Skip to main content

Pre-Fandry

१४ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहतोय... फक्त "फॅंड्री"साठी!
एखादी जवळची व्यक्ती आपल्याला खूप दिवस भेटली नाही तर त्याची जशी आठवण येते, त्याच प्रकारे या चित्रपटाने मनाला घोर लावलाय. ही फिलिंग यासाठी येतेय की चित्रपटाचे प्रोमोज, थीम सॉंग, मुलाखतींचे विडीयो, इत्यादी पाहून मी त्या कथेशी कनेक्ट होत चाललोय, असं वाटू लागलंय. म्हणूनच की काय, मला माझी कथा बघायची घाई झाली आहे असं वाटतं. आम्हीच काही जणांनी दादर-माटुंगाला "चित्रपट - काल, आज, उद्या" असा परिसंवाद ठेवला होता, तेव्हा फॅंड्रीबद्दल पहिल्यांदाच प्रत्यक्ष "नागराज मंजुळे" यांचाकडून ऐकायला मिळालं.
म्युझिक लाँचच्या दिवशी मी "तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला" हे गाणं २० ते २५ वेळा तरी ऐकलं असेल आणि आजपर्यंत सगळे गाणे बाजूला ठेऊन हेच गाणं ऐकतोय. काही दिवसांपासून आजूबाजूचं वातावरण "फॅंड्रीमय" झालं आहे. जो तो फर्स्ट डे फर्स्ट शो फॅंड्री बघायचं म्हणतोय, म्हणून मला तिकीट मिळेल की नाही याची चिंता वाटू लागलीये. पण काहीही होवो, अॅट एनी कॉस्ट मी फर्स्ट डे फर्स्ट शो फॅंड्री बघणारच. आणि तो चित्रपट पाहून मला व्यक्त व्हायचंय म्हणून मी त्या चित्रपटावर माझं मत मांडत एखादा लेख लिहिण्याचा प्रयत्न करीन; कारण आजतागायत एखादा चित्रपट रिलीज होण्याअगोदर त्या चित्रपटाला फॅंड्री इतकी प्रसिद्धी आणि यश प्राप्त झालेलं आठवत नाही. तसंही मार्केटिंग, प्रमोशन, प्रसिद्धी आणि सर्वच campaignची प्लॅनिंग अगदी योग्य पद्धतीने धावत आहे. असो, अजून खोलात चित्रपट पाहिल्यावर लिहीनच.
तो पर्यंत अजय गोगावलेचं हे भन्नाट गाणं आवर्जून अनुभवा. गाणं सुरु करा, लिरिक्स समोर घ्या आणि मोठमोठ्याने bindasssss.....जीव झाला येडा-पिसा, रात-रात जागणं...
पुरं दिसभर, तुझ्या फिरतो मागं-मागणं...

जीव झाला येडा-पिसा, रात-रात जागणं...
पुरं दिसभर, तुझ्या फिरतो मागं-मागणं...
जादू मंतरली कुणी, सपनात जागपनी,
नशिबी भोग असा दावला...

तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला...
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला...
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकडे पाहीना...

हे हे!
भिर भिर मनाला ह्या घालू कसा बांध गं...
अवसेची रात मी, अनं पुनवंचा तू चांद गं...
नजरेत मावतीया, तरी दूर धावतीया...
मनीचा ठाव तुझ्या मिळना...

हाता तोंडा म्होर घास तरी गिळना...
गेला जळून-जळून जीव, प्रीत जुळणां हं...
सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली,
तरी झाली कुठं चूक मला कळना...

सांधी कोप-यात उभा येकाला कधीचा,
लाज ना कशाची, तक्रार न्हाई...
भास वाटतोया, हे खर का सपान,
सुखाच्या ह्या सपनाला थार नाही...

हे राख झाली जगण्याची हाय तरी जिता,
भोळ प्रेम माझं अन भाबडी कथा...
बघ जगतूया कसं, साऱ्या जन्माचं हसं,
जीव चिमटीत असा गावला...

तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला...
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला...
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकडे पाहीना...

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…