भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास ६५ वर्ष झाली. या देशावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केलं. त्याहीपूर्वी प्राचीन भारतच्या इतिहासात समाजावर धर्मानेच राज्य केले आहे. धर्म जे सांगेल, त्याचे नियम पाळणे अनिवार्य होते. पण जेव्हा इंग्रज भारतात आले, त्यावेळी धर्माची सत्ता कमी झाली. परंतु अप्रत्यक्षरित्या इंग्रजांच्या सत्तेसोबत त्यांचा ख्रिस्ती धर्मसुद्धा भारतात आला. या सर्व गोष्टींवरून आपल्या हे लक्षात येऊ शकते की, धर्म आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी असून ते कुठेतरी जुळलेले आहे. किंबहुना राजकारणी ते जोडत आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना समिती स्थापन करण्यात आली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांमध्ये राज्यघटना तयार झाली. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे "भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे". स्वतंत्र भारताची राज्यघटना मान्य झाल्याच्या पुढे देशाने या तत्त्वांवर चालायला हवं होतं. पण आज आपल्या देशात काय दिसून येतं ते, धर्म, जाती व जमातवादी राजकारण. "जिथे" आपण भारताला धर्मनिरपेक्ष म्हणतो "तिथेच" आपण एखादा विशिष्ट "वाद" घेऊन "राजकारण" करतो. राजकारण हे सर्वसमावेशक असलं पाहिजे, जिथे फक्त देशाच्या हिताचा वाद असलं पाहिजे. मुळात याच सर्व चुकीच्या गोष्टींमुळे 'राजकारण' ही संकल्पना दुषित झाली आहे. संकल्पनाच नव्हे तर संपूर्ण राजकारणच दुषित झालं आहे.
भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, अनेक संघटना आहेत ज्या आतून किंवा उघडपणे एकमेकांशी संबंध ठेऊन कार्यरत असतात. आजच्या घडीला देशात हिंदुत्ववादी, मुसलमान आणि बहुजन समाजाचे वारे चहुकडे घोंगावत आहे. याच गोष्टींचा फायदा घेऊन नवनवीन पक्ष निर्माण होत आहेत.
शिवसेनेसारखा पक्ष स्थापन होत असताना त्यांची भूमिका फार वेगळी व चांगली होती. मग त्यांनी महाराष्ट्रीय व मराठी भाषिक लोकांचा मुद्दा उचलला. पण महाराष्ट्राच्या बाहेर देशभरात राजकारण करण्याच्या हेतूने दिल्ली हे केंद्रबिंदू ठेवून त्यांनी आपली भूमिका बदलली आणि हिंदुत्ववाद सुरु केला. पक्षाचे केंद्रस्थान धर्म ठेवणे ही त्यावेळी नवीन गोष्ट असल्याने बहुतेक हिंदू धर्मीय लोक त्या पक्षाकडे आकर्षित होऊन त्यात सामील झाले. पण पुढे याच धर्मवादामुळे समाजात भेदभाव निर्माण झाले आणि हेच हिंदुत्ववादी लोक मुसलमानांचा द्वेष करू लागले.
याप्रकारे बरेच 'हिंदू धर्म' घेऊन घेऊन पक्ष सुरु होऊ लागले, त्यांना काही संघटनांचीसुद्धा साथ मिळाली; उदा:- भाजपा, राष्ट्रवादी, बजरंग दल, रणवीर सेना, छावा, ई. असं ऐकण्यात येतं की ज्या गावांमध्ये वरील नमूद केलेल्या लोकांची सत्ता आहे, त्या ठिकाणी मागासलेल्या जातीतील लोकांवर अन्याय-अत्याचार होतात, कारण ते सत्ताधारी हिंदू धर्माचे नाव घेऊन एकत्र होतात आणि जुन्या रुढी-परंपरा लक्षात ठेऊन मागासवर्गीयांना त्रास देतात. बऱ्याचदा धर्माचे नाव घेऊन सत्तेसाठी मत मिळवतात पण नंतर त्याच मतदार जनतेला दुर्लक्षित करून टाकतात.
ज्या काळात धर्माची सत्ता रूढ होती, त्याकाळी विशिष्ट समाज गटांना अस्पृश्य ठरविण्यात आलं. त्याच मागासलेल्या लोकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढले व त्या जातींमधून समाजाला मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारला. तेच बौद्ध झालेले काही लोक आज परत त्याच जातींच्या मुद्द्याला धरून बौद्ध तत्त्वांवर आधारित विचारधारा असणारे पक्ष काढतात; उदा:- बहुजन समाज पक्ष, रिपब्लिकन पक्षाचे विविध गात, ई. त्याचबरोबर अनेक संघटना, उदा:- दलित पँथर, बामसेफ, ऊ.
महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी वरील नमूद केलेल्या पक्षांपैकी 'रिपाई' हा पक्ष अनेक इतर पक्षांसोबत युती साधत आहे. रिपाई आणि झालेली इतर पक्ष वेगवेगळ्या विचारांचे असून सत्तेसाठी 'समझौता' करतात, मग अशावेळ त्यांना आपल्या धर्माचे किंवा पक्षाचे विचार मनात असूनही वेगळे ठेवावे लागतात. हे सगळं असतं ते सत्तेसाठी.
पण इथे मात्र 'बसपा' पक्षाचे धोरण वेगळेच दिसते. ते सत्तेसाठी नाही तर पक्षाच्या विचारधारेवर चालून स्वतःच्या इच्छेचे राजकारण करतात. ते सत्तेसाठी धर्माचा वापर करतात असे आपण बोलू नाही शकत पण सत्ता आल्यावर मात्र त्यांची बौद्ध धाम्माशी जवळीक दिसून येते. बसपाच्या सत्तेत प्रत्येक गाव, शहर, पार्क, शाळा, विद्यापीठांचे व रस्ते इत्यादींची नाव बदलून त्यांनी लोकांच्या हितासाठी लढणाऱ्या महामानवांचे नाव दिले; उदा:- गौतम बुद्ध नगर, डॉ. आंबेडकर पार्क, ई.
कॉंग्रेस च्या राहुल गांधी ने सत्तेसाठी मुसलमानांचा पाठींबा मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या पोशाखात राहून दाखविले, जेणेकरून ते खुश होतील. अगदी या पातळीपर्यंत हे राजकारणी सत्तेसाठी धर्माचे नाव घेऊन दिखावा करायला जातात.
आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी एखादा पक्ष आपल्या विरोधात असणाऱ्या समाजातल्या काही लोकांना भडकावून किंवा पैसे देऊन दंगल घडवतात, जेणेकरून देशातील लोक त्या दंगल करणाऱ्या समाजाच्या विरोधात जाऊन परत त्याच पक्षाला मत देतात जे सत्तेत आहे, किंवा दंगल करणाऱ्या समाजाच्या विरुद्ध आहेत. अशाप्रकारे धर्मवाद घेऊन राजकारणी लोक सत्ताकारण करतात.

Comments
Post a Comment