दि. १९ फेब्रुवारी २०१४. २ वाजता. आज अचानक नागराज मंजुळे माझ्या कॉलेजच्या बाहेर कट्ट्यावर भेटले. लेक्चर असताना बाहेर थांबलो. अमित भंडारी आणि ते कॅमेरासमोर गप्पा मारत बसले होते. मी त्यांचं संपेपर्यंत थांबलो. अगोदर अव्य आणि सुजाता गेले, त्यांना ते पुण्यातच भेटले होते, बघितलं होतं. नागराज मंजुळेंनी त्यांना ओळखलं. त्यांच्या पाठोपाठ मी गेलो त्यांना हात मिळवला आणि फेसबुकवर Fandry बद्दल लिहिलेलं सांगताच त्यांनी मला ओळखलं!!! स्वताहून त्यांनी माझं नाव घेतलं!!! मला फार फार आनंद झाला आणि आश्चर्यही वाटला; की फेसबुकवर अनेकांनी Fandryवर लिहिलंय आणि या क्षेत्रात अनेकांना भेटल्यावर डोक्यात जो गोंधळ होतो, तेव्हा आधी भेटलेल्या लोकांनाही लोक ओळखत नाहीत, पुन्हा डोक्यात गेलेली हवा असते. फुगिरी मारत लोक भाव खातात; पण नागराज मंजुळेसारखा आभाळा इतकं यश गाठलेला चित्रपट दिग्दर्शक इतका साधा पण इतका हुशार आणि स्मरणशक्ती इतकी दांडगी की फेसबुकवर कोण्या एका मुलाने लिहिलेला त्याचा अनुभव नागराज मंजुळे लक्षात ठेवतात आणि कधी न भेटलेल्या त्या मुलाला ते लक्षात ठेवून ओळखतात!!! हे अनुभव तर मी आयुष्यात विसरू शकत नाही. ...