धर्म ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जुडलेली आहे. यापासूनच आपण कोणत्या पद्धतीने जगायचं हे शिकतो. आपण लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीत अशा पद्धतीने घडलो आहोत की, आपण धर्माविषयी टीका करत नाहीत, पटत नसतील तरीही त्याच्या जुन्या रुढीपरंपरे विरुद्ध बोलत नाही. इथूनच आपली मानसिकता अशा पद्धतीने घडते की, 'जे चाललंय ते चालू द्या...' मग पुढे येणाऱ्या पिढ्यांवरही तेच संस्कार होतात आणि २१व्या शतकातही तीच परिस्थिती दिसते जी पूर्वी असायची.
आज आपण पाहतो की, लोक बदलले नाहीत. धर्माच्या नावावर तंत्र, मंत्र, यज्ञ, हवन, जादूटोणा, ई. गोष्टी आजच्या आधुनिक काळात घडत आहेत. मुळात धर्म म्हणजे काय, तो कोणासाठी व कशासाठी असतो, धर्माचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध आहे, हे जाणून घेण्याची कुवत त्यांच्यात नाही, किंवा असं म्हणता येईल की त्यांनी चुकीच्या अर्थाने धर्म हा आत्मसात केला. प्राचीन काळापासून घडत आलेल्या चुकीच्या गोष्टी आपण फेकून दिल्या पाहिजेत, कारण आपल्याला त्याची माहिती व पुरावे मिळाले आहेत की त्याचा मानवाशी काही एक संबंध नाही किंवा ते उपयोगी नाही. धर्म किती जुना वा प्राचीन असल्याने त्याची महानता ठरत नाही तर त्यातील तत्त्वांनी तो धर्म मानवासाठी किती उपयोगी आहे यावरून त्याचं महत्त्व ठरत असतं.
माझ्या सर्व सामाजिक लेखांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्याचा मी जाणीवपूर्वक उल्लेख करतो, "माणूस धर्मासाठी नाही, तर धर्म माणसासाठी असतो" आणि धर्माच्या बाबतीत याच विचारावर मी चालतो. आपण जर एखादं धार्मिक कार्य करत असू, तेव्हा आपण धर्म बाजूला ठेवून स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे की, की ही गोष्ट योग्य आहे? हे करण्यात आपली इच्छा आहे का? हे आपण का करावं? त्या गोष्टीबद्दल मुळापर्यंत आपण विचार केला पाहिजे की त्याची उत्पत्ती कशी व का झाली असावी... उदा:- सण वगैरे.
माझा जन्म जरी हिंदू धर्मात झाला असला, तरी मी जगण्यासाठी धर्म नाही तर तत्त्वज्ञान स्वीकारले आहेत, ते म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञान. त्यातसुद्धा मी फक्त बुद्धाने सांगितलेल्याच गोष्टी घेतल्या असं नाही, तर माझ्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या इतर गोष्टीही मी स्वीकारल्या आहेत. या बाबतीत आपण लवचिक असलं पाहिजे, कोणत्याही एका विचारधारेवर अवलंबून न राहता व्यापक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. मी बौद्ध धम्म स्वीकारण्याचं कारण म्हणजे, यात केंद्रबिंदू ही कोणती अध्यात्मिक शक्ती नाही किंवा देव, ईश्वर अशा संकल्पना नाही, या धम्मात "मानव" हा केंद्रबिंदू असल्यामुळे मानवाला उपयुक्त अशा विचारांचा साठा आहे, ते विचार अलौकिक शक्तीवर आधारलेले नाहीत तर ते वैज्ञानिक पुरावे देतात.
