Skip to main content

Posts

कुठे हरवली आहे संवेदनशीलता...

 “माणूस मारतो म्हणजे नेमकं काय होतं? तर लोक म्हणतात तो चेतनाहीन होतो. पण अविरत चेतना वागवत हिंडणारे, फिरणारे, खाणारे, पिणारे सारेच लोक खरंच जिवंत असतात...? खरं सांगायचं तर असं नसतं. वरवर जिवंत दिसणारे आपण खरंतर मेलेलो असतो. फक्त आपला अंत्यसंस्कार झालेला नसतो. पहिला मारतो विचार, मग मारते विचारधारा आणि त्यानंतर मारते संवेदना आणि मग अस्तित्वात येतं एक संवेदनाहीन जग. जे खरंतर एक स्मशानभूमीच असतं. या स्माशाणात आपल्याला कोणीही, कुठेही, कसंही ढकलत नेत असतं.” लोकशाहीर संभाजी भागात यांचे हे वाक्य मला आवर्जून सांगावेसे वाटतात.  आपल्या देशात सध्या स्मशानभूमीसारखी परिस्थिती झाली आहे; म्हणजेच लोक संवेदनाहीन झाले आहेत. रोजच्या जगण्यात आणि रोजच्या वर्तमानपत्रात आपण अशा अनेक गोष्टी बघतो. असे अनेक उदाहरण सतत आपल्या समोर येत असतात. म्हणजे कुठे अतिरेकी किंवा बॉम्ब हल्ला झाला की जखमी लोकांना पाहून आपण म्हणतो की “बरं झालं हे आपल्या इथे नाही झालं ते...”; किंवा कोणी रस्त्यात एखाद्या मुलीची छेड काढत असेल तर आपण दुर्लक्ष करून बाजूने निघून जातो; किंवा कुठे अपघात झाला तर लोक मदत करण्याऐवजी अपघातग्रस्...

सारे मेले मुडदे

दोन दिवसापूर्वी खूप महिन्यांनी Shailesh भेटला होता. आम्ही दिवसभर म्हणजे जवळपास आठ तास असंख्य विषयांवर चर्चा केली, गप्पा मारल्या. दादरचा एक रस्ता सुटला नाही त्या दिवशी. ठिकठिकाणी "चल निघतो" असं म्हणत तासंतास तिथे उभे राहून बोलत होतो. बऱ्याच दिवसांनी कोणाशी तरी अनेक विषयांवर बोललो. मी रिचार्ज झालो. गप्पा मारताना आजू बाजूला असणाऱ्या गोष्टीचं चित्र नेणीवेत छापत गेलं आणि दोन दिवस सतत त्याची जाणीव होत होती; अनेक गोष्टी समोर येत गेल्या. त्यातूनच काहीतरी सुचलं, ते मांडतोय... _______________________ लोकशाहीच्या देशात राहणारे आम्ही, कळपात राहण्याची सवय गेली नाही, रंगांच्या गर्दीत माथे फोडत बसलो, पण माथ्यावरचं आभाळ दिसलंच नाही... गाडीसारखी व्यवस्था, त्याच्या चाकासारखे आपण, विद्रोह करतो, पण एकाच ठिकाणी गोल फिरत, झिजत, घासत... त्या चाकांना जवळ यायचीसुद्धा सोय नाही... गाडी घेऊन जाईल तिकडे हे चाकांचे जत्थे जाऊ लागले आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाणारं जहाज आपण बुडून बसलोय की काय, काही कळतच नाही... हेच चाक लोकशाहीचा गाडा घेऊन चाललेत, पण गाडीचा चालक मात्र भलत्याच ...

निषेध!!!

