Skip to main content

निषेध!!!

 गेल्या निवडणुकांमध्ये भारतीयांनी मोदीला मत दिल्यामुळे आज त्यांची मनमानी आपल्याला दिसत आहे. भारतीय संविधानानुसार स्थापन केलेलं "नियोजन आयोग" (planning commission) मोदींनी त्याला सरळ बरखास्त केलं. जगातल्या इतर देशांमध्ये धर्मनिरपेक्ष भारताचा पंतप्रधान गेल्यावर तिकडच्या राष्ट्राध्यक्षांना "गीता" वाटत फिरतात. जगभरातून होणाऱ्या त्यांच्या विरोधातल्या बातम्या टी.व्ही.वर येत नाही, तर उलट "संघाचे" भाषणं प्रसारित करण्यात येऊ लागले आहेत. ते अमेरिकेत भाषण करताना भारत देशाला उन्नत करणाऱ्या महामानवांना मोदी विसरतात. मोदींनी आजपर्यंत फक्त गुजरातच्या खोट्या प्रगतीच्या गप्पा केल्या, पण त्यांचंच सरकार असलेल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश यांच्यासारख्या इतर राज्यांचे काय झाले हे ते सांगत नाहीयेत. मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी मोदी रिझव्‍‌र्ह बँक दिल्लीला हलवत आहेत, त्याची तयारी म्हणजे रिझव्‍‌र्ह बँके तीन कार्यालये मोदींनी आधीच दिल्लीला हलवले आहेत. त्या आधी पालघर येथे प्रस्तावित असलेले महाराष्ट्र राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे कार्यालयही मोदी यांनी गुजरातमध्ये हलवले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईचा सागरी किनारा सुरक्षित राहावा, यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मात्र, मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही त्यांनी ती गुजरातमध्ये का हलवली, याचं स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आणि मोदी हे पंतप्रधान असतानासुद्धा भाजपचा प्रचार करत आहेत आणि त्यात महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी सांगत आहेत.
 संघाचे पूर्वीपासूनचे प्रचारक "दिनानाथ बात्रा" हे मोदींना भेटले आणि शिक्षणसंस्थेत पूर्ण बदल करण्याचे ठरले. ते म्हणाले सध्याच्या शिक्षणामुळे सर्व जण पाश्चात्य संस्कृतीत बुडालेले आहेत. त्यामुळे आता पाठ्यपुस्तक पुन्हा नव्याने लिहून त्यात सर्व पुस्तकांमध्ये पहिला धडा भारतीय इतिहास असेल आणि ज्यातून अध्यात्म, संस्कृत भाषा, देशभक्ती मुलांमध्ये रुजवली जाईल. भारताचा नकाशा सध्याच्या जगाप्रमाणे नसून तो लंका, भूतान, नेपाल, अफगाणिस्तान, इ. देशांना समाविष्ट करून पुरातन काळासारखा आणि त्यांच्या विचारसरणीनुसार "अखंड भारताचा" असेल. सर्व शाळा यांनी अशा पद्धतीने काम करावे कि मुलांना समाजकार्याची आवड निर्माण होईल. त्यासाठी ते विविध खेडे आणि झोपडपट्ट्यांमध्ये स्वतः कार्यशाळा घेणार आहेत. (जेणेकरून विद्यार्थ्यांनाच थेट लहानपणापासूनच "प्रचारक" बनवता येईल.)
 हे सर्व प्रयत्न भारताच्या संविधानाविरुद्ध आहेत आणि ते सर्वांसाठी घातक आहेत.

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, वंशाची

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज झ

कसले हे बौद्ध...

 बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त