Skip to main content

शिवी

 आजच्या युवा पिढीला काही गैरसमज आहेत की शिव्यांशिवाय भाषा नसते, किंवा कालच्या पिढीला याची जाणीव नसल्यामुळे त्यांना याचं आश्चर्य वाटत असेल. मी कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे मला याचा फार अनुभव आला आहे की, साध्या वाक्यांमध्येसुद्धा एकातरी शिवीचा वापर होतो. जास्त आश्चर्य याचं की, त्या शिव्या स्त्रीवाचक असतानाही मुलीसुद्धा ते शब्द सर्रास उच्चारतात; आणि त्याहून अधिक आश्चर्य याचं की आपल्या समाजावर पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे इतका परिणाम झाला की एखाद्यावर राग व्यक्त करणे यासाठी शिवीच तोंडी येते. अगदी चांगल्या मनःस्थितीत असताना एखादा मित्र भेटला, तेव्हासुद्धा शिवीच!
 जर कोणी शिवी देत असेल तर त्यावर माझं एकच मत आहे की, तुम्ही शिवी देतात ती स्त्रीवाचक असते. जास्तीत जास्त शिव्यांमध्ये स्त्रियांच्या अवयवांचा उल्लेख असतो. तर शिवी देणाऱ्याने एकच लक्षात ठेवावे की, तो स्त्रीवाचक शिवी देत असेल तर ती शिवी संपूर्ण स्त्री जातीला (त्याच्या मानसिकतेनुसार) लागू होते, त्याच स्त्री जाती मध्ये त्याची आई, बहिण, इत्यादी जवळील स्त्रिया समाविष्ट होतात हे साहजिक आहे. मग शिवी देणारा जेव्हा शिवी देतो, तीच शिवी त्याचाच आई - बहिणीलासुद्धा लागू होते, कारण त्या शिवीमध्ये उच्चारल्या जाणाऱ्या अवयवांचे शब्द हे इतर स्त्रियांसोबत त्याच्या आई - बहिणीला लागू का नाही होऊ शकत? ज्या अवयवांचा उल्लेख शिवी देणारा करतो, त्याच अवयवांपासून त्याचं आयुष्य उभं राहिलेलं असतं.
 पुरुषप्रधान मानसिकतेमुळे आपण कशाकशाचे गुलाम झालो आहोत हेही आपल्याला माहित नाही, शिवी देताना आपण हा विचार करत नाही की आपण एखाद्याच्या आई - बहिणीचा उल्लेख करून शिवी देत असू तर तिथे आपल्या निगडीत स्त्रियांची अब्रूसुद्धा समोरच्य व्यक्तीच्या डोळ्यासमोर येते. यातून साध्य तर काही होत नाही, पण मानवांचे मेंदू व त्यातील विचार दुषित होतात. व्यर्थ बडबड करण्यापेक्षा समजूतदारीने चर्चा करून भांडण मिटवली, तर या वाईट शब्दांचा विचारही मनात येणार नाही. आज या चुकीच्या शब्दांचं प्रमाण एवढं वाढलं आहे, की त्यमुळे चांगले विचार असणारे लोकसुद्धा वेगळे वळण घेत आहेत.
 जर वाईट शब्द वापरून एखादा व्यक्ती स्त्रियांचा अवमान करत असेल, तर तो फक्त इतर स्त्रियांचा नाही तर स्वतःच्या आई - बहिणीचासुद्धा अपमान करत असतो. हे एवढं फोडून सांगितल्यावर सुद्धा कोणाच्या लक्षात येत नसेल, तर शिवी देताना स्वतःची आई किंवा बहिण डोळ्यासमोर ठेवा, मग त्याची जाणीव होईल की मी काय सांगू इच्छितो.

धन्यवाद!

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …
सहन करू नका, विद्रोह करा.
डरपोक राहू नका, बंडखोर बना.
 - आशित साबळे

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …