Skip to main content
दि. १९ फेब्रुवारी २०१४. २ वाजता.

 आज अचानक नागराज मंजुळे माझ्या कॉलेजच्या बाहेर कट्ट्यावर भेटले. लेक्चर असताना बाहेर थांबलो. अमित भंडारी आणि ते कॅमेरासमोर गप्पा मारत बसले होते. मी त्यांचं संपेपर्यंत थांबलो. अगोदर अव्य आणि सुजाता गेले, त्यांना ते पुण्यातच भेटले होते, बघितलं होतं. नागराज मंजुळेंनी त्यांना ओळखलं. त्यांच्या पाठोपाठ मी गेलो त्यांना हात मिळवला आणि फेसबुकवर Fandry बद्दल लिहिलेलं सांगताच त्यांनी मला ओळखलं!!! स्वताहून त्यांनी माझं नाव घेतलं!!! मला फार फार आनंद झाला आणि आश्चर्यही वाटला; की फेसबुकवर अनेकांनी Fandryवर लिहिलंय आणि या क्षेत्रात अनेकांना भेटल्यावर डोक्यात जो गोंधळ होतो, तेव्हा आधी भेटलेल्या लोकांनाही लोक ओळखत नाहीत, पुन्हा डोक्यात गेलेली हवा असते. फुगिरी मारत लोक भाव खातात; पण नागराज मंजुळेसारखा आभाळा इतकं यश गाठलेला चित्रपट दिग्दर्शक इतका साधा पण इतका हुशार आणि स्मरणशक्ती इतकी दांडगी की फेसबुकवर कोण्या एका मुलाने लिहिलेला त्याचा अनुभव नागराज मंजुळे लक्षात ठेवतात आणि कधी न भेटलेल्या त्या मुलाला ते लक्षात ठेवून ओळखतात!!! हे अनुभव तर मी आयुष्यात विसरू शकत नाही. पुन्हा त्यांनी माझी आणि Amit Bhandari यांची ओळख करून दिली व ते करत असताना नागराज सर बोलले की "हा आशित साबळे, याने फँड्रीबद्दल फेसबुकवर लिहिलंय. खूप छान लिहितो." याच मुलांनी फँड्री पसरवलाय, असं ही ते म्हणाले. एक कवी, लेखक, दिग्दर्शक यांचे माझ्या प्रती निघालेले हे उद्गार आणि हा अनुभव कधीही न विसरण्यासारखा आहे.
 आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता. रणबीर कपूर आणि कतरीना कैफसारखे माणसं लोकांना स्टार वाटतात. अनेक दिवस त्यांच्याच सान्निध्यात राहून त्यांच्यासोबत फोटो न काढणारा मी आज नागराज मंजुळे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मरत होतो. माझ्यासाठी ते सर्व स्टारपेक्षाही खूप मोठे आहेत. त्याचं कारण असं, की ते DP's हॉटेलमध्ये त्यांच्या टीमकडे गेले, पण त्यांनी हे लक्षात ठेवलं की आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायचा आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी थांबलो आहोत. ते आत जाऊन पुन्हा आठवणीने स्वताहून बाहेर आले. आम्ही फोटो काढला, खूप गप्पा मारल्या. फँड्री, त्याचा गाभा, प्रेक्षक, प्रतिक्रिया, पुढील चित्रपट "सैराट" आणि अनेक विषय हे अगदी मित्रासारखे एकमेकांशी बोललो.
 मला आजपर्यंत कधीच एखादा चित्रपट पुन्हा पहावासा वाटला नाही, पण मी फँड्री ३-४ वेळा थिएटरमध्ये जाऊन पहिला. त्याचं संगीत मला इतकं अवडलं की मी सगळे गाणे बाजूला ठेवून तेच गाणं न बदलता ऐकतो, फँड्रीची "सोमनाथने वाजवलेली हलगी" माझ्या "स्मार्टफोनची" रिंगटोन आहे; आणि त्याच चित्रपटाचा दिग्दर्शक भेटतो आणि असे अनुभव देऊन जातो... खरंच! माणूस असावं तर नागराज मंजुळेंसारखं...

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, वंशाची

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज झ

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.