Skip to main content

Posts

Showing posts from February, 2014
दि. १९ फेब्रुवारी २०१४. २ वाजता.  आज अचानक नागराज मंजुळे माझ्या कॉलेजच्या बाहेर कट्ट्यावर भेटले. लेक्चर असताना बाहेर थांबलो. अमित भंडारी आणि ते कॅमेरासमोर गप्पा मारत बसले होते. मी त्यांचं संपेपर्यंत थांबलो. अगोदर अव्य आणि सुजाता गेले, त्यांना ते पुण्यातच भेटले होते, बघितलं होतं. नागराज मंजुळेंनी त्यांना ओळखलं. त्यांच्या पाठोपाठ मी गेलो त्यांना हात मिळवला आणि फेसबुकवर Fandry बद्दल लिहिलेलं सांगताच त्यांनी मला ओळखलं!!! स्वताहून त्यांनी माझं नाव घेतलं!!! मला फार फार आनंद झाला आणि आश्चर्यही वाटला; की फेसबुकवर अनेकांनी Fandryवर लिहिलंय आणि या क्षेत्रात अनेकांना भेटल्यावर डोक्यात जो गोंधळ होतो, तेव्हा आधी भेटलेल्या लोकांनाही लोक ओळखत नाहीत, पुन्हा डोक्यात गेलेली हवा असते. फुगिरी मारत लोक भाव खातात; पण नागराज मंजुळेसारखा आभाळा इतकं यश गाठलेला चित्रपट दिग्दर्शक इतका साधा पण इतका हुशार आणि स्मरणशक्ती इतकी दांडगी की फेसबुकवर कोण्या एका मुलाने लिहिलेला त्याचा अनुभव नागराज मंजुळे लक्षात ठेवतात आणि कधी न भेटलेल्या त्या मुलाला ते लक्षात ठेवून ओळखतात!!! हे अनुभव तर मी आयुष्यात विसरू शकत नाही. पुन्

तू बता...

रगों में लाल लहू है, तेरे भी मेरे भी ; फिर ये जात और धरम कहाँ है... तू बता... किसने किसे बनाया मालूम नहीं, तुझे भी मुझे भी ; फिर ये उपरवाला आया कहाँ से... तू बता... सभी मजहब ने तो इंसानियत सिखाई है, तुझे भी मुझे भी ; फिर ये दंगे फसाद क्यूँ है... तू बता... प्यार तो सभी ने किया है, तूने भी मैंने भी ; फिर ये नफरत क्यों है, तू बता... अपनों के लिए दरवाजे तो खुले है, तेरे भी मेरे भी ; फिर दूसरों के लिए दीवारें क्यों है, तू बता... पेट तो सभी का भरता है, तेरा भी मेरा भी ; फिर किसान मरता क्यों है, तू बता... तुझे धर्म ने बनाया हुआ इन्सान चाहिए ; या इन्सान ने बनाया हुआ धर्म चाहिए, तू बता... - आशित साबळे

Post-Fandry experience

काय पिच्चर बनवलाय ल्येका...!!! मराठी चित्रपटसृष्टीतला एक क्रांतिकारी टप्पा म्हणजे "फँड्री" Conceptual :-  मला असं वाटतं की, फँड्री मधली प्रेमकथा ही त्या चित्रपटासाठी एक कथेचा आधार म्हणून वापरली. ती जाणीव तर होतेच की, त्या वयातले मुलं हे असं करतात आणि ते नैसर्गिक व स्वाभाविक आहे. मी तर म्हणेल ही प्रेमकथाच नव्हती, चित्रपटात दिग्दर्शकाने जब्याच्या मनातलं त्या मुलीबद्दल असणारं आकर्षण दाखवलं आहे. पण मुळात हा चित्रपट भारतातील जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. जब्याच्या मनात शालूसाठी जे काही आहे, त्याच्यासोबत त्याला त्याच्या जातीमुळे वाटणारी घृणा, न्यूनगंड आणि असमानता या गोष्टी त्याला आतून अस्वस्थ करत असतात.  माणसाला त्याच्या जन्मासोबत त्याची जात फ्री मिळते, आणि त्याच जातीप्रमाणे त्या माणसाला वागावं लागतं आणि काम करावं लागतं. याच ठिकाणी सुरु होतो तो उच्च आणि "नीच" भेदभाव. कैकाडी (निम्न / अस्पृश्य) जातीतला हा मुलगा एका सवर्ण मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला ह्या सर्व जातीच्या भिंती तोडून समान जगायचं असतं आणि त्याला शाळेत मित्रांसमोर आणि शालूसमोर शायनिंग मारण्य

Pre-Fandry

१४ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहतोय... फक्त "फॅंड्री"साठी! एखादी जवळची व्यक्ती आपल्याला खूप दिवस भेटली नाही तर त्याची जशी आठवण येते, त्याच प्रकारे या चित्रपटाने मनाला घोर लावलाय. ही फिलिंग यासाठी येतेय की चित्रपटाचे प्रोमोज, थीम सॉंग, मुलाखतींचे विडीयो, इत्यादी पाहून मी त्या कथेशी कनेक्ट होत चाललोय, असं वाटू लागलंय. म्हणूनच की काय, मला माझी कथा बघायची घाई झाली आहे असं वाटतं. आम्हीच काही जणांनी दादर-माटुंगाला "चित्रपट - काल, आज, उद्या" असा परिसंवाद ठेवला होता, तेव्हा फॅंड्रीबद्दल पहिल्यांदाच प्रत्यक्ष "नागराज मंजुळे" यांचाकडून ऐकायला मिळालं. म्युझिक लाँचच्या दिवशी मी "तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला" हे गाणं २० ते २५ वेळा तरी ऐकलं असेल आणि आजपर्यंत सगळे गाणे बाजूला ठेऊन हेच गाणं ऐकतोय. काही दिवसांपासून आजूबाजूचं वातावरण "फॅंड्रीमय" झालं आहे. जो तो फर्स्ट डे फर्स्ट शो फॅंड्री बघायचं म्हणतोय, म्हणून मला तिकीट मिळेल की नाही याची चिंता वाटू लागलीये. पण काहीही होवो, अॅट एनी कॉस्ट मी फर्स्ट डे फर्स्ट शो फॅंड्री बघणारच. आणि तो चित्रपट पाहून

मॉडर्न Orthodox

समोर Facebook हातात WhatsApp, काळजात धर्म आणि मनात जात... मित्रांमध्ये Windows 8 च्या गप्पा, आणि घरात मात्र XPची साथ... खिशात Android असताना, तोंडातून निघते Reservationची बात... Smartphoneच्या स्क्रीनवर "बुवा बाबाचा" फोटो, विज्ञानाच्याच कुशीत होते अंधश्रद्धेची जाहिरात... Doctorच्या पण मनात भरलंय अध्यात्माचं ध्यान, Patientचा जीव वाचला नाही तर म्हणतो सारं देवाच्या हातात... इतिहासाच्या पलीकडे जाऊन चालते यांची बुद्धी, पुन्हा पुरावे शोधत शोधत घेतात Internetचं माप... Video पाहून लोकांच्या डोक्यात होते भलतीच गर्दी, हावरट लोकांमुळे लागते बिचाऱ्या YouTubeला पण धाप... चुकीच्या गोष्टींनी Memory भरायला काहीही पाठवतात, अजून वाट लावतो म्हणत देतात Googleला ही हे ताप!!! - आशित साबळे