Skip to main content

Posts

Showing posts with the label भारत

लोकशाहीचा राँग टर्न

(टीप: हा लेख निवडणुका संपल्यावर जवळपास एक आठवड्याने लिहिला होता. याला काही वर्तमानपत्रांत प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न केले, पण  त्यांच्याकडून योग्य ती  प्रतिक्रिया न मिळाल्याने मी तो संपूर्ण लेख इथेच, माझ्या ब्लॉगवर पब्लिश करत आहे.) समजा, आपण एखाद्या वाहनात बसून चाललो आहोत आणि आपल्या चालकाला आपण सरळ जाण्यास सांगितलं पण अचानक चालकाने भलतीकडेच गाडी वळवली तर आपण त्याला विचारणार, प्रश्न करणार. त्याने जरी उत्तर दिलं की आपण योग्य रस्त्यावर आहोत, किंवा हा रस्ता चांगला आहे, किंवा इथून आपण लवकर पोहोचू, तरी आपल्या मनात संकोच असतोच. पुढे बराच वेळ प्रवास करून आपण आपल्या योग्य ठिकाणी पोहोचलोच नाही आणि तरी चालक गाडी बेधुंदपणे चालवत आहे आणि आपल्याला रस्ता ओळखीचा वाटत नाही, तेव्हा आपण त्याला रागवणार, ओरडणार, भांडणार आणि गाडीतून उतरणार किंवा स्वत:ची गाडी असेल तर त्याला गाडीबाहेर काढून स्वत: योग्य ठिकाणी पोहोचणार. पण आपण असं करत नाही आहोत. आपण चालकाला प्रश्नच विचारत नाहीत. आपल्या वतीने प्रश्न विचारायलासुद्धा कोणी नाही. हेच आज आपल्या देशात आणि राजकारणात होतंय! नुकत्याच पार पडलेल्या लोक...

भारत, भारतीय आणि प्रगती...

[या लेखात मी अनेक प्रश्नचिन्हे वापरली आहेत. त्याला माझं आश्चर्य, प्रश्न किंवा विधान; काहीही समजू शकता.]  बरेच दिवस झाले काहीच लिहिलं नाही. काही सुचतच नव्हतं आणि वेळही मिळाला नाही. पण प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण मात्र केलं. अचानक आता त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या बोरीवली नॅशनल पार्कमध्ये गेलो होतो. फार मोठे आर्कीओलॉजीस्ट डॉ. सुरज पंडित आमच्या सोबत होते. सर्वात पहिल्याच गुहेमध्ये ते आम्हाला माहिती सांगत असताना एक सुशिक्षित बेशिस्त कुटुंब तिथे आलं. त्या लहान मुलांनी तर तिथे धुमाकूळ घातला होता, आणि सरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तर ते लोक ऐकतच नव्हते; म्हणजे मुलं एकपट आणि पालक दुप्पट, अशी गत होती. त्यांचं बोलणं इंग्रजीत चाललं होतं, यावरून ते सुशिक्षित आहेत असा भास झाला, पण त्याच इंग्रजीतून त्यांनी त्यांचं खरं शिक्षण दाखवलं. मग पुढे सरांनी त्यांना गप्प करून तिथून घालवलं आणि म्हणाले "People are urbanized but not civilized". हे वाक्य मला फार सुंदर व महत्वाचं वाटलं. आपण ज्या ठिकाणी, ज्या गावात, शहरात, राज्यात, प्रांतात, देशात, प्रदेशात राहतो, तिथली...

भारतीय राजकारणात धर्माला घेऊन केले जाणारे सत्ताकारण

 भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास ६५ वर्ष झाली. या देशावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केलं. त्याहीपूर्वी प्राचीन भारतच्या इतिहासात समाजावर धर्मानेच राज्य केले आहे. धर्म जे सांगेल, त्याचे नियम पाळणे अनिवार्य होते. पण जेव्हा इंग्रज भारतात आले, त्यावेळी धर्माची सत्ता कमी झाली. परंतु अप्रत्यक्षरित्या इंग्रजांच्या सत्तेसोबत त्यांचा ख्रिस्ती धर्मसुद्धा भारतात आला. या सर्व गोष्टींवरून आपल्या हे लक्षात येऊ शकते की, धर्म आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी असून ते कुठेतरी जुळलेले आहे. किंबहुना राजकारणी ते जोडत आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना समिती स्थापन करण्यात आली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांमध्ये राज्यघटना तयार झाली. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे "भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे". स्वतंत्र भारताची राज्यघटना मान्य झाल्याच्या पुढे देशाने या तत्त्वांवर चालायला हवं होतं. पण आज आपल्या देशात काय दिसून येतं ते, धर्म, जाती व जमातवादी राजकारण. "जिथे" आपण भारताला धर्मनिरपेक्ष म्हणतो "तिथेच" आपण एखादा विशिष्ट "वाद"...