ही मराठी अमुची, बोली अमुची, संस्कृती मराठी.  ज्ञानात अमुच्या, तुकात अमुच्या, सोयरी मराठी.  अशी संपन्न संत परंपरा या महारष्ट्रा लाभली,  विषमता भाव सहन केला,  वंदितो चोखाच्या त्या चरणी...  तूच अमुचा तारणहारा शिवबा,  तूच अमुचा धनी,  जिजाऊ सारिख्या आईने तुजसारिखी महान व्यक्ती घडविली.  जिवाजीनं कापला शत्रूचा हात,  बाजीप्रभूनं हादरली पावनखिंडी.  तलवारी हाती घेण्याआधी तू शिवा फिरविल्या सोन्याच्या नांगरी...   या भूमीवर जन्मास एकच ते महात्मा,  राष्ट्रपिता संबोधितो मी, त्यांचं नाव आहे जोतीबा.  उघडी केली शिक्षणाची दारं,  दाखविली ज्ञानाची जोती,  साथ दिली क्रांतीसुर्याला आमची माय ती सावित्री.  जातीभेद मोडून शिकविली शूद्रांची पोरं,  आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज.  अज्ञानी समाजाला दिले त्यांनी ज्ञान भरपूर,  धर्मांधांना केले सरळ, ते होते प्रबोधनकार.  दलितांची हाक ऐकून आले जन्मास आंबेडकर,  खूप शिकुनी मोठे झाले घटनेचे शिल्पकार,  राज्यघटनेत दिले त्यांनी आपणास मताधिकार,  समता, स्वतंत्रता, बंधुभाव करू आपण अंगीकार.   झाला सुरु लढा या संयुक्त महाराष्ट्राचा,  गेला बळी अमुच्या अनेक हुतात्म्यांचा,  महारक्षकां...