 गेल्या निवडणुकांमध्ये भारतीयांनी मोदीला मत दिल्यामुळे आज त्यांची मनमानी आपल्याला दिसत आहे. भारतीय संविधानानुसार स्थापन केलेलं "नियोजन आयोग" (planning commission) मोदींनी त्याला सरळ बरखास्त केलं. जगातल्या इतर देशांमध्ये धर्मनिरपेक्ष भारताचा पंतप्रधान गेल्यावर तिकडच्या राष्ट्राध्यक्षांना "गीता" वाटत फिरतात. जगभरातून होणाऱ्या त्यांच्या विरोधातल्या बातम्या टी.व्ही.वर येत नाही, तर उलट "संघाचे" भाषणं प्रसारित करण्यात येऊ लागले आहेत. ते अमेरिकेत भाषण करताना भारत देशाला उन्नत करणाऱ्या महामानवांना मोदी विसरतात. मोदींनी आजपर्यंत फक्त गुजरातच्या खोट्या प्रगतीच्या गप्पा केल्या, पण त्यांचंच सरकार असलेल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश यांच्यासारख्या इतर राज्यांचे काय झाले हे ते सांगत नाहीयेत. मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी मोदी रिझव्‍‌र्ह बँक दिल्लीला हलवत आहेत, त्याची तयारी म्हणजे रिझव्‍‌र्ह बँके तीन कार्यालये मोदींनी आधीच दिल्लीला हलवले आहेत. त्या आधी पालघर येथे प्रस्तावित असलेले महाराष्ट्र राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे कार्यालयही मोदी यांनी गुजरातमध्ये हलवले आहे. मुंबईवर झालेल...

वैताग

एक पोट, पन्नास रुपये, उपाशी चालतो, कसाईवाडा... दोन पोट, शंभर रुपये, मेंदू सुन्न, थैली आणतो... तीन पोट, शंभर रुपये, मनात राग, वाटून खातो... चार भिंती, चार दगडं, दगडांचे पोट, पुन्हा पन्नास रुपये... - आशित रजनी.

मुक्त साहित्य

(आत्तापर्यंतच्या एकूण वाचनातून आणि अनुभवांमधून मला काय जाणवलं ते या कवितेत आहे.) तुमच्यासारखं आमच्या कवितेत नसतात यमक, पण असतात गमक समाजाचे. तुमच्या संस्कृतला आम्ही हुंगत पण नाही, आमच्या साहित्याला निर्माण करायला. ते वाटू द्या तुम्हाला प्राकृत, आम्ही आहोतच अस्पृश्य मेनस्ट्रीमपासून दलित म्हणून. निसर्गाने दिलेल्या जगण्याला, आणि जगण्यातल्या स्वातंत्र्याला आम्ही जागवतोय, आंबेडकरी म्हणून. आमचं जगणंच असतं आमचं साहित्य, आमच्या वेदनाच असतात आमचे शब्द. तुमचे गोड गुलाबी रोमँटिक काव्य माणूसपणाच्या काही कामाचे नाही. त्यातून वासच येत असतो वासनेचा, प्रेमाच्या पलीकडे न जाणाऱ्या सडक्या मेंदूचा. आमच्या जहाल विद्रोही साहित्यातून व्यक्त होत असते चीड अन्यायाची, सोबत असते बुद्धाची करुणा माणसाला मुक्त करण्यासाठी. - आशित रजनी.

पेच

जगण्यासाठी गुदमरून पेचात अडकलेल्या जिवाभोवती आकांततांडव होतोय; विलासासाठी, स्वार्थासाठी. हृदयातल्या, छातीतल्या मानसिक कळा, थरथरते हात, आवळत जाणाऱ्या मुठ्या आणि लाल डोळे, घेऊन जात आहेत मला भविष्यात पुढच्या क्षणातल्या. वर्तमानात येताच वर्तमान दाखवतोय माझं वर्तमान काळ, आणि तांडव थांबवण्यासाठी उभा राहतोय मी एकटाच. न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावरची पट्टी काढून अन्यायाच्या गळ्याभोवती गुंडाळावीशी वाटतेय फासासारखी, न्यायासाठी, संघर्षासाठी, विद्रोहासाठी... - आशित रजनी.

Impact of political advertising

 India has became too much aggressive in advertising & marketing. In 2014, Indian politics has adopted the funda of advertising looking at Indian psychology & changing trends and issues. According, to the elections till now, we can see the impact of advertising on Indian people. Many of them (voters) are from different background other than politics. These common people "get affected" to this aggressive marketing of a brand (candidate) through advertises.  This marketing contains not only advertises but also various types of campaigns targeting youth & colleges. This technique took the BJP to a higher success and fame. Also, social media helped it to reach more & more people. So, as a result, we can see, that people who do not belong to any political background or have no knowledge of politics or Indian history, they started supporting NaMo and all other candidates got erased from the minds of common people because of their slogan "Abki baar Modi Sarkar...