मागच्या वर्षी मी जाती-धर्म व इतर सामाजिक विषयांवर थोडाफार अभ्यास केला तेव्हा एक गोष्ट समजली ती म्हणजे जगण्यासाठी "धर्म" हा अपरिहार्य नाही, तर एखाद्या विचारवंताने सांगितलेल्या "तत्त्वज्ञानावर"सुद्धा आपण आयुष्य जगू शकतो. जेव्हा आपल्या मनात "धर्म" ही संकल्पना असते तेव्हा अनेक गोष्टी आपल्याला बंधनात दिसतात, पण आता मी संपूर्णपणे धर्म डोक्यातून काढला आणि मानसिकरित्या स्वतंत्रपणे जगतो. त्या सर्व बेड्या तुटल्यासारख्या वाटतात. अगदी बौद्ध धम्म आणि तत्त्वज्ञान यातसुद्धा मी सुरुवातील गल्लत केली होती, मुळात यात गल्लत करण्यासारखं काही नाही, कारण बुद्धांच्या तत्त्वज्ञानावरच धम्म आधारलेला आहे, पण तरीसुद्धा आपण धम्म आणि तत्त्वज्ञान हे वेगवेगळं काढू शकतो. जेव्हा आपल्याला बौद्ध धम्म हा धर्म म्हणून पाहिजे असतो तेव्हा आपण बौद्ध रुढीपरंपरेनुसार वागतो जे समाजाने निर्माण करून ठेवले आहे, पण जेव्हा आपण बौद्ध धाम्माकडे एक तत्त्वज्ञान म्हणून पाहतो तेव्हा आपल्याला रुढीपरंपरा पाळायची गरज नसते. आणि ही गोष्ट फक्त बौद्ध धाम्मापुर्तीच मर्यादित नाही, तर जगातील सर्वच विचारवंत, तत्त्वज्ञ, संशोधक, समाजसुधारक, ई साठी लागू होते.
आपण एखाद्याला ईश्वरी दर्जा दिला की त्याचा देव होऊन धर्म सुरु होतो. अनुभव घेऊन बराच विचार केल्यावर माझ्या ही गोष्ट लक्षात आली की माणूस जेवढा जुना तेवढा त्याला ईश्वरी दर्जा जास्त. आपण महाराष्ट्रातील संत पहिले तर त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं, पण त्यांना आपण धर्मशी जोडलं. पुढे आपण पाहू शकतो की, न्यूटन, आईनस्टाईन, लुईस पास्चर, कार्ल मार्क्स, सोक्रेटीस, अरीस्टोटल, माओ, ई. आधुनिक विचारवंत, तत्त्वज्ञ, संशोधक व्यक्तिमत्व होऊन गेले, पण त्यांचा धर्म प्रस्थापित नाही झाला. शेवटी प्राचीन काळातील लोकांनीसुद्धा तत्त्वज्ञानच सांगितलं आणि आधुनिक काळातसुद्धा तत्त्वज्ञानच. मग असं का की, जुन्या काळातील लोकांच्या तत्त्वांवर धर्म उभारला गेला आणि आधुनिक काळातील लोकांचं म्हणणं हे फक्त तत्त्वज्ञान बनून राहिलं...? इथे आपण समाजाच्या मानसिकतेचा अभ्यास केला पाहिजे.
भारतातील मोहन्जोडो व हडप्पा संस्कृती नष्ट झाल्यावर लोक पुन्हा भटकू लागले, तेव्हा लोकांना जगायचं कसं यासाठी विचारांची गरज होती. पुढे दोन ते अडीच हजार वर्षांनी चार्वाक, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, चक्रधरस्वामी इत्यादी महामानवांनी लोकांना विशिष्ट पद्धतीने जगण्याचे उपदेश दिले. त्याचे लोकांनी स्वतःच नियम बनवले आणि त्यानुसार राहू लागले. आणि त्याच गोष्टींचा धर्म होत गेला. या तुलनेत आज (आधुनिक जगात) लोकांना धर्माची गरज नाही, कारण त्यांना जगण्याच्या विविध पद्धती माहित झाल्या आहेत. म्हणून आधुनिक विचारवंतांचे सिद्धांत आज सिद्धांत म्हणूनच ओळखले जातात, धर्म म्हणून नाही.
म्हणून मी ही जीवन जगण्यासाठी धर्म नाही तर सिद्धांत किंवा तत्त्वज्ञान स्वीकारले आहेत.
धन्यवाद!
- आशित साबळे.

Comments
Post a Comment