण ज्यांना "प्रेम" तर काय, इतर काहीच कळत नसताना ते असे वागू लागले तर पुढे फार वाईट परिणाम होऊन त्यांच्यावर चुकीचे संस्कार होतात. जे या देशाचे भविष्य घडविणार असतात तेच उद्या स्वतःचच भवितव्य धोक्यात टाकतील.
 दुसरीकडे असं आढळतं की, स्वतःला उच्च दर्जाचे वा श्रीमंत समजणारे लोक स्वतःच्याच मुलांना असे चित्रपट पाहण्यास परवानगी देतात, कधीकधी तर सोबतच घेऊन जातात, (हे शक्य होतं ते सेन्सॉर बोर्डमुळे.) आणि याने त्या घरातील मुले मोठे झाल्यावर त्यातील काल्पनिक पत्रांचं अनुकरण करतात. उदाहरणार्थ; मुलींनी अगदी तोकडे कपडे घालणे, मुलांचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आक्रमक होणे, ई.
 कुटुंब एकत्र होऊन पाहतात, ती गोष्ट म्हणजे टी.व्ही., त्यावर सुद्धा प्रसारीत होणाऱ्या गोष्टी सेन्सॉर केल्या जात नाहीत. कारण इथेही तोच भ्रष्टाचार चालतो.
 लहान मुलांव्यतिरिक्त इतरांबद्दल पाहिलं, तर इथेही मोठ्या प्रमाणात अनुकरण होताना दिसतं. उदाहरणार्थ; एखाद्या गोष्टीसाठी सरळ एखाद्याची हत्या करणे. अशा गोष्टी न कळत घडू लागल्या आहेत.

 सेन्सॉर बोर्डची दुसरी बाजू म्हणजे, खऱ्या गोष्टी दाखविणाऱ्या चित्रपटांवर बंदी लावणे; मग ते इतिहासातील असो किंवा वर्तमानातील. नुकताच एक चित्रपट बनला जो दलितांवर झालेले अत्याचार दाखवतो, ज्या वेळी समाजात वर्णव्यवस्था घट्ट बसली होती, तेव्हाच्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र या घटकांमधील भेदभाव दाखवतो. असा तो "शूद्र" नावाचा चित्रपट सेन्सॉर बोर्डमध्ये बरेच महिने रखडला. त्यांना अशी अट घालण्यात आली की, जर एक लाख लोकांनी या चित्रपटाला मान्यता देऊन एस.एम.एस. केला, तरच हा चित्रपट पास करू. अशा प्रकारे सेन्सॉर बोर्डमधले लोक एकीकडे खऱ्या गोष्टींना अडथळा निर्माण करतात, तर दुसरीकडे चुकीच्या गोष्टींना मान्यता देतात ज्या समाजाला हानिकारक आहेत. मी इथे उल्लेख केलेला हा एकच चित्रपट नाही तर असे अनेक आहेत, जे प्रेक्षकांपासून दूर ठेवण्यात आले.
 उदाहरणार्थ; एका व्यक्तीने समाजातील भ्रष्टाचारावर, अन्यायावर, भेदभावावर, सात्य कथानकावर, लोकांच्या व्यथा दाखविणारे जवळपास २२ माहितीपट बनविले ज्याला सेन्सॉर बोर्डने मान्यता दिली नाही. असं का होतं? असं जर मला विचारलं तर, माझं असं मत आहे की शोषक, भांडवलदार, भ्रष्ट नेते, अधिकारी, ई. लोकच वरून सर्व व्यवस्था चालवतात, मग सामान्य माणूस जाणार कुठे? पुढे दोनच पर्याय आहेत; आपले जे कार्य होत नाही ते बेकायदेशीरपणे करणे, आणि दुसरं म्हणजे गप्प बसणे.
 जेव्हा एखादा स्वतः राजकारणी वरील विषय दाखवतो, तेव्हा त्याला कोणाची मान्यता घेण्याची गरज भासत नाही, ना कोणी त्याला विरोध करत. त्यामागे त्याचा हेतू असतो तो आश्वासने देऊन त्या कामात पैसे खाणे. कारण त्यावेळी सर्व कायदे तो आपल्या खिशात ठेऊन चालतो; पण एखादा सामान्य व्यक्ती असं करतो तेव्हा मात्र त्यावर बंदी आणली जाते, त्याला विरोध होतो कारण त्यामागे त्याला ना पैसे खायचे असतात ना भ्रष्टाचार करायचा असतो, त्याला फक्त समाजातील खरी परिस्थिती दाखवायची असते. मग वरून दबाव आणला जातो आणि अशा गोष्टी दाबल्या जातात.

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…