Skip to main content

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead)
अरे रान रान रान, चला
उठवू सारे रान रे...

(Chorus ⬇️)
जाण जाण जाण 
जहरी दुष्मनाला जाण रे
हे हे हे हे हे हे हे.

कठीण आला काळ,
मातीशी तुटे नाळ,
युगाचा अंध खेळ,
डोळेच केले गहाळ.
सावात दिसे चोर,
घुबडात दिसे मोर,
लहानात दिसे थोर,
थोरात दिसे पोर.

अरारारारा.

अरे भले भले भुलले,
भलतेच गाती गान रे... (Chorus)
दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे),
दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे...

जाण जाण जाण 
जहरी दुष्मनाला जाण रे
हे हे हे हे हे हे हे.

सैतान काळा गोरा,
चिमटीत जीव कोरा,
रंगाचा करी मारा,
मरणाचा चढे पारा,
रंगाचा खेळ खेळी,
कोरतो भेद भाळी,
मानव हे उभे जाळी,
जाळ्यात माय होळी.

अरारारारा हा!

हे रंग रंग रे,
आहा! (Chorus)
भंग भंग रे,
आहा! (Chorus)
भंग भंग रे...

(Chorus ⬇️)
रंगून भंगले,
भंगुन दंगले,
दंगुन गुंगले,
गुंगून दंगले.

ही निबीड जंगले,
आहा! (Chorus)
जंग जंगले,
आहा! (Chorus)
जंग जंगले...

(Chorus ⬇️)
धर्माची जंगले,
जातीची जंगले,
वंशाची जंगले,
देशाची जंगले.
अरारारारा हा!

या कत्तलीच्या राती,
हरपून गेले भान रे... (Chorus)

अरे पोळले, 
हे हे! (chorus)
पोळले...
हे हे! (chorus)
पोळले हात त्यांना विस्तवाचे दान रे,
(Chorus ⬇️)
जाण जाण जाण 
जहरी दुष्मनाला जाण रे
हे हे हे हे हे हे हे.

जादुई महा खतरा,
पैक्याची भरी मात्रा,
माणसाचा होई कुत्रा,
कुत्र्याची रूपे सतरा,
रक्तात रंगे भूक,
भुकेत कैसे सुख,
सुखाचा शोध जारी,
धुंदल्या दिशा चारी.

अरारारारा हा! (Chorus)

ही चकचक चौंदळ,
व्हय दादा, (chorus)
ही चंगळ मंगळ,
व्हय दादा, (chorus)
हे झोलझाल रे,
व्हय दादा, (chorus)
हे भव्य मॉल रे,
व्हय दादा, (chorus)
Free for all रे,
व्हय दादा, (chorus)
हा ग्रेट फॉल रे,
व्हय दादा, (chorus)

(Chorus ⬇️)
झोलझाल रे,
भव्य मॉल रे,
ग्रेट फॉल रे,
ग्रेट फॉल रे,
रोगवाद रे, भोगवाद रे,
रोगवाद रे, भोगवाद रे,
रोगवाद रे, भोगवाद रे...

- (Written by Sambhaji Bhagat)

Comments

Popular posts from this blog

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज झ

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.