Skip to main content

Posts

Showing posts from April, 2014

ठाव

सॉक्रेटिस ते ॲरिस्टॉटल, चार्वाक, बुद्ध ते चक्रधर, अलेक्झांडर ते शिवाजी, मार्क्स पासून माओ, अशोक ते आंबेडकर, संतांपासून शाहीर, सर्वांनीच मला ओळखलं सर्वच माझ्याकडून शिकले... अण्णाभाऊंनी तर ही सृष्टी माझ्यामुळे तरलेली म्हटलंय... तर बागुलांनी या सृष्टीचा निर्माताच मला म्हटलंय... असंख्य कविता, ओव्या माझ्यावर रचल्या गेल्यात... अगणित कथा कादंबरी माझ्यावर लाहिल्या गेल्यात... या कशातच दैवी काहीच नाही. सर्वच मी आहे, आणि माझ्यापासूनच सर्वकाही आहे. मग अदृश्याचं अस्तित्व टिकवून, मलाच माझं अस्तित्व शोधायला लावणारी, व्यवस्था का आहे? कोणाला माहीतच नाही... - आशित साबळे

झळ

पोट न बघता खिसा बघायचा, जेवायला... पोट फाटलं तरी खिसा जपायचा, जमलेले पैसे ठेवायला... फाटकी चप्पल पायात घालून, टाच जमिनीवर घासत निघालो... जगात कोणी कुणाचं नाय, हे माझ्या मनालाच म्हणालो... तापलेल्या जगाने लावलं उन्हाकड जायला... रस्त्यावरच्या चटक्यातून शिक्षण घ्यायला... पाठीवर ओझं घेऊन चालत निघालो, मिळालेल्या घातातून शहाणा मी झालो... रात्रीच्या गारव्यात, गेलो मी झोपायला... दगडाचं काळीज माझं लागलं विचार करायला... - आशित साबळे